Girl Child google
अर्थविश्व

Girl Child : 'या' मुलींना राज्य सरकार देणार ५० हजार रुपये; अशी आहे योजना

या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी पालक आणि मुली हे महाराष्ट्राचे रहिवासी असणे आवश्यक आहे.

नमिता धुरी

मुंबई : मुलींना जन्म देणाऱ्या पालकांसाठी सरकारतर्फे अनेक योजना राबवल्या जातात. त्यापैकीच एक आहे मांझी कन्या भाग्यश्री योजना. १ एप्रिल २०१६ रोजी महाराष्ट्र सरकारने ही योजना सुरू केली. दोन मुली असलेल्या कुटुंबालाही या योजनेचा लाभ मिळेल. हेही वाचा - प्राचीन काळातली शस्त्रनिर्मिती कला....

कोणासाठी आहे ही योजना ?

या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी पालक आणि मुली हे महाराष्ट्राचे रहिवासी असणे आवश्यक आहे. या योजनेंतर्गत आई आणि मुलींच्या नावे संयुक्त बँक खाते उघडले जाईल. त्यात रु. १ लाख अपघात विमा पॉलिसी आणि रु. ५ हजार ओव्हरड्राफ्ट जमा केला जाईल.

पालकांना आपल्या मुलीच्या जन्मानंतर तिला १८ वर्षे पूर्ण होईपर्यंत ५० हजार रुपये शासनाकडून मिळणार आहेत. दोन मुली असल्यास प्रत्येकी २५ हजार रुपये दिले जातील. माझी कन्या भाग्यश्री योजनेंतर्गत राज्य सरकारने दिलेला पैसा मुलींच्या शिक्षणासाठी वापरता येईल. (Manjhi Kanya Bhagyashree Yojana)

कोणत्या कागदपत्रांची आवश्यकता असेल :

मांझी कन्या भाग्यश्री योजनेसाठी पात्र होण्यासाठी अर्जदाराकडे आधार कार्ड, आई किंवा मुलीचे बँक खाते पासबुक, मोबाईल फोन नंबर, पासपोर्ट आकाराचा फोटो, रहिवासी प्रमाणपत्र आणि उत्पन्नाचा दाखला असणे आवश्यक आहे. तिसरे मूल असले तरी या योजनेअंतर्गत फक्त दोन मुलींनाच लाभ मिळेल.

योजनेसाठी अर्ज कसा आणि कुठे करायचा ते जाणून घ्या :

राज्य सरकारने दिलेल्या या योजनेसाठी अर्ज करण्यासाठी महाराष्ट्र सरकारच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या. तुम्ही मांझी कन्या भाग्यश्री योजना फॉर्म डाउनलोड करणे आवश्यक आहे. तो वेबसाइटवर उपलब्ध असेल.

अर्ज डाऊनलोड केल्यानंतर तो भरून महिला आणि बाल विकास कार्यालयात पाठवण्यापूर्वी आवश्यक ती कागदपत्रे जोडावीत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CAG Report : रेल्वे स्थानकातील पाणी पिता? CSMT, कल्याण, लोणावळ्यातही तपासणी; कॅगच्या अहवालात धक्कादायक खुलासा

Panvel-Karjat Local: आनंदाची बातमी! दीड तासाचा प्रवास ४० मिनिटांत पूर्ण; कर्जत-पनवेल लोकल कधी सुरु होणार? तारीख आली समोर

Gold Rate Today: सोनं खरेदीचा विचार करताय? दरात रातोरात मोठा बदल; मुंबई-पुण्यात 10 ग्रॅमचा भाव कुठे पोहोचला?

Marathi News Live Updates : महाडमध्ये केमिकल कंपनीत गॅस गळतीमुळे एकाचा मृत्यू, ८ गंभीर

MahaDBT Scheme: २९ नव्या योजना महाडीबीटीवर, घरबसल्या १०५ शासकीय योजनांचे लाभ मिळणार; मुख्यमंत्र्यांची घोषणा

SCROLL FOR NEXT