लहानांपासून मोठे होतपर्यंत आपण आपल्या आयुष्यात अनेक गोल्स सेट करत मोठे होत असतो. हे सगळे गोल्स बाजूला ठेवत सुखी समृद्ध आयुष्य जगण्यासाठी महत्वाचं ठरणारं गोल म्हणजे 'Financial Goal'. अनेकांना हे गोल साध्य करणं जमत नाही आणि मग आर्थिक तणाव निर्माण होतो. मात्र जर का तुम्हाला तुमचं फायनांशियल गोल सेट करून ते व्यवस्थित साध्य करता आलं तर तुमचा आर्थिक तणाव कायमचा दूर होईल. त्यासाठी दिलेल्या सहा सोप्या टीप्स फॉलो कराव्या. (Financial Goal tips to get wealthy and healthy life)
1. एक यादी तयार करा
बऱ्याचदा लोक गोल सेट करत असताना फक्त मोठ्या गोष्टींचा विचार करतात. उदा-घर विकत घेणे,पदवी शिक्षण,सेवानिवृत्ती. मात्र गोल सेट करण्यात लहान गोष्टीही फार महत्वाच्या असतात. उदा- जर तुम्ही तुमच्या घरी तुमच्या पालकांसाठी होम थिएटर घेण्याचा विचार करत असाल किंवा एखादी ड्रीम वस्तू घेण्याच्या विचारात असाल तर अशा वेळी या गोष्टींची तुम्ही एक यादी बनवायला हवी. म्हणजे इएमआय भरून लांब पल्ल्यात पैसे गुंतवण्याऐवजी तुम्ही या वस्तूंसाठी पैसे वाचवायला सज्ज व्हाल.
2. आवश्यक वस्तूंना प्राधान्य द्या
आपण अनेकदा निरर्थक गोष्टींत पैशांची उधळणपट्टी करत असतो. मात्र तुम्ही जर का आवश्यक गोष्टींना प्राधान्य देण्यास सुरूवात केली तर तुमचं फायनांशियल बजेट कायम फिट असेल. इतरांशी स्पर्धा करण्यासाठी विनाकारण महागड्या वस्तू घेत स्पर्धा करण्याचा मानवी स्वभाव असतो. मात्र यावर नियंत्रण ठेवावे.
3. तुमच्या कुटुंबाची काळजी घ्या
अचानक येणाऱ्या आपत्तीमुंळेही आर्थिक बॅलेंस ढासळतो. त्यामुळे तुमच्या कुटुंबाची आणि त्यांच्या आरोग्याची वेळोवेळी काळजी घ्या. तसेच तुमच्या कुटुंबातील सगळ्यांचे हेल्थ इंशॉरन्स काढा.
4. गोल सेट करण्याचा वेळ ठरवा
एकदा तुमची यादी तयार झाली की तुम्ही सेट केलेलं गोल तुम्हाला कधी साध्य करायचं आहे ते ठरवा. त्यानुसार पैसे जमवण्याच्या तयारीला लागा.
5. वेगवेगळे पोर्टफोलिओ तयार करा
तुम्ही सेट केलेली काही ध्येय साध्य झाली की प्रत्येक ध्येयासाठी एक वेगळा पोर्टफोलिओ बनवा. त्यामध्ये तुम्हाला कोणती गोष्ट किती वर्षात किंवा काळात साध्य करायची आहे याचा उल्लेख असू द्या.
6. यादीतील ध्येयांना वारंवार लक्षात ठेवा
तुम्ही साध्य करण्यासाठी यादी केलेले गोल्स हे कागदावरच असता कामा नये याची काळजी घेणे फार महत्वाचे ठरते. त्यामुळे तुम्हाला यादी केलेले गोल्स अचिव करायचे आहेत याची वेळोवेळी स्वत:ला आठवण करून द्या. आणि त्याबाबत ठाम राहा.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.