अर्थविश्व

गाडीसाठी इन्शुरन्स काढताय, तर हे नक्की वाचा

ओंकार भिडे

मुंबई : गाडीसाठी  इन्शुरन्स काढायचा असल्यास खालील माहिती तुमच्यासाठी नक्कीच उपयुक्त आहे. हे आहेत काही प्रश्न आणि त्यांची उत्तरे.

प्रश्न : मला नवे वाहन घेऊन पुढील महिन्यात एक वर्ष पूर्ण होणार आहे. मी कॉम्प्रिहेन्सिव्ह इन्शुरन्स करावा की केवळ थर्ड पार्टी इन्शुरन्स करणे योग्य ठरेल?
उत्तर : मोटर वाहन कायद्यानुसार वाहनाचा थर्ड पार्टी इन्शुरन्स करणे बंधनकारक आहे. त्यामुळे कॉम्प्रिहेन्सिव्ह इन्शुरन्स बंधनकारक नसला, तरी थर्ड पार्टी इन्शुरन्स लागते. तसेच गाडीच्या कॉम्प्रिहेन्सिव्ह इन्शुरन्समध्ये थर्ड पार्टी इन्शुरन्स हा असतोच. कॉम्प्रिहेन्सिव्ह इन्शुरन्स हा जनरल इन्शुरन्स कंपन्यांकडून विशिष्ट वर्षांपर्यंतच वाहनासाठी दिला जातो. त्यानंतर मात्र केवळ थर्ड पार्टी इन्शुरन्स होतो. आपण वाहन घेऊन जेमतेम एक वर्ष झाले आहे. त्यामुळे आपण वाहनाचा संपूर्ण इन्शुरन्स काढणे योग्य ठरेल. 


प्रश्न : आमची कुटुंबाची सदस्य संख्या सहा आहे. त्यामुळे एकत्र फिरायला जाताना मर्यादा येतात. माझे बजेट दहा ते अकरा लाख रुपये आहे, तर कोणती गाडी घेणे योग्य ठरेल?
उत्तर : निश्‍चितच आपल्याला कार उपयोगाची नाही. आपल्याला अर्बन मोबिलिटीचा फील देणारी गाडीच योग्य आहे. पूर्वी या सेगमेंटमध्ये टोयोटाची इनोवा ही गाडी होती; पण या गाडीची किंमत तुमच्या बजेटपेक्षा खूप जास्त आहे. अकरा लाख रुपयांपर्यंत आपल्याला मारुती सुझुकीची अर्टिगा व महिंद्राची मराझ्झो हे दोनच पर्याय उपलब्ध आहेत. अर्टिगा पेट्रोल व डिझेल अशा दोन्हीही पर्यायात उपलब्ध आहे. आपले रनिंग दिवसाला सरासरी पन्नास ते साठ किलोमीटर नसल्यास पेट्रोल इंजिनची गाडी घेणे योग्य ठरेल. अशा वेळी अर्टिगा हीच एमपीव्ही आपल्या कुटुंबाची गाडीची आवश्‍यकता पूर्ण करू शकते.

web title : If you are looking for insurance for a car, definitely read this

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Fadnavis on Thackeray Unity : ठाकरे बंधूंच्या युतीनंतर फडणवीस काय म्हणाले? 'ठाकरेंचा ट्रॅक रेकॉर्ड भ्रष्टाचाराचा'

Vijay Hazare Trophy : ८ चौकार, ८ षटकार... रोहित शर्माने झळकावले खणखणीत शतक; ७ वर्षांनी परतला अन् वादळासारखा घोंगावला...

MP Supriya Sule : लोकशाहीमध्ये नाराजी चालत नाही, महाविकास आघाडी-राष्ट्रवादीसमवेतच निवडणूक लढण्याचा प्रयत्न

VIJAY HAZARE TROPHY : पहिली धाव अन् विराट कोहलीच्या नावावर मोठा पराक्रम; सचिन तेंडुलकरनंतर असा विक्रम करणारा भारतीय

BMC Election: शरद पवारांच्या पक्षाने फुंकली ‘तुतारी’! महापालिकांसाठी निवडणूक प्रमुखांच्या नियुक्त्या जाहीर

SCROLL FOR NEXT