Currency  sakal
अर्थविश्व

Exchange Notes : तुमच्याकडेही फाटलेल्या नोटा आहेत का? ‘अशा’ बदलता येतील नोटा

अनेक वेळा तुम्हाला बाजारात दुकानदाराकडून, एटीएममधून किंवा बँकेतून फाटलेल्या नोटा मिळतात. अशा स्थितीत आता त्या नोटा बाजारात चालतील की नाही या विचाराने आपण अस्वस्थ होतो.

सकाळ डिजिटल टीम

अनेक वेळा तुम्हाला बाजारात दुकानदाराकडून, एटीएममधून किंवा बँकेतून फाटलेल्या नोटा मिळतात. अशा स्थितीत आता त्या नोटा बाजारात चालतील की नाही या विचाराने आपण अस्वस्थ होतो. आता तुम्हाला  घाबरण्याची गरज नाही. या नोटा कोणत्याही बँकेच्या कोणत्याही शाखेत सहज बदलता येतात. बँकेने या नोटा बदलून देण्यास नकार दिल्यास तुम्ही त्याविरोधात तक्रार करू शकता.

मात्र अशा नोटा बदलून घेण्यासाठी आरबीआयने मार्गदर्शक तत्त्वे जाहीर केली आहेत. त्यामुळे या मार्गदर्शक तत्वांना जाणून घेणे फार महत्वाचे आहे. मात्र एक गोष्ट लक्षात असुद्या की, नोटेची स्थिती जितकी खराब होईल तितकी तिची किंमत कमी होईल. या नोटांबाबत आरबीआयच्या काय सूचना आहेत ते जाणून घेऊयात.

कोणत्या नोटा बदलल्या जाऊ शकतात?

नोटेवर गांधीजींचा फोटो, आरबीआय गव्हर्नरची स्वाक्षरी आणि अनुक्रमांक दिसत असल्यास बँक अशा नोटा बदलून देण्यास नकार देणार नाही. जर 5, 10, 20 किंवा 50 रुपयांच्या फाटलेल्या नोटा असतील तर अशा नोटांचा अर्धा भाग तुमच्याकडे असावा. तसे न झाल्यास नोट बदलली जाणार नाही. जर फाटलेल्या नोटांची संख्या 20 पेक्षा जास्त असेल आणि त्यांची किंमत 5,000 रुपयांपर्यंत जास्त असेल, तर नोटा बदलण्यासाठी काही फी भरावी लागेल. एकापेक्षा जास्त तुकडे असलेल्या नोटा देखील बदलल्या जाऊ शकतात. त्यांचे रूपांतर करण्याची प्रक्रिया थोडी क्लिष्ट आहे. ही नोट तुम्हाला पोस्टाद्वारे रिझर्व्ह बँकेच्या शाखेत पाठवावी लागेल. यासोबतच तुमचा खाते क्रमांक, शाखेचे नाव, आयएफएससी कोड, नोटेची किंमत याचीही माहिती देणे आवश्यक आहे.

 नोट कधी बदलणार नाही?

फाटलेल्या नोटा किंवा जळलेल्या नोटा कोणत्याही सामान्य बँकेत बदलता येत नाहीत. यासाठी तुम्हाला थेट आरबीआयशी (RBI) संपर्क साधावा लागेल. याशिवाय नोटांवर घोषवाक्य किंवा राजकीय संदेश लिहिलेले असतील तर अशा नोटा बदलल्या जाणार नाहीत. तुम्ही नोटा मुद्दाम फाडल्या किंवा कापल्या असं जरी बँक अधिकाऱ्याला वाटत असेल, तरीही तो नोट बदलण्यास नकार देऊ शकतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्रापासून दिल्लीपर्यंत आज दिवसभरात काय घडलं? एका क्लिकवर पहा सर्व महत्त्वाचे अपडेट्स

मोठी बातमी! भाजपकडून ३ बड्या नेत्यांची पक्षातून हकालपट्टी, राजकारणात खळबळ

SCROLL FOR NEXT