RBI Governor Das  Sakal
अर्थविश्व

RBI Governor : भारतीय रुपया इतर देशांच्या तुलनेत चांगल्या स्थितीत : दास

असुरक्षित परकीय चलनाच्या व्यवहारांबद्दल घाबरण्याऐवजी त्याकडे वस्तुस्थितीने पाहण्याची गरज आहे.

सकाळ डिजिटल टीम

RBI Governor : गंभीर जागतिक परिस्थितीमध्ये भारतीय अर्थव्यवस्था तुलनेने चांगल्या स्थितीत आहे असा दावा भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी केला आहे. BOB च्या वार्षिक बँकिंग परिषदेला संबोधित करताना ते बोलत होते.

आरबीआयचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी रुपयाच्या घसरणीबाबत सांगितले की, रुपयामध्ये तीव्र चढउतार आणि अस्थिरता येऊ दिली जाणार नसून, आरबीआय बाजारात यूएस डॉलरचा पुरवठा करत आहे. त्यामुळे रोखीचा पुरेसा पुरवठा सुनिश्चित करण्याचा प्रयत्न करत असून, आरबीआयच्या पावलांमुळे रुपयाचा व्यवहार सुरळीत होण्यास मदत झाली असल्याचे ते म्हणाले. असुरक्षित परकीय चलनाच्या व्यवहारांबद्दल घाबरण्याऐवजी त्याकडे वस्तुस्थितीने पाहण्याची गरज असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

आरबीआय गव्हर्नर यांनी रेपो दरावरील प्रश्नाला उत्तर देताना सांगितले की, तरलता आणि दर वाढविण्याबाबत निर्णय घेताना आरबीआय नेहमीच विकासाचे लक्ष्य लक्षात ठेवते आणि त्यानुसार आरबीआयचे चलनविषयक धोरण धोरण समिती स्वतःची पावले उचलते असे ते दास यांनी यावेळी स्पष्ट केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT