Share Market sakal media
अर्थविश्व

यावर्षी 'या' मल्टीबॅगर शेअरने दिला 188 टक्के परतावा!

एमके ग्लोबलने मल्टीबॅगर स्टॉक एचजी इन्फ्रावर (HG Infra) बाय रेटिंग (Buy Rating) दिले आहे.

शिल्पा गुजर

एमके ग्लोबलने मल्टीबॅगर स्टॉक एचजी इन्फ्रावर (HG Infra) बाय रेटिंग (Buy Rating) दिले आहे.

एचजी इन्फ्रा (HG Infra)2021 मध्ये आतापर्यंत हा स्टॉक 188 टक्क्यांनी वाढला आहे. ब्रोकरेज हाऊसचा विश्वास आहे की, येत्या 12 महिन्यांत हा स्टॉक 820 रुपयांचे टारगेट सहज पार करेल. ब्रोकरेज हाऊस एमकेने अलीकडेच एचजी इन्फ्राच्या (HG Infra) व्यवस्थापनाशी चर्चा केली. यात, पुढील दोन वर्षांत कंपनीच्या विक्रीत वार्षिक आधारावर 20 टक्क्यांहून अधिक वाढ होण्याची अपेक्षा त्यांनी वर्तवली. यासोबतच EBITDA आणि ऑर्डरचा ओघ आणखी मजबूत होईल असा विश्वासही आहे.

कंपनीला रस्त्यांच्या पायाभूत सुविधांशी संबंधित मोठ्या ऑर्डर मिळाल्याचे एमकेने म्हटले. याशिवाय खर्च कमी करण्यासाठी डिजिटल होण्याच्या कंपनीच्या निर्णयाचाही फायदा होणार आहे. एमके ग्लोबलचा विश्वास आहे की, आर्थिक वर्ष 2022-24 दरम्यान, कंपनीच्या EPS मध्ये वार्षिक आधारावर 16 टक्के वाढ होईल. दुसऱ्या सहामाहीत 22 अब्ज रुपयांच्या नवीन ऑर्डर मिळू शकतात याचा त्यांना विश्वास आहे. यामध्ये एनएचएआयच्या रस्ते प्रकल्पांबाबतचा फायदा कंपनीला मिळेल. याशिवाय रेल्वे, पाणीपुरवठा अशा क्षेत्रांतूनही कंपनीला ऑर्डर मिळणे अपेक्षित आहे. कंपनी तिच्या JV भागीदाराद्वारे रेल्वे आणि पाणी पुरवठ्याशी संबंधित प्रकल्पांवर काम करत आहे.

नोंद : क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MPSC चा पेपर कसा फुटला? प्रेमात बिनसलं अन् प्रियकरानेच आयोगाला केला ई-मेल... प्रेमापासून ब्रेकअपपर्यंतची धक्कादायक कहाणी

BABAR AZAM T20I RECORD: बाबर आझमचा मोठा विक्रम; रोहित शर्मा अन् विराट कोहलीला मागे टाकत टी-२०मध्ये ठरला नंबर वन

Ajra Bank Employee Tragedy: आजऱ्यात विजेच्या धक्क्याने बॅंक कर्मचाऱ्याचा मृत्यू बांधकामावरील साहित्य उचलताना घटना

Onion Express: लासलगाव ‘कांदा एक्स्प्रेस’चा उडाला बोजवारा! ढिसाळ नियोजन; निम्माच माल घेऊन गाडी ४२ तासांनी दिल्लीकडे रवाना

Chandwad Teacher Vacancies: चांदवडला शिक्षकांची ५५ पदे रिक्त; तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांची स्थिती दयनीय; पालक संतप्त

SCROLL FOR NEXT