Budget 2022: राज्यात सीएनजी स्वस्त होणार; अर्थसंकल्पात महत्त्वपूर्ण घोषणा

Budget 2022: राज्यामध्ये सीएनजी स्वस्त होणार असल्याची घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवारांनी अर्थसंकल्पीय भाषणात केली आहे.
Pune : सीएनजी पुन्हा दोन रुपयांनी महागला
Pune : सीएनजी पुन्हा दोन रुपयांनी महागलाsakal media

Budget 2022: आज महाराष्ट्र विधानसभेत राज्यात अर्थसंकल्प सादर करण्यात आला. उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी अर्थसंकल्प विधानसभेत मांडला. यावेळी विविध क्षेत्रांसाठी घोषणा करण्यात आल्या. पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किंमती लक्षात घेता सीएजीच्या किंमती (CNG) कमी होणार असल्याचं अजित पवारांनी विधानभवनात सांगितले. त्यामुळे सर्वसामान्यांना दिलासा मिळू शकते. CNG आणि PNG (पाईप गॅस घरातील) वरील टॅक्स १३ टक्क्यांवरून ३ टक्के केला जाणार आहे. त्यामुळे राज्य सरकारला ८०० ते १००० कोटींचा फटका बसणार आहे. परंतु सर्वसामान्यांना मात्र दिलासा मिळणार आहे. (CNG will be cheaper in the state; Important announcement in the budget)

Pune : सीएनजी पुन्हा दोन रुपयांनी महागला
Budget 2022: अर्थसंकल्पातील पंचसूत्री; जाणून घ्या प्रमुख घोषणा

अर्थमंत्री अजित पवार यांनी आज राज्याचा अर्थसंकल्प सादर केला. त्यांनी विकासाची पंचसूत्री सादर केली. याअंतर्गत कृषी, आरोग्य, मनुष्यबळ विकास, दळणवळण आणि उद्योग या क्षेत्रासाठी तरतूदी करण्यात आल्या आहेत. येत्या तीन वर्षांत 4 लाख कोटी रूपये उपलब्ध करुन देणार. कृषी व संलग्न क्षेत्रांसाठी 23 हजार 888 कोटी. आरोग्य क्षेत्रासाठी 5 हजार 244 कोटी रुपये, मानव व मनुष्यबळ विकासासाठी 46 हजार 667 कोटी तरतुद, पायाभूत सुविधा व वाहतुकीसाठी 28 हजार 605 कोटी, उद्योग व उर्जा विभागासाठी 10 हजार 111 कोटीची तरतुद करण्यात आली आहे.येत्या तीन वर्षांत 4 लाख कोटी रूपये उपलब्ध करुन देणार. कृषी व संलग्न क्षेत्रांसाठी 23 हजार 888 कोटी. आरोग्य क्षेत्रासाठी 5 हजार 244 कोटी रुपये, मानव व मनुष्यबळ विकासासाठी 46 हजार 667 कोटी तरतुद, पायाभूत सुविधा व वाहतुकीसाठी 28 हजार 605 कोटी, उद्योग व उर्जा विभागासाठी 10 हजार 111 कोटीची तरतुद करण्यात आली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com