GDP 
अर्थविश्व

‘जीडीपी’मध्ये 0.4 टक्के वाढ; अर्थव्यवस्था रूळावर येण्यास सुरुवात

वृत्तसंस्था

नवी दिल्ली - चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या दोन तिमाहीत कोरोनाच्या महासाथीमुळे घसरलेली देशाची अर्थव्यवस्था आता रूळावर येत असल्याचे दिसत आहे. ऑक्टोबर ते डिसेंबर या तिसऱ्या तिमाहीत देशाच्या एकूण देशांतर्गत उत्पादनात (जीडीपी) 0.4 टक्क्यांची सकारात्मक वाढ झाली आहे. प्रामुख्याने कृषी, सेवा आणि बांधकाम क्षेत्राच्या चांगल्या कामगिरीमुळे ही गोष्ट साध्य झाल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट होते. यामुळे एकूणच देश मंदीच्या गर्द छायेतून बाहेर येण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.

राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाने (एनएसओ) आज ही आकडेवारी जाहीर केली. ‘जीडीपी’ची वाढ पहिल्या दोन तिमाहीनंतर प्रथमच सकारात्मक झाली आहे. सप्टेंबरच्या तिमाहीत ती (- 7.5) टक्के होती. 2019-20 च्या तिसऱ्या तिमाहीत ‘जीडीपी’मध्ये 3.3 टक्के वाढ झाली होती. त्यावेळी ‘जीडीपी’ 36.08 लाख कोटी रुपये होता, जो 2020-21 च्या तिसऱ्या तिमाहीत 36.22 लाख कोटी रुपये असल्याचे वर्तविले गेले आहे. याचाच अर्थ त्यात 0.4 टक्क्यांची वाढ झाली आहे.

जाहीर करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार, कृषी क्षेत्राने 3.9 टक्क्यांची वाढ नोंदविली आहे. याच तिमाहीत उत्पादन क्षेत्रात 1.6 टक्के वाढ झाली. बांधकाम क्षेत्राने 6.2 टक्क्यांची, तर वीज, वायू, पाणी पुरवठा आणि अन्य लोकोपयोगी सेवा क्षेत्राने तब्बल 7.3 टक्क्यांची घसघशीत वाढ नोंदविली. या सर्वांचा परिणाम ‘जीडीपी’च्या सकारात्मकतेत झाला. मात्र, कोरोनाच्या महासाथीचा सर्वाधिक फटका बसलेले हॉटेल व पर्यटन क्षेत्र अजूनही सावरलेले नाही. तिसऱ्या तिमाहीत त्यांच्या व्यवसायाने उणे 7.7 टक्क्यांची नोंद केली.

सरकारच्या दुसऱ्या सुधारित अंदाजानुसार, कोरोनाच्या महासाथीचा फटका बसल्यामुळे 2020-21 या आर्थिक वर्षात ‘जीडीपी’ची वाढ (-) 8 टक्के राहणार असल्याचे म्हटले आहे. जानेवारीतील पहिल्या अंदाजानुसार, यात (-) 7.7 टक्क्यांचा अंदाज वर्तविला गेला होता. 2019-20 या आर्थिक वर्षात 4 टक्क्यांची वाढ झाली होती.

कोरोनाच्या महासाथीचा प्रभाव आणि सातत्याने केल्या गेलेल्या ‘लॉकडाउन’मुळे चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत देशाची अर्थव्यवस्था तब्बल 24.4 टक्क्यांनी घटली होती. दुसऱ्या तिमाहीत सरकारने ‘लॉकडाउन’मध्ये शिथिलता आणल्यामुळे आर्थिक व्यवहारांना काही प्रमाणात चालना मिळाली. त्यामुळे ‘जीडीपी’मध्ये 7.3 टक्केच घट झाली होती.

डिसेंबर 2020 अखेरीस संपलेल्या तिमाहीत 0.4 टक्के वाढ नोंदविली गेल्याने देशाची अर्थव्यवस्था पुन्हा महासाथीच्या पूर्वस्थितीत येत असल्याचे स्पष्ट होत आहे. त्यामुळे अर्थव्यवस्थेत यापुढेही ‘व्ही शेप’मध्ये सुधारणा होण्याची शक्यता प्रतिबिंबित होताना दिसत आहे, असे अर्थ मंत्रालयाने म्हटले आहे.

आर्थिक वर्ष 2020-21 मध्ये वस्तू व सेवाकराच्या (जीएसटी) संकलनाने सलग पाचव्यांदा एक लाख कोटी रुपयांचा आकडा पार केला आहे. त्यावरून लक्षात येते, की घरगुती खर्च वाढण्यास सुरवात झाली आहे. वाहनांची विक्रीही वाढली आहे. विशेषतः सणासुदीच्या हंगामामुळे तिसऱ्या तिमाहीत ते अधिक दिसून येते. पेट्रोल आणि डिझेलची विक्रीही कोरोनाच्या आधीच्या पातळीवर पोचली आहे.

Edited By - Prashant Patil

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Point Table: दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाचा Mumbai Indians ला फटका; सर्व सघांची झाली एक लढत, मोठी उलथापालथ

Supreme Court : अनावश्यक खटले टाळा! अधिकाऱ्याच्या बडतर्फीला आव्हान देणाऱ्या केंद्र सरकारला सुप्रीम कोर्टानं फटकारलं, ठोठावला दंड

Pune BJP News: पुणे महापालिका स्वीकृत नगरसेवकांना थेट पाच वर्षांची मुदत; अडीच वर्षांच्या आशेवर पाणी, अनेक कार्यकर्त्यांचा पत्ता कट

Countries with most uranium: अणुऊर्जेसाठी लागणारं युरेनियम कोणत्या देशाकडे सर्वाधिक आहे? भारत, पाकिस्तान कितव्या क्रमांकावर?

Kidney Transplant : मूत्रपिंड प्रत्यारोपणासाठी १९७० रुग्ण प्रतीक्षेत; पुणे विभागातील १४०० पुरुषांसह ५७० महिलांचाही समावेश

SCROLL FOR NEXT