PAN Card
PAN Card  sakal
अर्थविश्व

PAN Card : पॅन कार्ड धारकांसाठी महत्वाची सूचना; 'हे' काम करा अन्यथा तुमचे पॅन कार्ड होईल बंद

सकाळ डिजिटल टीम

PAN Card : आयकर रिटर्न (ITR) भरण्यापासून ते मोठे बँकिंग व्यवहार करण्यासाठी पॅन कार्ड असणे आवश्यक आहे. याशिवाय इतर अनेक आर्थिक कामांसाठी पॅनकार्ड असणे बंधनकारक आहे. त्याचबरोबर अनेक कामे करण्यासाठी आणि ओळख दाखवण्यासाठी आधार कार्डचा वापर केला जातो.

अशा परिस्थितीत आयकर विभागाने पॅन कार्ड आधारशी लिंक करण्यासाठी 31 मार्च 2023 ही अंतिम मुदत निश्चित केली आहे.

प्राप्तिकर विभागाने जारी केलेल्या सल्ल्यानुसार, “प्राप्तिकर कायदा, 1961 नुसार, सर्व पॅन धारकांना 31 मार्च 2023 पूर्वी त्यांचे पॅन आधारशी लिंक करणे बंधनकारक आहे, अपवाद वगळता. आधारशी लिंक नसलेले पॅन कार्ड 1 एप्रिल 2023 पासून निष्क्रिय होतील''

हेही वाचा : Love Jihad: प्रेमाला धर्म आहे...?

करदात्यांना पॅनला आधारशी लिंक करण्याचा सल्ला देताना प्राप्तिकर विभागाने सांगितले की, अर्थ मंत्रालयाने मे 2017 मध्ये जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, "मुक्त श्रेणी" मध्ये आसाम, जम्मू आणि काश्मीर आणि मेघालय या राज्यांतील रहिवाशांचा समावेश आहे.

याशिवाय अनिवासी भारतीय आणि 80 वर्षांपेक्षा जास्त वयाचे लोक देखील सूट श्रेणीत समाविष्ट आहेत.

अशा प्रकारे तुम्ही ऑनलाइन लिंक करू शकता :

  • सर्व प्रथम आयकर वेबसाइटवर जा.

  • आधार कार्डमध्ये दिलेले नाव, पॅन क्रमांक आणि आधार क्रमांक टाका.

  • कॅप्चा कोड टाका.

  • आता लिंक आधार बटणावर क्लिक करा

  • तुमचा पॅन आधारशी लिंक केला जाईल.

अशा प्रकारे तुम्ही एसएमएसद्वारे लिंक करू शकता :

तुम्हाला तुमच्या फोनवर UIDPAN टाइप करावे लागेल. यानंतर 12 अंकी आधार क्रमांक लिहा. त्यानंतर 10 अंकी पॅन क्रमांक लिहा. हा संदेश 567678 किंवा 56161 वर पाठवा.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nashik BJP News : काँग्रेसला मोठा धक्का! प्रदेश सरचिटणीस डॉ. तुषार शेवाळे यांच्या भाजप प्रवेशाने खळबळ

Delhi Bomb Threat : सरकारी रुग्णालयांनंतर दिल्लीतील विमानतळ बॉम्बने उडवण्याची धमकी

IPL 2024 RCB vs DC Live Score : रजतची हाणामारी; दोन सेटबॅकनंतर आरसीबीची दमदार फलंदाजी

गोफण | भटकती आत्मा.. ऑफर नव्हे सल्ला! प्रकरण कोर्टात

Covid subvariant: चिंता वाढली! राज्यात कोरोनाच्या नव्या व्हेरियंटचे 'इतके' रुग्ण आढळले, पुण्यात 51 तर ठाण्यात 20

SCROLL FOR NEXT