FD Return google
अर्थविश्व

FD Return : एफडीमध्ये गुंतवणूक करताना अशी हुशारी वापरा आणि भरपूर पैसे कमवा

एफडीमध्ये हुशारीने गुंतवणूक केल्यास जास्तीत जास्त परतावा तर मिळतोच; पण कर आणि दंडही वाचवता येतो.

नमिता धुरी

मुंबई : महागाई रोखण्यासाठी आरबीआयने गेल्या वर्षी पाच वेळा व्याजदरात वाढ केली होती. त्यामुळे गृहकर्जासह सर्व प्रकारची कर्जे लोकांसाठी महाग झाली असली तरी मुदत ठेवींमध्ये (एफडी) गुंतवणूक करणाऱ्यांची मात्र चांदी झाली आहे.

अलीकडेच अनेक बँकांनी एफडीवरील व्याजदरात लक्षणीय वाढ केली आहे. अनेक बँका एफडीवर सात टक्क्यांपेक्षा जास्त व्याज देत आहेत. ज्येष्ठ नागरिकांसाठी हा दर ८.३ टक्क्यांवर पोहोचला आहे. म्हणजेच एफडीमध्ये अतिरिक्त रोख गुंतवण्याची ही सर्वोत्तम वेळ आहे.

एफडीमध्ये हुशारीने गुंतवणूक केल्यास जास्तीत जास्त परतावा तर मिळतोच; पण कर आणि दंडही वाचवता येतो. हेही वाचा - द मिसिंग टाइल सिंड्रोम ठेवा आपल्यापासून दूर

5nance.com चे CEO आणि संस्थापक दिनेश रोहिरा म्हणाले की, एकरकमी जमा करण्याऐवजी अनेक कालावधीसाठी लहान रक्कम जमा करावी. प्रत्येक ठेवीसाठी निश्चित लक्ष्य किंवा आर्थिक उद्दिष्ट असावे.

यामुळे गुंतवणूक अधिक तरल होईल. जर तुम्ही पाच वर्षांची एफडी केली असेल आणि तीन वर्षांनंतर तुम्हाला पैशांची गरज असेल, तर तुम्हाला एफडी तोडल्याबद्दल ०.५ ते १ टक्के दंड भरावा लागेल. दुसरीकडे, जर तुमच्याकडे एक, दोन, तीन आणि चार वर्षांच्या चार लहान एफडी असतील तर तुमच्याकडे गरजेच्या वेळी पैसे असतील आणि त्यासाठी तुम्हाला दंड भरावा लागणार नाही.

FD वर सर्वाधिक व्याज

बँक (दोन वर्षांसाठी) व्याज दर (% मध्ये)

DCB बँक - 7.85

फेडरल बँक - 7.25

इंडसइंड बँक - 7.25

AU स्मॉल फायनान्स बँक - 7.20

अॅक्सिस बँक - ७.००

ज्येष्ठ नागरिकांसाठी -

बँक (दोन वर्षांसाठी) व्याज दर (% मध्ये)

DCB बँक - 8.30

इंडसइंड बँक - 7.85

अॅक्सिस बँक - 7.75

फेडरल बँक - 7.75

AU स्मॉल फायनान्स बँक - 7.70

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Supreme Court चे माजी न्यायाधीशच उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांविरोधात सर्वोच्च न्यायालयात; नेमकं काय घडलं?

UP Freedom Struggle Circuit: स्वातंत्र्यलढ्याच्या आठवणी आता पर्यटकांना अनुभवता येणार; यूपीमध्ये ‘स्वातंत्र्य संग्राम सर्किट’

Nalasopara News: बर्थडेचा केक खाताच ११ जणांना विषबाधा, केकमध्ये आढळलं...

Marathi News Live Updates : पंजाब हरियाणातील शेतकऱ्यांचा आज दिल्लीकडे मोर्चा

ममतांचे निकटवर्तीय आणि विधानसभेच्या माजी उपसभापतींचा संशयास्पद मृत्यू, लटकलेल्या अवस्थेत पक्ष कार्यालयातच आढळला मृतदेह

SCROLL FOR NEXT