gdp sakal
अर्थविश्व

GDP Data : भारतीय अर्थव्यवस्थेचा विकासदर मंदावला; 'ही' आहेत कारणे

सांख्यिकी मंत्रालयाच्या वतीने दुसऱ्या तिमाहीतील जीडीपीचे आकडे जाहीर झाले आहेत.

सकाळ डिजिटल टीम

जागतिक अर्थव्यवस्थेवरील मंदीचा परिणाम भारतीय अर्थव्यवस्थेवर दिसत आहे. भारत सध्या मंदी आणि महागाई व्यतिरिक्त जागतिक अर्थव्यवस्था रशिया-युक्रेन युद्ध, चीनमध्ये पुन्हा कोरोनाची नवीन रुग्णवाढ आणि निर्बंधांमध्ये वाढ, फेडरल रिझर्व्हकडून व्याजदरात झालेली वाढ आणि पुरवठा साखळी अशा अनेक आव्हानांचा सामना करत आहे. चालू आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीतले विकासदराचे आकडे जाहीर झाले आहेत.

हेही वाचा : भारतीय उत्पादनांच्या खरेदीतली वाढ बनवेल देशाला आर्थिक महासत्ता...

चालू आर्थिक वर्ष 2022-23 च्या दुसऱ्या तिमाहीत जुलै ते सप्टेंबर दरम्यान देशाची अर्थव्यवस्था 6.3 टक्के दराने वाढली आहे. आर्थिक वर्ष 2022-23 च्या पहिल्या तिमाहीत (पहिली तिमाही) एप्रिल ते जून दरम्यान, भारतीय अर्थव्यवस्थेचा दर 13.5 टक्के दराने वाढला होता. तर गेल्या वर्ष 2021-22 च्या दुसऱ्या तिमाहीत, देशाचा आर्थिक विकास दर (GDP) 8.4 टक्के होता. तर 2020-21 च्या दुसऱ्या तिमाहीत GDP होता - 7.5 टक्के (ऋण).

2021-22 च्या दुसऱ्या तिमाहीत 3.2 टक्क्यांच्या तुलनेत कृषी क्षेत्राचा विकास दर 4.6 टक्के राहिला आहे. बांधकाम क्षेत्राचा विकास दर 6.6 टक्के राहिला आहे तर 2021-22 च्या दुसऱ्या तिमाहीत तो 8.1 टक्के होता. त्याचप्रमाणे, व्यापार, हॉटेल, वाहतूक, दळणवळण संबंधित सेवांचा वाढीचा दर 14.7 टक्के आहे, जो 2021-22 च्या दुसऱ्या तिमाहीत 9.6 टक्के होता. आर्थिक, रिअल इस्टेट आणि व्यावसायिक सेवांचा विकास दर 6.5 टक्के आहे, जो गेल्या वर्षीच्या दुसऱ्या तिमाहीत 19.4 टक्के होता. चालू आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीत वीज, गॅस आणि पाणीपुरवठा आणि इतर उपयोगिता सेवांचा वाढीचा दर 5.6 टक्के राहिला आहे, जो मागील वर्षी याच कालावधीत 8.5 टक्के होता.

सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयाच्या वतीने दुसऱ्या तिमाहीतील जीडीपीचे आकडे जाहीर करताना असे सांगण्यात आले की, आर्थिक वर्ष 2022-23 च्या दुसऱ्या तिमाहीत, जीडीपी 38.17 लाख कोटी रुपयांवर पोहोचला, जो 35.73 लाख कोटी रुपये होता. गेल्या वर्षी याच तिमाहीत लाख कोटी रुपये होते. 2020-21 आणि 2021-22 या दोन आर्थिक वर्षांच्या दुसऱ्या तिमाहीत कोरोना महामारीमुळे निर्बंधांचा परिणाम झाला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai News: यंदाही मुंबईची तुंबई! ८० ठिकाणी भरणा-या पाण्याचा उपसा करण्यासाठी ५४७ पंप बसविणार

Nita Ambani: नीता अंबानींच्या घरात रोज बनतात तब्बल ४००० पोळ्या! कारण ऐकून तुम्हालाही बसणार नाही विश्वास; Viral

Latest Marathi News Live Update: संभाजीनगर नागपूर दृतगती महामार्गावर ट्रकला अपघात, चालक ठार

न्यायातील प्रतारणेबाबत कनिष्ठ न्यायालय बघ्याची भूमिका घेऊ शकत नाही, मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय

Missing Link: खंडाळा घाटातील ट्रॅफिक, अपघात आणि विलंबाला ब्रेक... मेगा प्रोजेक्टला 'मिसिंग लिंक' हे नाव का? कोंडी पूर्णपणे संपेल का?

SCROLL FOR NEXT