Mutual Fund SIP Sakal
अर्थविश्व

Mutual Fund: दररोज 10 रुपये वाचवा, तयार होईल 10 लाखांचा फंड

जर तुम्ही तुमची छोटी बचत दर महिन्याला गुंतवण्याची सवय लावली तर पुढील काही वर्षांत तुम्ही लाखो रुपयांचा निधी सहज तयार करू शकता.

शिल्पा गुजर

म्युच्युअल फंड (Mutual Fund) एसआयपीमध्ये (SIP) तुम्ही नियमित अगदी लहान बचतीतूनही इक्विटीसारखे परतावे मिळवू शकता. जर तुम्ही तुमची छोटी बचत दर महिन्याला गुंतवण्याची सवय लावली तर पुढील काही वर्षांत तुम्ही लाखो रुपयांचा निधी सहज तयार करू शकता. तुम्ही दररोज 10 रुपये वाचवल्यास आणि दर महिन्याला SIP मध्ये गुंतवणुक (Investment) केल्यास, पुढील 30 वर्षांत 10 लाखांपेक्षा जास्त निधी तयार करू शकता. म्युच्युअल फंडाच्या अशा अनेक योजना आहेत, ज्यांनी लाँग टर्ममध्ये सरासरी 12 टक्के परतावा दिला आहे. (In Mutual Fund SIP, you can get regular equity returns even from small savings.)

SIP Calculator: दररोज 10 रुपयांची बचत-

तुम्ही दररोज 10 रुपयांची बचत करत असाल, तर तुमची बचत दरमहा 300 रुपये होईल. तुम्ही दरमहा 300 रुपयांची SIP करत असाल आणि 12 टक्के वार्षिक परतावा मिळाल्यास, तुम्ही पुढील 30 वर्षांत 10 लाखांचा (रु. 10,58,974) निधी सहज तयार करू शकता. यामध्ये तुमची गुंतवणूक सुमारे 1.1 लाख रुपये आणि मिळणारा रिटर्न 9.5 लाख रुपये असेल.

20 वर्षात किती निधी तयार होईल ?-

तुम्ही दरमहा 300 रुपयांची SIP करत असाल आणि 12 टक्के वार्षिक परतावा मिळत असेल, तर तुम्ही पुढील 20 वर्षांमध्ये 3 लाख (रु. 2,99,744) जमा करु शकता. यामध्ये तुमची गुंतवणूक सुमारे 72,000 रुपये असेल आणि तुम्हाला रिटर्न 2.3 लाखांचा मिळेल.

100 रुपयांनी सुरुवात करु शकता-

SIP ही गुंतवणुकीचा पद्धतशीर मार्ग असल्याचे BPN Fincap चे संचालक AK निगम म्हणाले. असे अनेक फंड आहेत, ज्यांचा लाँग टर्म सरासरी वार्षिक SIP परतावा किमान 12 टक्के असतो. SIP ची खासियत म्हणजे तुम्ही फक्त 100 रुपये प्रति महिना गुंतवणुकीने सुरुवात करू शकता.

नोंद : क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sanjay Raut : कर्जाच्या पैशातून मोदींचा केक कापणार? वाढदिवस साजरा करणे म्हणजे आर्थिक गुन्हा, संजय राऊतांचे राज्य सरकारवर ताशेरे

Latest Marathi News Updates : कांद्याचे दर घसरले, शेतकऱ्यांचे रास्ता रोको आंदोलन

जरा आवरा अन् Google Gemini ला स्वत:चे पर्सनल फोटो देण्यापूर्वी ही बातमी वाचा... नाहीतर वेळ निघून जाईल, तज्ज्ञांचा इशारा

कलाकार हवा तर असा ! दशावतारचं यश पाहून हिंदी मीडियाने केलं दिलीप प्रभावळकरांचं कौतुक "बॉलीवूडला लाज वाटायला.."

Rahuri Accident: 'दुचाकींच्या अपघातात एक ठार, एक जखमी'; दोन भरधाव दुचाकींची समोरासमोर भीषण धडक

SCROLL FOR NEXT