GST Sakal
अर्थविश्व

GST संकलनात नवा विक्रम; जूनमध्ये मोठा टप्पा पार

जीएसटी संकलन १.४० लाख कोटींच्या पुढे कायम राहिलेलं आहे. त्यामुळे आता तोच तळ निश्चित झाला आहे.

सकाळ डिजिटल टीम

देशात केवळ जून महिन्यात १.४५ लाख कोटी जीएसटी संकलन झालं आहे. अर्थव्यवस्थेसाठी हा मोठा टप्पा असल्याचं अर्थमंत्रालयाने काल स्पष्ट केलं. मार्च महिन्यापासूनच करसंकलन १.४० लाखांच्या पुढे कायम आहे. ग्राहकांच्या मागणीत वाढ आणि अर्थचक्र गतिमान झाल्याचं हे लक्षण आहे, असं अर्थमंत्रालयाने म्हटलं आहे. (GST Collection News)

गेल्या वर्षातल्या जून महिन्याच्या तुलनेत कर संकलन (GST Collection in June 2022) या वर्षी ५६ टक्क्यांनी वाढलं आहे. गेल्या वर्षी जूनमध्ये ९२,८०० कोटींचं संकलन झालं होतं. अर्थमंत्रालयाने (Finance Ministry) प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार, जून २०२२ मधला एकत्रित महसूल १,४४,६१६ कोटींवर पोहोचला आहे. ज्यात केंद्रीय जीएसटी २५,३०६ कोटी, राज्य जीएसटी ३२,४०६ कोटी इतकी होती. एकात्मिक जीएसटी ७५,८८७ कोटी, उपकर संकलन ११,०१८ कोटी इतकी आहे.

जीएसटीला पाच वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने आयोजित केलेल्या कार्यक्रमात बोलताना केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Finance Minister Nirmala Sitharaman) यांनी याविषयी भाष्य केलं आहे. जीएसटी संकलन १.४० लाख कोटींच्या पुढे कायम राहिलेलं आहे. त्यामुळे आता तोच तळ निश्चित झाला आहे. यापुढे ते कायम वाढतच राहील, असंही सीतारामन यांनी सांगितलं आहे.

जीएसटी संकलनाने नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. एप्रिल २०२२ मध्ये देशभरात एकूण १ लाख ६७ हजार ५४० कोटींचा महसूल जीएसटीच्या माध्यमातून गोळा झाला होता. त्यानंतर जून २०२२ मधलं संकलन दुसऱ्या क्रमांकाचं सर्वाधिक संकलन आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

School Trip Rules: शिक्षकांसह विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी! शैक्षणिक सहलीसाठी नवे नियम लागू

CNG Supply: मुंबईतील सीएनजी पुरवठा कधी सुरळीत होणार? एमजीएलने तारीख अन् वेळच सांगितली, वाहनचालकांना मोठा दिलासा

Numerology Predictions : 'या' तारखेला जन्मलेले लोक असतात जास्त निरोगी..वयाची साठी पार केली तर जडत नाहीत आजार

Latest Marathi Breaking News: इचलकरंजी महापालिकेच्या आरक्षणात सहा प्रभागात फेरबदल

Pune News : पुणे महापालिकेत कनिष्ठ अभियंतापदासाठी एक डिसेंबरला परिक्षा

SCROLL FOR NEXT