Imf Imf
अर्थविश्व

IMF On Indian Economy: भारताच्या आर्थिक विकास दरात आणखी घट

देशात मार्च-मे 2021 दरम्यान कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने आर्थिक घडामोडी मंदावल्या होत्या

प्रमोद सरवळे

औरंगाबाद: आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने (IMF) भारतीय अर्थव्यवस्थेच्या (India's Economy) वाढीबद्दलचा आपला मागील अंदाज कमी केला आहे. आयएमएफच्या नवीन अंदाजानुसार 2021-22 (FY22) आर्थिक वर्षात भारताचा आर्थिक विकास दर (Economic Growth) 9.5 टक्के राहील. तसेच कोरोनाच्या लसीकरणाच्या संथ वेग आणि दुसर्‍या लाटेमुळे ग्राहकांचा आत्मविश्वास कमी होत आहे. त्यामुळे मागील 12.5 आर्थिक विकास दर कमी होऊन तो 9.5 टक्के राहील असं सांगितलं आहे.

IMf cuts India's Economy growth Prediction

देशात मार्च-मे 2021 दरम्यान कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने आर्थिक घडामोडी मंदावल्या होत्या. या धक्क्यातून सावरायला देशाला थोडा वेळ लागू शकतो, असंही नाणेनिधीने सांगितले आहे. आयएमएफच्या अंदाजातील ही कपात भारतीय अर्थव्यवस्थेला मोठा धक्का मानली जात आहे.

भारतासारख्या विकसनशील अर्थव्यवस्थांच्या अंदाजामध्ये कपात-

आयएमएफने 2021 साठी ग्लोबल ग्रोथ प्रोजेक्शनमध्ये (Global Growth Projection) 6 टक्क्यांची वाढ तशीच ठेवली आहे. त्याचबरोबर भारत आणि विकसनशील अर्थव्यवस्था, विशेषतः आशियासारख्या विकसनशील देशांसाठी आयएमएफने वाढीचा अंदाज कमी केला आहे. तर ज्या देशांत चांगल्या प्रमाणात लसीकरण झाले आहे त्या देशांचा आर्थिक विकास दर वाढेल असंही मत व्यक्त केले आहे. कोरोनाच्या काळात भारतातील लसीकरणाचा त्यावेळेसचा वेग पाहून देशाचा विकास दर 12.5 व्यक्त केला होता पण तो आता 9.5 टक्क्यांपर्यंत आणला आहे.

ब्रिटन आणि कॅनडाच्या अर्थव्यवस्थेवरही काही प्रमाणात परिणाम-

नाणेनिधीच्या रिपोर्टनुसार, भारत आणि इंडोनेशिया समोर G-20 देशांचे आव्हान असेल. तर दुसऱ्या बाजून ब्रिटन आणि कॅनडासारख्या देशात जिथं लसीकरणाचा वेग चांगला आहे तिथं नाममात्र परिणाम दिसेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Petrol-Diesel Price Today: सौदी अरेबियाने पाइपलाइन बंद केली, कच्च्या तेलात तेजी; गणेश चतुर्थीला पेट्रोल-डिझेल अन् LPG चे दर किती?

Maratha Reservation: मुंबई पोलिसांची परवानगी नाकारली तरी जरांगे जाणारच; ‘आंदोलनस्थळी मरेन, पण सरकारपुढे गुडघे टेकणार नाही’

IND vs AFG: पहिल्या T20I पूर्वी 'जन गण मन'च्या आधी 'वंदे मातरम्' का वाजवलं गेलं? जाणून घ्या ऐतिहासिक घटनेमागचं कारण

Marathi News Live Updates : पुण्यातील मानाचा चौथा श्री तुळशीबाग गणपती आगमन मिरवणुकीला सुरुवात

Maharashtra School Recruitment: शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी मोठी गुड न्यूज! राज्यात २८ हजारांहून अधिक पदे भरण्याचा मार्ग मोकळा, शिक्षकेतर भरतीचे नवे नियम जाहीर

SCROLL FOR NEXT