नवीन वर्षात बदलताहेत 'हे' तीन नियम! दुर्लक्ष कराल तर पडेल महागात
नवीन वर्षात बदलताहेत 'हे' तीन नियम! दुर्लक्ष कराल तर पडेल महागात Sakal
अर्थविश्व

नवीन वर्षात बदलताहेत 'हे' तीन नियम! दुर्लक्ष कराल तर पडेल महागात

सकाळ वृत्तसेवा

आता यापुढे बॅंकेतील लॉकरशी छेडछाड झाल्यास त्याला बॅंका जबाबदार असतील.

नवीन वर्ष 2022 (New Year 2022) तीन नवीन बदल घेऊन येत आहे, जे तुमच्यासाठी खूप उपयुक्त आहेत. एकीकडे बॅंक लॉकर्स (Bank Lockers) अधिक सुरक्षित असतील, तर दुसरीकडे म्युच्युअल फंड व्यवहार (Mutual Fund Transactions) एमएफ सेंट्रलकडून सुलभ होतील. त्याचबरोबर एटीएमचे (ATM) शुल्कही वाढणार आहेत. या तीन गोष्टींकडे दुर्लक्ष करणे तुम्हाला महागात पडू शकते. (Ignoring the changing rules in the new year can be costly)

लॉकरची जबाबदारी आता बॅंकांवर

आता यापुढे बॅंकेतील लॉकरशी छेडछाड झाल्यास त्याला बॅंका जबाबदार असतील. रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडियाने (Reserve Bank Of India - RBI) बॅंकांना सूचना दिल्या आहेत की, अशा प्रकरणांमध्ये ते जबाबदारी टाळू शकत नाहीत. जानेवारी 2022 पासून बॅंक कर्मचाऱ्याकडून फसवणूक, आगीची घटना किंवा चोरी झाल्यास बॅंक ग्राहकाला लॉकरच्या सध्याच्या वार्षिक भाड्याच्या 100 पट रक्कम देईल. मात्र, नैसर्गिक आपत्ती (Natural Calamities) आणि ग्राहकांच्या निष्काळजीपणामुळे होणारे नुकसान यांना हा नियम लागू होणार नाही.

MF म्युच्युअल फंडांसाठी केंद्रीय पोर्टलवर व्यवहार करू शकतील

म्युच्युअल फंडाशी संबंधित सेवा सुलभ करण्यासाठी एमएफ सेंट्रल पोर्टल (MF Central Portal) गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये सुरू करण्यात आले होते. सध्या यावर अनेक सुविधा उपलब्ध आहेत; जसे की बॅंक खाते, मोबाईल क्रमांक आणि ई-मेल (E-mail) पत्ता बदलणे, नामांकन दाखल करणे. परंतु पैसे भरणे शक्‍य नाही. या पोर्टलवर व्यवहार करण्याची सुविधाही नवीन वर्षापासून सुरू होणार आहे. हे पोर्टल Cfintech आणि Computer Age Management Services (CAMS) यांनी संयुक्तपणे सुरू केले आहे. याला सिक्‍युरिटीज अँड एक्‍स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया (Securities and Exchange Board of India - SEBI) कडूनही मान्यता मिळाली आहे.

एटीएममधून पाचपेक्षा जास्त वेळा पैसे काढण्यास लागेल शुल्क

जानेवारीपासून 2022 तुम्ही एका महिन्यात निर्धारित मर्यादेपेक्षा जास्त वेळा एटीएम वापरल्यास त्यासाठी तुम्हाला जास्त शुल्क भरावे लागेल. सध्या प्रत्येक ग्राहकाला एका महिन्यात पाच मोफत व्यवहार करण्याची परवानगी आहे. यामध्ये रोख रक्कम काढणे, शिल्लक चौकशी, एटीएम पिन बदलणे आदींचा समावेश आहे. पाचपेक्षा जास्त वापरासाठी तुम्हाला प्रति व्यवहार 21 रुपये द्यावे लागतील. पूर्वी 20 रुपये शुल्क होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Unseasonal Rain : मध्य महाराष्ट्र, मराठवाड्याला इशारा! जळगाव, नाशिक, छत्रपती संभाजीनगरमध्ये गारपिटीची शक्यता

Loksabha Election 2024 : पाचव्या टप्प्यात मुंबई बनणार ‘रणभूमी’; पंतप्रधानांचा रोड शो आणि सभांचे नियोजन

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 15 मे 2024

अग्रलेख : कोसळणारे भ्रष्ट मनोरे...

Water Storage : राज्यात केवळ २५ टक्के पाणीसाठा

SCROLL FOR NEXT