stocks esakal
अर्थविश्व

Budget Picks : बजेटच्या एक दिवस आधी खरेदी करा हा केमिकल स्टॉक!

तुम्हालाही बजेटपूर्वी शेअर बाजारात खरेदी करायची असेल आणि बंपर रिटर्न मिळवायचा असेल, तर तुम्ही या शेअरचा विचार करु शकता.

शिल्पा गुजर

तुम्हालाही बजेटपूर्वी शेअर बाजारात खरेदी करायची असेल आणि बंपर रिटर्न मिळवायचा असेल, तर तुम्ही या शेअरचा विचार करु शकता.

शेअर बाजारात (Share market) खरेदीसाठी, बाजारातील तज्ज्ञांकडून काही शेअर्स सांगितले जातात, जेणेकरून गुंतवणूकदारांना जास्तीत जास्त नफा मिळू शकेल. असाच एक शेअर निवडला आहे शेअर बाजार तज्ज्ञ संदीप जैन यांनी. हा स्टॉक कॅश मार्केटमधील आहे आणि शॉर्ट टर्ममध्ये जास्तीत जास्त नफा देऊ शकतो. तुम्हालाही बजेटपूर्वी शेअर बाजारात खरेदी करायची असेल आणि बंपर रिटर्न मिळवायचा असेल, तर तुम्ही या शेअरचा विचार करु शकता. बजेटपूर्वी पंजाब केमिकल्समध्ये केलेली खरेदी तुम्हाला चांगला परतावा (Refund) मिळवून देऊ शकते, असा विश्वास संदीप जैन यांना आहे.

पंजाब केमिकल्स (Punjab Chemicals)

पंजाब केमिकल्स ही 1850-1900 कोटींची कंपनी आहे. संदीप जैन यांच्या मते ही अतिशय उत्तम दर्जाची कंपनी आहे. 1975 पासून पंजाब केमिकल्स कार्यरत आहे. कंपनीचे व्हॅल्युएशन स्वस्त आहे, त्यामुळे येत्या काळात तो चांगली कमाई करुन देईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.

कंपनीचे फंडामेंटल्स?

कंपनीचे फंडामेंटल्स अतिशय भक्कम आहेत. कंपनीचा रिटर्न ऑन इक्विटी 40 टक्के आहे. गेल्या 3 वर्षातील नफ्याचा CAGR 44 टक्के आहे. याशिवाय कंपनीवर 90 कोटी रुपयांचे कर्ज आहे. डिसेंबर 2021 मध्ये, कंपनीने 22 कोटी रुपयांचा नफा सादर केला होता, तर डिसेंबर 2020 मध्ये तिने 16 कोटी रुपयांचा नफा सादर केला होता.

प्रोमोटर्सची भागिदारी

कंपनीमध्ये प्रोमोटर्सची 40 टक्के भागीदारी आहे. व्हॅल्युएशनच्या दृष्टीने हा स्टॉक खूपच स्वस्त असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. हा शेअर अल्पावधीत चांगला नफा देऊ शकतो, असा विश्वास संदीप जैन यांना आहे.

नोंद : क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Cyber Fraud Alert: सायबर फसवणुकीचा नवा प्रकार; काय आहे 401# कोड आणि त्याचे धोके, जाणून घ्या आणि आताच सावध व्हा!

Python Enters House Video: भयानक! मोबाइल बघत बसली होती मुलं, तितक्यात घरात शिरला महाकाय अजगर अन् मग...

Latest Marathi News Updates: हरिद्वारमध्ये बुडणाऱ्या कावडियांना एसडीआरएफच्या जवानांनी वाचविले

पार्किंगपासून ते दुकानाच्या भाड्यापर्यंत...; विमानतळावर सर्व महाग होणार, टीडीएसएटीच्या मोठ्या निर्णयानं टेन्शन वाढवलं

Viral Video : प्रियकरासोबत वारंवार फरार व्हायची पत्नी; घटस्फोट होताच पतीने दुधाने आंघोळ करत जल्लोष साजरा केला अन्...

SCROLL FOR NEXT