sensex  Google
अर्थविश्व

‘ट्रेलिंग स्टॉपलॉस’ कशासाठी?

भूषण गोडबोले

गेल्या आठवड्यात ‘सेन्सेक्स’ ५२,९७५ अंशांवर, तर ‘निफ्टी’ १५,८५६ अंशांवर बंद झाला. गेल्या शुक्रवारी झोमॅटो कंपनीच्या शेअरचे बाजारात जोरदार आगमन झाले. तसेच रिलायन्स इंडस्ट्रीजने चालू वर्षाच्या पहिल्या तिमाहीत चांगला नफा मिळविला आहे. येत्या आठवड्यात ॲक्सिस बँक, कोटक महिंद्रा बँक, लार्सन अँड टुब्रो, एसबीआय लाइफ इन्शुरन्स आदी कंपन्यांचे निकाल जाहीर होतील. आलेखानुसार आगामी काळासाठी ‘सेन्सेक्स’ची ५१,६००, तर ‘निफ्टी’ची १५,४५० ही महत्त्वाची आधार पातळी आहे. (How does a trailing stop loss work?)

‘कल्याणी स्टील’मध्ये तेजी

गेल्या शुक्रवारी मेटल क्षेत्रातील टाटा स्टील, जिंदाल स्टेनलेस, कल्याणी स्टील आदी कंपन्यांच्या शेअरनी वर्षभरातील उच्चांक नोंदविला. कल्याणी स्टील या कंपनीचा शेअर आलेखानुसार तेजीचा कल दर्शवित आहे. ही कंपनी प्रामुख्याने लोह व स्टील उत्पादनांच्या निर्मिती व विक्रीचा व्यवसाय करते. दोन ऑगस्ट २०२१ रोजी कंपनीचे तिमाही निकाल जाहीर होणार आहेत.

आलेखानुसार या कंपनीच्या शेअरने १९ मे २०२१ पासून रु. ४१८ ते ३५४ या मर्यादित पातळ्यांमध्येच व्यवहार केल्यावर गेल्या शुक्रवारी एकूण उलाढालीत लक्षणीय वाढ दर्शविली. रु. ४३७ ला बंद भाव देऊन मध्यम अवधीसाठी तेजीचे संकेत दिले आहेत. आलेखानुसार या कंपनीच्या शेअरचा भाव जोपर्यंत रु. ३५३ या आधार पातळीच्या वर आहे, तोपर्यंत मध्यम अवधीमध्ये चढ-उतार करीत आणखी भाववाढ होऊ शकेल.

‘बालाजी अमाईन्स’कडे लक्ष

स्पेशालिटी केमिकल क्षेत्रातील बालाजी अमाईन्स या कंपनीच्या शेअरने आलेखानुसार २५ मे २०२१ पासून रु. ३०३४ ते २४५० या मर्यादित पातळ्यांमध्येच चढ-उतार केल्यावर गेल्या शुक्रवारी रु. ३०४५ ला बंद भाव देऊन आलेखानुसार तेजीचा कल दाखविला आहे. या कंपनीचे देखील दोन ऑगस्ट २०२१ रोजी तिमाही निकाल जाहीर होणार आहेत. आगामी काळात रु. ३१८० या अडथळा पातळीच्या वर शेअरने बंद भाव दिल्यास जोपर्यंत भाव रु. २४५० या पातळीच्या वर आहे, तोपर्यंत मध्यम अवधीमध्ये आणखी तेजी दिसू शकेल.

बाजारात तेजीचा बोलबाला असताना, ‘पोर्टफोलिओ’मध्ये ‘ट्रेडिंग’साठी घेतलेल्या काही शेअरमध्ये तोटा होत असेल; तसेच काही शेअरमध्ये मोठ्या प्रमाणात भाववाढ होत असताना दिसत असेल तर काय करावे, असा प्रश्न पडतो. ब्रिटिश अर्थतज्ज्ञ डेव्हिड रिकार्डो म्हणतात, ‘कट शॉर्ट युअर लॉसेस अँड लेट युअर प्रॉफिटस रन’ अर्थात ‘ट्रेडिंग’ करताना ज्या शेअरमध्ये तोटा होत आहे, तिथे ‘स्टॉपलॉस’चा वापर करून योग्य वेळेस बाहेर पडावे. यामुळे तोटा मर्यादित राहतो. मात्र, ज्या शेअरमध्ये नफा मिळत आहे, त्या शेअरमध्ये गडबड करून पूर्ण बाहेर पडू नये, पोर्टफोलिओमधील वाढणाऱ्या शेअरमध्ये गरजेनुसार काही प्रमाणात नफा घेऊन राहिलेल्या शेअरसाठी आलेखानुसार आकलन करून ‘स्टॉपलॉस’ वरच्या बाजूस ‘ट्रेल’ करणे म्हणजेच सद्यःस्थितीनुसार आधार पातळीखाली ‘स्टॉपलॉस’ ठेऊन प्रतीक्षा करणे फायदेशीर ठरू शकते.

उदा. एखाद्या शेअरची पूर्वी रु. २०० ला खरेदी केली असेल आणि शेअरचा सध्याचा भाव रु. ५०० असेल, अशा वेळेस आलेखानुसार जर मागील तीन महिन्यांत शेअर रु. ४०० या पातळीच्या खाली गेला नसेल अर्थात आलेखानुसार जर रु. ४०० ही आधार पातळी असेल, तर पूर्वी रु. २०० ला खरेदी केलेल्या शेअरसाठी आता रु. ४०० या आधार पातळीखाली रु. ३९९ हा नवा ‘ट्रेंलिग स्टॉपलॉस’ लक्षात घ्यावा. यामुळे जर आगामी काळात शेअरमध्ये मोठ्या प्रमाणात पडझड होऊन भाव रु. ३९९ झाला तर नफा घेऊन बाहेर पडावे. मात्र, पडझड होण्याऐवजी रु. ५०० वरून शेअरचा भाव जर रु. ७०० कडे झेपावला, तर पूर्वी रु. २०० ला खरेदी केलेल्या शेअरवर नफा आणखी वाढेल आणि ‘लेट्स युअर प्रॉफिटस रन’ या मंत्राचा लाभ मिळेल.

लेखातील माहिती अभ्यासाच्या दृष्टिकोनातून दिली गेली आहे. यामुळे प्रत्यक्ष व्यवहार करताना जोखीम ओळखून वैयक्तिक गुंतवणूक सल्लागाराचा सल्ला घेणे नेहमीप्रमाणेच आवश्यक आहे.

(लेखक ‘सेबी’ नोंदणीकृत गुंतवणूक सल्लागार आहेत.)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

M Phil Professors : १४२१ प्राध्यापकांना मिळाला दिलासा! एम. फिल धारक प्राध्यापकांना अखेर नेट/सेटमधून सूट

Latest Maharashtra News Live Updates: मराठीत बोललो तर माध्यम माझी भावना सर्व महाराष्ट्रातील लोकांना लाईव्ह दाखवतील - फडणवीस

Thane News: ठाण्यात उभी राहणार ग्रीनवॉल! पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी वृक्ष प्राधिकरण विभागाचा निर्णय

Pune News : तीन वर्षात टाकली केवळ ९ किलोमीटरचीच सांडपाणी वाहिनी; प्रशासनाने टोचले ठेकेदाराचे कान

Monsoon Session: तुकडेबंदी कायदा रद्द! पुढे कशी असेल कार्यप्रणाली? 'त्या' जमिनींना नियमातून वगळले

SCROLL FOR NEXT