Drone Hub India
Drone Hub India sakal
अर्थविश्व

भारत बनणार जगातील ड्रोन हब, हे 5 स्टॉक घेतील भरारी

शिल्पा गुजर

ड्रोन तंत्रज्ञानाचा वापर आता सर्वसामान्यांच्या जीवनात वापर वाढावा यासाठी भारत सरकार गेल्या काही वर्षांपासून ड्रोन पॉलिसीमध्ये शिथिलता आणत आहे. आता ड्रोन तंत्रज्ञान केवळ संरक्षण क्षेत्राशी निगडीत नसून सर्वसामान्यांच्या जीवनात त्याचा वापर वाढत आहे. ज्यात कृषी, आरोग्यसेवा, पर्यटन क्षेत्रांचाही समावेश आहे. त्यामुळे ड्रोन बनवणाऱ्या कंपन्यांमध्ये बरीच ऍक्शन दिसून येते आहे. त्यामुळेच अदानी एंटरप्रायझेसने जनरल एरोनॉटिक्स प्रायव्हेट लिमिटेडमध्ये (General Aeronautics Private Limited) 50 टक्के स्टेकसाठी करार केला आहे. जनरल एरोनॉटिक्स पिकांच्या संरक्षणासाठी व्यावसायिक ड्रोन आधारित सेवा प्रदान करते.

अदानी एंटरप्रायझेसप्रमाणेच, रॅटनइंडिया एंटरप्रायझेस (RattanIndia Enterprises) या आणखी एका कंपनीने थ्रॉटल एरोस्पेस सिस्टीम्स प्रायव्हेट लिमिटेड (Throttle Aerospace Systems Pvt Ltd (TAS) ) मध्ये 60 टक्के भागीदारी विकत घेतली आहे, जी भारतातील आघाडीची ड्रोन निर्माता कंपनी आहे.

भारत सरकार ई-कॉमर्स कंपन्यांच्या सप्लाय चेन सिस्टममध्ये ड्रोनच्या वापराला मान्यता देण्याची दाट शक्यता आहे. लवकरच Amazon आणि Flipkart सारख्या कंपन्या त्यांच्या ग्राहकांना ड्रोनद्वारे सेवा देतील अशी शक्यता आहे. त्यामुळेच बाजारातील तज्ज्ञ 5 ड्रोन बनवणाऱ्या स्टॉकवर लक्ष ठेवण्याचा सल्ला देत आहेत. यामध्ये झेन टेक, पारस डिफेन्स, बीईएल, डीसीएम श्रीराम आणि रतनइंडिया एंटरप्रायजेसच्या नावांचा समावेश आहे.

जुलै 2021 मध्ये ड्रोन पॉलिसीनंतर भारताच्या ड्रोन मार्केटमध्ये जोरदार ऍक्शन दिसून येत असल्याचे प्रॉफिटमार्ट सिक्युरिटीजचे अविनाश गोरक्षकर म्हणाले. ड्रोन तंत्रज्ञान आता कृषी, आरोग्यसेवा, पर्यटन, मीडिया आणि इतर उद्योगांमध्ये फोफावत आहे.अदानी एंटरप्रायझेससारखी कंपनीही ड्रोनच्या व्यवसायात उतरणार आहे. अशा परिस्थितीत, गुंतवणूकदाराच्या पोर्टफोलिओमध्ये ड्रोन बनवणाऱ्या कंपन्याच्या शेअर्सचे महत्त्व वाढतंय, त्यामुळे हे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला बाजारातील तज्ज्ञ देत आहेत.

नोंद : क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024, RCB vs CSK: चेन्नईचा 17 व्या हंगामातील प्रवास थांबला! धोनीचीही कारकिर्द संपली? सामन्यानंतरचा पाहा Video

Loksabha Election 2024 : हुश्श..! प्रचार संपला, राज्यात तोफा शांत, तलवारी म्यान

IPL 2024: RCB चा आनंद गगनात मावेना! प्लेऑफमध्ये पोहचताच केला जोरदार जल्लोष, पाहा Video

‘चार सौ पार’ पासून बहुमताच्या आकड्यापर्यंत

सत्ता ठरवणारा उ त्त र रं ग

SCROLL FOR NEXT