Gov. Company Shares
Gov. Company Shares esakal
अर्थविश्व

Gov. Company Shares : या सरकारी कंपनीने 9 महिन्यात गुंतवणुकदारांची संपत्ती चार पट वाढवली

सकाळ डिजिटल टीम

Government Company Shares : माझगाव डॉक शिपबिल्डर्सच्या (Mazagon Dock Shipbuilders) शेअर्समध्ये गेल्या काही महिन्यांत मोठी वाढ झाली आहे. अवघ्या नऊ महिन्यांत गुंतवणूकदारांच्या 1 लाखाचे 4 लाखांहून अधिक झाले. बुधवारीही या शेअरमध्ये मोठ्या प्रमाणात खरेदी दिसून आली. बीएसईवर सध्या हे शेअर्स 5 टक्क्यांहून अधिक वाढीसह 913.85 रुपयांच्या विक्रमी किंमतीवर पोहोचले आहेत. पण बुधवारी प्रॉफिट बुकींगमुळे आता हे शेअर्स 894.85 वर बंद झाले.

या वर्षी 24 फेब्रुवारीला माझगाव डॉक शिपबिल्डर्सचे शेअर्स 224 रुपयांवर होते, जो एका वर्षातील विक्रमी नीचांक आहे. पण, यानंतर खरेदी वाढली आणि बुधवारी 23 नोव्हेंबरला हा शेअर 913.85 रुपयांवर पोहोचला, म्हणजे अवघ्या नऊ महिन्यांत गुंतवणूकदारांचे भांडवल 308 टक्क्यांनी वाढले. कंपनीची मार्केट कॅप 18,048.23 कोटी आहे.

माझगाव डॉकचे शेअर्स जवळपास दोन वर्षांपूर्वी 12 ऑक्टोबरला लिस्ट झाले होते. 444 कोटी रुपयांच्या आयपीओअंतर्गत, गुंतवणूकदारांना 145 रुपयांना हे शेअर्स जारी करण्यात आले आणि बीएसईवर लिस्टिंगच्या दिवशी ते 216.65 रुपयांच्या उच्चांकावर पोहोचले. आता त्याची किंमत 913.85 रुपयांवर गेली आहे, याचा अर्थ आयपीओ गुंतवणूकदारांच्या भांडवलात केवळ दोन वर्षांत 530 टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे. त्यांचा आयपीओ 157.41 पट सबस्क्राइब झाला.

माझगाव डॉक 1934 मध्ये सुरू करण्यात आला होता आणि तो संरक्षण मंत्रालयाच्या अंतर्गत येतो. संरक्षण मंत्रालयासाठी युद्धनौका आणि पाणबुड्या बांधणे आणि त्यांची दुरुस्ती करणे हे त्याचे काम आहे. याशिवाय मालवाहू जहाजे, मल्टीपर्पज सपोर्ट व्हेसल्स, ड्रेजर, पाण्याचे टँकर इ. भारतीय नौदलासाठी डिस्ट्रॉयर्स आणि पारंपारिक पाणबुड्या तयार करणारे हे एकमेव शिपयार्ड आहे.

नोंद : क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nashik Modi Rally: "मोदीजी आता कांद्यावर बोला" मोदींनी भाषण मध्येच थांबवलं! पिंपळगाव बसवंतच्या सभेत काय घडलं?

PM Modi Nashik: नाशिकमध्ये पंतप्रधान अखेर कांद्यावर बोललेच; ऑपेरेशन ग्रीन, निर्यात बंदी आणि बफर स्टॉकबाबत म्हणाले...

Mumbai Metro: पंतप्रधान मोदींच्या रोड शोसाठी मुंबईत मेट्रो बंद; सुरक्षेचे कारण देत घेतला निर्णय

Latest Marathi News Live Update: अयोध्येत भव्य राम मंदिर उभारण्याचे बाळासाहेब ठाकरे यांचे स्वप्न होते -पंतप्रधान मोदी

India Head Coach : टीम इंडियाच्या मुख्य कोच निवडीबाबत मोठी अपडेट; राहुल द्रविडनंतर 'या' दिग्गज खेळाडूने अर्ज भरण्यास दिला नकार

SCROLL FOR NEXT