Hindustan Coppers esakal
अर्थविश्व

हिंदुस्थान कॉपरचा ऑफर फॉर सेल आजपासून खुला

सकाऴ वृत्तसेवा

हिंदुस्थान कॉपरच्या ऑफर फॉर सेलची इश्यू प्राईस 116 रुपये निश्चित करण्यात आली आहे.

- शिल्पा गुजर

सरकार हिंदुस्थान कॉपर मधील (Hindustan Copper) 10 टक्के हिस्सा विकण्याच्या तयारीत आहे. सरकार हा हिस्सा 1122 कोटी रुपयांना विकणार आहे. सरकार हिंदुस्थान कॉपरमधील 10 टक्के हिस्सा ऑफर फॉर सेलच्या माध्यमातून विकणार असल्याची माहिती गुंतवणूक आणि सार्वजनिक मालमत्ता व्यवस्थापन विभागाचे सचिव तुहीन कांत पांडे यांनी बुधवारी ट्विट करुन दिली. यात 5 टक्के ग्रीन शू पर्याय आहे. हिंदुस्थान कॉपरचा ऑफर फॉर सेल (OFS) आजपासून सुरु झाला आहे. पण किरकोळ गुंतवणूकदार शुक्रवारी बोली लावतील, अशी शक्यता आहे.

हिंदुस्थान कॉपरच्या ऑफर फॉर सेलची इश्यू प्राईस 116 रुपये निश्चित करण्यात आली आहे. हिंदुस्थान कॉपरचे शेअर्स बुधवारी 1.27 टक्क्यांनी घसरून 124.5 रुपयांवर बंद झाले. आर्थिक वर्ष 2021 मध्ये हिंदुस्थान कॉपरचा निव्वळ नफा 110 कोटी रुपये होता, तर आर्थिक वर्ष 2020 मध्ये तो 598 कोटी रुपयांचे नुकसान झाले होते. आर्थिक वर्ष 2021 मध्ये केंद्रीय सार्वजनिक क्षेत्रातील एंटरप्राइझचे (CPSE) एकूण उत्पन्न 1822 कोटी रुपये होते. तर आर्थिक वर्ष 2020 मध्ये कंपनीचा महसूल 888.81 कोटी रुपये होता.

सरकारने आर्थिक वर्ष 2022 मध्ये निर्गुंतवणुकीतून 1.75 लाख कोटी रुपये उभे करण्याचे लक्ष्य ठेवले आहे. मात्र, आतापर्यंत सरकारला केवळ 8369 कोटी रुपयेच उभे करता आले आहेत. सरकारने अॅक्सिस बँकेतील आपला संपूर्ण हिस्सा विकला आहे. सरकारने एसयूटीआयद्वारे SUUTI (pecified Undertaking of the Unit Trust of India) हिस्सा विकला होता. अॅक्सिस बँकेतील आपला हिस्सा विकून 3994 कोटी रुपये जमवले. एनएमडीसीमधील (NMDC) हिस्सा विकून 3654 कोटी रुपये जमा केले. दुसरीकडे, सरकारने हुडकोमधील (Hudco)हिस्सा विकून 720 कोटी रुपये जमा केले आहेत.

नोंद: क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Rain Update : पुण्यात जोरदार पावसाची अचानक हजेरी, नागरिकांची उडाली तारांबळ; घाटमाथ्यावर सतर्कतेचा इशारा

IND vs ENG 1st T20I: भारत-इंग्लंड मॅच नक्की कुठे पाहायची, Sony की Star Sports? चाहते कन्फ्युज; JioHotstar वाल्याचं काय?

Child Crime: अल्पवयीन गुन्हेगारांना आता सवलत नाही? वयोमर्यादा १८ वरून १६ वर्षांवर आणणार; महाराष्ट्र सरकारचा मास्टरस्ट्रोक

सलमानसोबतच्या ब्रेकअपनंतर ऐश्वर्याला 'त्या' गोष्टीची वाटायची प्रचंड भीती, इतक्या वर्षानंतर झाला खुलासा

Latest Marathi News Live Update : बीडमध्ये शेतीच्या वादातून तलवारीचा हल्ला; काकाची बोटं छाटली, चुलत भावावरही वार

SCROLL FOR NEXT