prices of Crude oil becomes normal  
अर्थविश्व

कच्च्या तेलाचा किमतींचा भडका! कुणाला फायदा, कुणाचं नुकसान?

कच्च्या तेलाच्या किमतीमध्ये गेल्या काही दिवसात सातत्याने वाढ झालेली पाहायला मिळतेय.

सुमित बागुल

कच्च्या तेलाच्या किमतीमध्ये गेल्या काही दिवसात सातत्याने वाढ झालेली पाहायला मिळतेय.

कच्च्या तेलाच्या किमतीमध्ये गेल्या काही दिवसात सातत्याने वाढ झालेली पाहायला मिळतेय. वायदा बाजारात कच्च्या तेलाच्या किमती दोन वर्षांच्या उच्चांकावर ट्रेंड करतायत आणि येत्या काळात या किमती खाली येण्याची चिन्ह देखील नाहीत. कच्च्या तेलाबाबत ओपेक + म्हणजेच ऑर्गनायझेशन ऑफ पेट्रोलियम एक्सपोर्टींग कंट्रीज आणि त्यांच्या मित्र देशांची (Organization of the Petroleum Exporting Countries and allies) एक महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. यानंतर कच्च्या तेलाच्या किमती अधिकच वधारल्याचं पाहायला मिळतंय. या अत्यंत महत्त्वाच्या बैठकीनंतर भारतीय शेअर बाजारावर याचा कसा परिणाम होऊ शकतो आणि कोणते समभाग (शेअर्स) येत्या काळात वधारू किंवा पडू शकतात त्यावर टाकूयात एक नजर. (impact of increased rates of crude oil on indian stock market and various sectors)

तेलाच्या किमती वधारल्यानं कोणत्या सेक्टरवर होईल परिणाम?

OPEC + देशांच्या बैठकीनंतर कच्च्या तेलाच्या किमतीमध्ये वाढ झाल्याचं पाहायला मिळतंय. या बैठकीमधील महत्त्वपूर्ण बाब म्हणजे येत्या काळात कच्च्या तेलाचं उत्पादन वाढवण्याचा निर्णय या बैठकीत झाला आहे. परिणामी कच्च्या तेलाच्या किमती सातत्याने वाढताना पाहायला मिळतायत. सोबतच जगभरात अनेक देशांमध्ये आता अनलॉकिंग सुरु असल्याने कच्च्या तेलाचा वापर वाढतोय, तसेच मागणीही मोठ्या प्रमाणात वाढली आहे.

कुणाला होणार फायदा?

तेल उत्पादक कंपन्यांना याचा सर्वाधिक फायदा होणार असल्याचं बोललं जातंय. यामध्ये ONGC, ऑइल इंडिया, हिंदुस्थान ऑइल एक्क्सप्लोरेशन कंपनी (HOEC) या कंपन्यांच्या समभागांमध्ये चांगली तेजी पाहायला मिळू शकते.

कोणत्या सेक्टरला बसू शकतो फटका?

वाढत्या कच्च्या तेलाच्या किमतींचा परिणाम ऑटो कंपन्यांवर होताना पाहायला मिळू शकतो. कच्च्या तेलाच्या किमतीमध्ये आणखी वाढ झाल्यास ऑटो कंपन्यांच्या मागणीत घट होऊ शकते. ज्यामुळे त्यांच्या शेअर्सच्या किमतीवर परिणाम झाल्याचं पाहायला मिळू शकतं. याचसोबत तज्ज्ञांच्या मते पेंट्स कंपन्यांना देखील याचा फटका बसू शकतो. यामध्ये एशियन पेंट्स, बर्जर पेंट्स, इंडिगो पेन्ट्स यासारख्या समभागांचा समावेश आहे. सोबतच एव्हिएशन सेक्टरला देखील याचा मोठा फटका बसू शकतो. एकीकडे जगभरात अनेक देशांमध्ये अनलॉक होत असताना एव्हिएशन सेक्टरकडून मागणी तर वाढेल, मात्र कच्च्या तेलाच्या वाढत्या किमतींमुळे विमान प्रवास अधिक महागण्याची शक्यता वर्तवली जातेय.

त्यामुळे येत्या काळात वरील कंपन्यांच्या समभागांवर नजर ठेऊन तुम्ही शेअर बाजारात गुंतवणूक करू शकतात. शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्यप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Airport Threat : पुणे विमानतळावर हाय अलर्ट! गुवाहटीला जाणाऱ्या विमानात आढळली धक्कादायक चिठ्ठी, प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण, तपास सुरू

Marathi literature decade review : ‘दशकातले लेखक’; २०१०-२०२० मधील मराठी साहित्यप्रवाहाचा सखोल वेध

Manoj Jarange Patil : मनोज जरांगेंनी उपोषण सोडल्यानंतर पहिल्यांदाच दिली प्रतिक्रिया; माझ्या घातपाताचा प्रयत्न कुणी केला?

Prize Money: IPL 2026 चा विजेता होणार मालामाल! चॅम्पियन संघाला मिळणार 'इतके' कोटी रुपये, तर उपविजेत संघालाही मिळणार 'इतके' कोटी

Mumbai Goa Highway Accident: ट्रकवर मोटार आदळून अहिल्यानगरच्या माय-लेकी ठार; मुंबई-गोवा महामार्गावर पोलादपूरजवळ अपघात, बाप-लेक जखमी

SCROLL FOR NEXT