HDFC Bank  sakal media
अर्थविश्व

HDFCच्या गृहकर्जदारांना झटका; व्याजदरात वाढ

पाहा कधीपासून लागू होणार नवा व्याजदर

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : रिझर्व्ह बँकेनं रेपो दरात ४० बेसिस पॉईंटनी वाढ केल्यानंतर बँकांच्या गृहकर्जांमध्ये वाढ होणार असल्याचं बोललं जात होत. याची सुरुवात एचडीएफसी या खासगी बँकेकडून झाली आहे. HDFCनं शनिवारी आपल्या रिटेल प्राईम लेंडिंग रेटमध्ये (RPLR) ३० बेसिस पॉईंटनं वाढ केली आहे. त्यामुळं सहाजिकचं एचडीएफसीच्या गृहकर्जाच्या दरात वाढ झाली आहे. ही दरवाढ ९ मे पासून लागू होणार आहे. (HDFC hikes home loan rates for all customers to be effective from May 9)

एचडीएफसीनं व्याजदर वाढवल्यानं त्यांच्या ग्राहकांच्या महिन्याच्या गृहकर्जाच्या हप्त्यामध्ये वाढ होणार आहे. महागाईला लगाम घालण्यासाठी रिझव्‍‌र्ह बँकेने आता सानुकूल चलनविषयक धोरण मागे घेण्याचे संकेत दिल्याने व्याजदरात वाढ होणार आहे.

दरम्यान, एसबीआयनं गेल्या महिन्यात MCLRमध्ये १० बेसिस पॉईंटनं वाढ केली होती. तर एचडीएफसी, पीएनबी, आयसीआयसीआय, बँक ऑफ बडोदा, अॅक्सिस बँक आणि कोटक महिंद्रा बँकेनं आपल्या MCLR पॉईंटमध्ये ५ बेसिस पॉईंटनं वाढ केली होती. यानंतर आता येत्या काळात इतर सार्वजनिक आणि खासगी क्षेत्रातील बँकाही वाढ करण्याची शक्यता आहे.

नवे व्याजदर काय असतील?

३० लाखांपर्यंतच्या कर्जासाठी....

HDFC च्या नव्या व्याजदरांमध्ये ०.३० टक्के वाढ झाली असून ३० लाखांपर्यंत गृहकर्ज घेतलेल्या ज्या ग्राहकांचा क्रेडिट स्कोअर ७५० च्यावर आहे. त्यांच्यासाठी पूर्वी ६.७० टक्के व्याजदर होता तो आता ७.०० टक्के असेल. तसेच महिला ग्राहकांसाठी पूर्वी ६.७५ टक्के इतका व्याजदर होता तो आता ७.०५ टक्के असेल. तसेच इतर सर्वांसाठी पूर्वीचा व्याजदर ६.८० टक्के होता तो आता ७.१० टक्के असेल.

३० ते ७५ लाखांदरम्यानच्या कर्जासाठी....

HDFC च्या ३० ते ७५ लाखांपर्यंत गृहकर्ज घेतलेल्या महिला ग्राहकांसाठी पूर्वी ७.०० टक्के इतका व्याजदर होता तो आता ७.३० टक्के असेल. तसेच इतर सर्वांसाठी पूर्वीचा व्याजदर ७.०५ टक्के होता तो आता ७.३५ टक्के असेल.

७५ लाखांहून अधिक कर्जासाठी....

HDFC च्या ७५ लाखांहून अधिक गृहकर्ज घेतलेल्या महिला ग्राहकांसाठी पूर्वी ७.१० टक्के इतका व्याजदर होता तो आता ७.४० टक्के असेल. तसेच इतर सर्वांसाठी पूर्वीचा व्याजदर ७.१५ टक्के होता तो आता ७.४५ टक्के असेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

अमेरिकेचं एक पाऊल मागे, युद्धाला ब्रेक! इराणसोबत सकारात्मक चर्चा, डोनाल्ड ट्रम्प यांनी घेतला मोठा निर्णय

महागड्या फेरारीतही हार्दिक ऐकतो 'हा' मंत्र; म्हणाला - "याहून पॉझिटिव्ह काहीच नाही!" पाहा Viral Video

Satara ZP News: महायुतीत ‘मिठाचा खडा’! साताऱ्याच्या राड्याने सत्ताधाऱ्यांत फूट? भाजप-शिंदे गटात अंतर्गत असंतोष उफाळला

खरातच्या पायाच पडणार! मला तो सारखं बोलवायचा, एकदा अर्ध्या वाटेत गेलो अन्...; जितेंद्र आव्हाडांनी सांगितला अनुभव

Pune News : भोंदूगिरी करणाऱ्या बाबांची यादी ‘अंनिस’ पोलिसांना देणार

SCROLL FOR NEXT