आता 100 रुपयांत सुरु करा सोन्याची गुंतवणूक, PhonePe कडून UPI लाँच

वॉलमार्टच्या मालकीची डिजिटल पेमेंट कंपनी PhonePe ने सोन्यात गुंतवणुकीसाठी UPI SIP (पद्धतशीर गुंतवणूक योजना) लाँच केली आहे.
phonepe Ipo
phonepe Ipo Sakal

वॉलमार्टच्या मालकीची डिजिटल पेमेंट कंपनी PhonePe ने सोन्यात गुंतवणुकीसाठी UPI SIP (पद्धतशीर गुंतवणूक योजना) लाँच केली आहे. यात तुम्ही 24 कॅरेट सोन्यात दरमहा पैसे गुंतवू शकतात. बिझनेस स्टँडर्डमधील एका अहवालानुसार, हे सोने PhonePe चे पार्टनर्स MMTC-PAMP आणि SafeGold द्वारे राखलेल्या इंश्युअर्ड बँक ग्रेड लॉकर्समध्ये जमा केले जाईल.

PhonePe वर गोल्ड SIP सुरू करण्याचा फायदा म्हणजे त्यात उपलब्ध UPI ची सुविधा आहे. तुम्हाला फक्त सोन्याचा प्रोव्हायडर निवडावा लागेल. महिन्याला किती पैसे गुंतवायचे आहेत, ती रक्कम नमूद करावी लागेल आणि UPI पिनसह टाकावा लागेल. गोल्ड एसआयपी अगदी सहज आणि सुलभ प्रक्रिया आहे.

phonepe Ipo
Pepperfry चा IPO येण्याची शक्यता; जाणून घ्या सविस्तर

तुमचे तुमच्या सोन्याच्या गुंतवणुकीवर पूर्ण नियंत्रण असेल. तुम्हाला पाहिजे तेव्हा तुम्ही हे सोने विकू शकता आणि पैसे थेट तुमच्या बँक खात्यात जमा होतील. तुम्ही तुमचे सोने कॉईन आणि बारच्या रूपात निवडू शकता, अगदी तुमच्या घरापर्यंत हे सोने पोहोचवले जाते.

100 रुपयांनी करा सुरुवात
गोल्ड एसआयपीच्या माध्यमातून 24-कॅरेट सोन्यात किमान 100 रुपये दरमहा गुंतवणुकीसह गुंतवणूक करण्यास सुरुवात करु शकता असे PhonePe ने सांगितले. गोल्ड एसआयपी हा नियतकालिक गुंतवणूक असल्याने, तुम्हाला सोन्याच्या किमतींवर लक्ष ठेवण्याची गरज नाही. सोन्यामध्ये ठराविक रक्कम ठराविक अंतराने लांब काळासाठी गुंतवल्याने गुंतवणूक खर्च कमी होऊ शकतो.

phonepe Ipo
येत्या आठवड्यात खुला होणार या केमिकल कंपनीचा IPO, जाणून घ्या अधिक माहिती...

UPI द्वारे गोल्ड SIP सुरू करण्याचा पर्याय देताना आम्हाला खूप आनंद होत असल्याचे PhonePe चे हेड (इनवेस्टमेंट्स) टेरेन्स लुसियन म्हणाले. यामुळे वापरकर्त्यांना लाँग टर्मसाठी सोन्यामध्ये कोणत्याही अडचणीशिवाय गुंतवणूक करण्यास मदत होईल असेही ते म्हणाले.

नोंद : क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com