Google 
अर्थविश्व

गुगलमध्येही वाहू लागले कामगार ऐक्याचे वारे

वृत्तसंस्था

ओकलँड (कॅलिफोर्निया, अमेरिका) - जगातील आघाडीची सर्च इंजिन कंपनी असणाऱ्या गुगलमध्येही कामगार ऐक्याचे वारे वाहू लागले असून आता कंपनीमधील २२५ अभियंते आणि कामगारांनी मिळून कामगार संघटना स्थापन केली आहे. या संघटनेच्या स्थापनेमुळे सिलिकॉन व्हॅलीमध्येही कामगार चळवळीचा शिरकाव झाल्याचे मानले जाते. माहिती तंत्रज्ञान क्षेत्रामध्ये काम करणारे व्हाइट कॉलर कामगार स्वतःच्या हक्कासाठी एकत्र येणे ही घटनाच मुळात महत्त्वपूर्ण असल्याचे कॉर्पोरेट जाणकारांचे म्हणणे आहे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

वेतनासंबंधीचे नियम, कामापोटी वरिष्ठांकडून होणारी छळवणूक आणि कंपनीकडून मागील काही वर्षांमध्ये मूल्यांशी केली जाणारी तडजोड यामुळे सध्या गुगलमधील कामगारांमध्ये संतापाची लाट आहे. आता याच मुद्यावरून कंपनीचे कर्मचारी आणि वरिष्ठ अधिकारी यांच्यामध्ये संघर्षाचा भडका उडण्याची शक्यता आहे.

संघटनेचे स्वरूप
या नव्या संघटनेचे नाव हे ‘अल्फाबेट वर्कर्स युनियन’ असे ठेवण्यात आले आहे. या संघटनेच्या नुकत्याच झालेल्या बैठकीमध्ये अध्यक्षांचीही निवड करण्यात आल्याचे समजते.

Edited By - Prashant Patil

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पेपरमध्ये ढीगभर चुका, UGC-NET परीक्षेचे तीन पेपर पुन्हा होणार, तारीखही जाहीर...

Rohit Sharma: बाप रे बाप...! सायकलवरून हजारो किमीचा प्रवास करून आलेल्या फॅनला भेटल्यावर कशी होती रोहितची रिअ‍ॅक्शन, Viral Video

Phone Charging Tips: Airplane Mode ON करून फोन चार्ज केला तर काय होतं? जाणून घ्या

Shirur Bypass Crash: शिरूर बायपासवर पुन्हा बळी; तुटलेल्या दुभाजकातून दुचाकी नेणे जीवावर बेतले

Russia-Ukraine War: रशियावर युक्रेनचा ड्रोन हल्ल्यांचा कहर! ८२२ ड्रोन, भीषण आग अन् ६ जणांचा मृत्यू... मॉस्कोवर मोठा हल्ला

SCROLL FOR NEXT