HDFC Bank  Sakal
अर्थविश्व

HDFC लि. अन् HDFC च्या विलीनीकरणाचा ग्राहकांना काय होणार फायदा

HDFC बँक आणि HDFC लिमिटेडच्या दोन कंपन्यांनी सोमवारी विलीनीकरणाची घोषणा केली आहे.

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली : देशातील सर्वात मोठ्या व्यावसायिक समूहांपैकी एक असलेल्या HDFC बँक आणि HDFC लिमिटेडच्या दोन कंपन्यांनी सोमवारी विलीनीकरणाची घोषणा केली आहे. दोन बँकांचे हे विलीनीकरण भारतातील आर्थिक क्षेत्रातील आतापर्यंतचे सर्वात मोठे विलीनीकरण मानले जात असून, दोन्ही कंपन्यांच्या विलीनीकरणाची प्रक्रिया पुढील 18 महिन्यांत पूर्ण होणार आहे.. दरम्यान, या दोन्ही बँकांच्या विलीनीकरणाचा ग्राहकांवर नेमका काय परिणाम होणार आहे हे आपण सविस्तर जाणून घेऊया. (HDFC Ltd Marge With HDFC Bank )

विलीनीकरणाची योजना काय ?

HDFC लिमिटेड ही देशातील सर्वात मोठी गृहकर्ज वितरण (Home Loan) करणारी कंपनी आहे, जिच्या व्यवस्थापनाखालील मालमत्ता सुमारे 5.26 लाख कोटी रुपये आहे, तर कंपनीचे बाजार भांडवल सुमारे 4.44 लाख कोटी रुपये असून, ही आता देशातील सर्वात मोठी खाजगी क्षेत्रातील बँक एचडीएफसी बँकेत विलीन होणार आहे. त्याच बरोबर, HDFC लिमिटेडच्या सर्व उपकंपन्यादेखील HDFC मध्ये हस्तांतरित केल्या जाणार आहेत. HDFC चे बाजार भांडवल सुमारे 8.35 लाख कोटी रुपये आहे. ()

ग्राहकांवर काय होणार परिणाम

विलीनीकरणाबाबत एचडीएफसी लिमिटेडचे अध्यक्ष दीपक पारीख (Deepak Parikh) म्हणाले की, याद्वारे आम्ही कृषी, गृहकर्ज आणि इतर क्षेत्रातील कर्ज अधिक परवडणाऱ्या दरात देऊ शकू. याशिवाया याचा फायदा एचडीएफसी लिमिटेडच्या भागधारकांना 25 समभागांऐवजी 42 एचडीएफसी बँकेचे शेअर्स मिळतील, तर एचडीएफसी लिमिटेडच्या भागधारकांना या विलीनीकरणानंतर एचडीएफसी बँकेतील 41 टक्के भागभांडवल मिळेल.

विलीनीकरणाचा फायदा काय ?

HDFC बँक आणि HDFC Ltd नंतर, कंपनीचा परिचालन खर्च कमी होईल. यामुळे कंपनीला शहरी, निमशहरी आणि ग्रामीण भागात वेगाने विस्तार करण्यास मदत होईल. त्याच वेळी, विलीनीकरणानंतर, HDFC बँक TCS ला मागे टाकून बाजार भांडवलाच्या बाबतीत रिलायन्सनंतर भारतातील दुसरी सर्वात मोठी कंपनी बनू शकते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT