IPO Sakal media
अर्थविश्व

मर्कोलाईन्स ट्रॅफिकचा आयपीओ; हायवेची देखभाल व संचालन करणारी आघाडीची कंपनी

कृष्ण जोशी

मुंबई : देशातील महामार्गांचे संचालन व देखभाल-दुरुस्ती (Highway repairing) करणारी देशातील आघाडीची कंपनी मर्कोलाईन्स ट्रॅफिकची (Markolines Traffic) प्राथमिक भागविक्री (IPO) 15 ते 20 सप्टेंबरपर्यंत खुली राहणार आहे. त्या शेअरची (shares) 78 रुपये किंमत ठेवण्यात आली आहे. कंपनीचे संस्थापक अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक संजय पाटील (Sanjay Patil) यांनी आज येथे प्रत्यक्ष स्वरूपात घेतलेल्या पत्रकार परिषदेत (press conference) ही माहिती दिली.

ही कंपनी देशभर विविध ठिकाणी महामार्गांचे संचालन (टोल वसुली) तसेच देखभाल-दुरुस्ती करते. राज्यातही धुळे, पुणे, सोलापूर जिल्ह्यातील महामार्ग तसेच मुंबईतील पूर्व द्रुतगती महामार्गाच्या दुरुस्तीचे काम ही कंपनी पहाते. आमची कंपनी या क्षेत्रातील आघाडीची कंपनी (मार्केट लीडर) असून सध्याच्या बाजारपेठेतील 35 ते 50 टक्के वाटा आमच्याकडे आहे, असेही पाटील म्हणाले. टोलवसुली, दुरुस्ती व देखभाल, अपघात व इतर दुर्घटना व्यवस्थापन अशी सर्व प्रकारची कामे या क्षेत्रातील अन्य कोणीतीही कंपनी करीत नाही, असेही ते म्हणाले.

मर्कोलाईन्सने स्वस्त व मजबूत रस्ते बनविण्यासाठी मायक्रोसरफेसिंग हे आधुनिक तंत्रज्ञान आणले असून त्यामुळे दोन तासांत रस्ता वाहतुकीस खुला होतो. एरवीच्या तंत्रज्ञानाने त्यासाठी आठ तास लागतात. कंपनीच्या मुंबईतील स्वतःच्या प्रयोगशाळेत बांधकाम साहित्याची काटेकोर तपासणी होते. कंपनीने गेल्या पाच वर्षांत 64 लाख चौरस मीटर क्षेत्रफळाचे मायक्रोसरफेसिंग केले असून कंपनीतर्फे रोज साडेतीन लाख वाहने हाताळली जातात. या काळात कंपनीने दहा हजार कोटी रुपयांचा व्यवसाय केला असून यात सहा हजार कोटींची टोलवसुली आहे.

लार्सन अँड टुब्रो, पीडब्ल्यूडी, एमएमआरडीए, एचसीसी, टाटा रिअल्टी अँड इन्फ्रा, पिंक सिटी एक्सप्रेस वे, मधुकॉन, उत्तराखंड राज्य आदी कंपन्यांतर्फे मार्कोलाईन्सला कामे दिली जातात. सध्या कंपनीच्या हातात एक हजार कोटी रुपयांची कामे आहेत, असे मुख्य अर्थ अधिकारी विजय ओसवाल म्हणाले. या आयपीओ मध्ये 51 लाख 28 हजार शेअरची विक्री केली जाईल व त्यातून 39 कोटी 90 लाख रुपयांचे भागभांडवल गोळा केले जाईल. त्यापैकी 23 कोटी रुपये खेळत्या भांडवलाच्या गरजेसाठी तर उरलेली रक्कम कर्जफेडीसाठी व कंपनीच्या अन्य गरजांसाठी वापरली जाईल. ग्रेटेक्स कॉर्पोरेट्स सर्व्हिसेस लि. हे या पब्लिक इशू चे मर्चंट बँकर आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai News: मुंबईकरांसाठी बीएमसीची दिवाळी भेट! ४२६ सदनिकांच्या विक्री प्रक्रियेला सुरूवात होणार? अर्ज कधी आणि कुठे करायचा?

Uttrakhand : कुंभमेळ्यासाठी हरिद्वारमध्ये निर्माण केले जाणार नवे शहर; ३२ सेक्टर, एक पोलिस स्टेशन आणि एक रुग्णालयाचा असेल समावेश

Dhule News : दिवाळीत प्रवाशांना दिलासा! धुळे एसटी विभागाचा 'मेगाप्लॅन': ७३० बसेसद्वारे विशेष वाहतूक नियोजन

PCOS and Pregnancy Diabetes: PCOS आणि गर्भधारणेतील मधुमेह होण्याच्या शक्यतेचा काय आहे संबंध? जाणून घ्या उपाययोजना

Tejas MK 1A: हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड इतिहास घडवणार! तेजस एमके १ए लढाऊ विमान उड्डाणासाठी सज्ज, पण नाशिकमधून उड्डाण का?

SCROLL FOR NEXT