Best Stocks to Buy
Best Stocks to Buy Sakal
अर्थविश्व

सौदा फायद्याचा! 'हा' मल्टीबॅगर स्टॉक 5 दिवसांत 11 टक्के घसरला

शिल्पा गुजर

गेल्या 5 वर्षात हिकलच्या शेअर्समध्ये अडीच पट वाढ झाली आहे. (Best Stocks to Buy)

Multibagger Stock : हिकल लिमिटेड (Hikal Limited) ही एक B2B कंपनी आहे, जी ग्लोबल फार्मा कंपन्या, अॅनिमल हेल्थ कंपन्या, क्रॉप प्रोटेक्शन कंपन्या आणि स्पेशालिटी केमिकल कंपन्यांना मध्यवर्ती इंटरमीडिएट्स आणि एक्टिव इंग्रिडियेंट्सचा सप्लाय करते. गेल्या 5 वर्षात हिकलच्या शेअर्समध्ये अडीच पट वाढ झाली आहे. मार्च 2017 मध्ये एका शेअरची किंमत 137 रुपये होती, ती आता 364 रुपयांपर्यंत वाढली आहे. पण, गेल्या 5 व्यापार सत्रांमध्ये, या शेअरमध्ये कमजोरी दिसून येत आहे आणि तो 11 टक्क्यांनी घसरला आहे. 2022 च्या सुरुवातीपासून आतापर्यंत 31 टक्क्यांनी घसरला आहे.

ब्रोकरेज आयसीआयसीआय सिक्युरिटीजने प्रोटेक्शनसाठी सीडीएमओकडून मागणी वाढल्याने, फार्मा कंपन्यांकडून एक्सपेक्टेड रेश्योमधील वाढ आणि कॅपिटल एक्सपेंडिचरमध्ये सुधारणा या सगळ्यामुळे हिकल लिमिटे़डच्या शेअर्सना 'BUY'दिले आहे. आयसीआयसीआय सिक्युरिटीजने ब्रोकरेजने या मल्टीबॅगर स्टॉकला 12 महिन्यांच्या कालावधीसाठी 500 रुपयांचे टारगेट निश्चित केले आहे.

हिकल लिमिटेडने (Hikal Limited) चालू आर्थिक वर्षाच्या डिसेंबर तिमाहीत 45 कोटी रुपयांचा निव्वळ नफा नोंदवला आहे, जो वार्षिक तुलनेत 12.2 टक्क्यांनी वाढला आहे. या कालावधीत कंपनीचा महसूल वार्षिक 11 टक्क्यांनी वाढून 514.5 कोटींवर पोहोचला आहे. डिसेंबर तिमाहीत कंपनीचा वार्षिक EBITDA 1.7 टक्क्यांनी वाढून 93 कोटी रुपये झाला. त्याच वेळी, कंपनीचा EBITDA मार्जिन 18 टक्के राहिला.

हिकल लिमिटेडच्या (Hikal Limited) ऑपरेटिंग रेव्हेन्यूमध्ये फार्माचा वाटा 62 टक्के आणि पीक संरक्षणातून 38 टक्के आहे. कंपनीचा फार्मा व्यवसाय सध्या API आणि CDMO मध्ये 50:50 च्या प्रमाणात विभागलेला आहे. त्याच वेळी, सीडीएमओ व्यवसायातील 20-25 टक्के महसूल पशु आरोग्य विभागातून (Animal Health Segment) येतो.

मंगळवारी एनएसईवर हिकल लिमिटेडचे (Hikal Limited) शेअर 4.65 टक्क्यांच्या घसरणीसह 364.05 रुपयांवर बंद झाले. 2022 च्या सुरुवातीपासून हा स्टॉक 31.31 टक्क्यांनी घसरला आहे. पण, गेल्या एका वर्षात, त्याने आपल्या गुंतवणूकदारांना 133 टक्के मल्टीबॅगर परतावा दिल्याचे विसरुन चालणार नाही.

नोंद : क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amit Shah Fake Video Case : झारखंड काँग्रेसचं एक्स अकाऊंट सस्पेंड; अमित शाह व्हिडीओ प्रकरणात मोठी कारवाई

Google Error : गुगल डाऊन! जगभरातील युजर्स त्रस्त; अमेरिकेतून 1400 तक्रारी

Yogi Adityanath : काँग्रेस सत्तेत आल्यास हिंदूंची विभागणी होईल - योगी आदित्यनाथ

IPL 2024, CSK vs PBKS: चेन्नईला पंजाबच्या गोलंदाजांनी रोखलं अन् फलंदाजांनी ठोकलं; ऋतुराजसेनेचा बालेकिल्ल्यात दुसरा पराभव

Loksabha election 2024 : जेडीयूचे माजी प्रदेशाध्यक्ष शशांक राव यांचा भाजपात प्रवेश; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची उपस्थिती

SCROLL FOR NEXT