Vodafone Idea News Updates sakal news
अर्थविश्व

‘व्होडाफोन-आयडिया’ चालवायची सरकारची इच्छा नाही

सकाळ डिजिटल टीम

‘व्होडाफोन-आयडिया’मधील ३५.८ टक्के समभाग विकत घेण्याची सरकारने तयारी सुरू केली आहे.

मुंबई - ‘व्होडाफोन-आयडिया’ (Vodafone-Idea) कंपनी चालविण्याची सरकारची इच्छा नाही. आजवरच्या सरकारच्या आमच्याशी झालेल्या संवादातून त्यांनी हे संकेत दिले आहेत, असे मत ‘व्होडाफोन-आयडिया’चे व्यवस्थापकीय संचालक रविंदर ठक्कर (Ravindra Thakkar) यांनी बुधवारी एका पत्रकार परिषदेत सांगितले.

‘व्होडाफोन-आयडिया’मधील ३५.८ टक्के समभाग विकत घेण्याची सरकारने तयारी सुरू केली आहे. कंपनीतील सर्वाधिक समभाग सरकार विकत घेणार आहे. ‘व्होडाफोन-आयडिया’ने स्पेक्ट्रम लिलाव हप्त्यांची थकबाकी आणि ‘एजीआर’चा भरणा करण्याच्या बदल्यात कंपनीच्या समभागांची विक्री करण्याचा निर्णय घेतला आहे.

सरकार आणि आमच्यात झालेल्या चर्चेचं फलित ‘पॅकेज’ हेच आहे. सरकारने पॅकेज जाहीर केल्यानंतर हे सिद्ध होतंय, की कंपनी चालवायचा सरकारचा विचार नाही. त्यांना बाजारात तीन खासगी कंपन्या हव्या आहेत. त्यांना दोन वा एकाचीच सत्ता नकोय, असे ठक्कर म्हणाले.
मात्र कंपनी समूह ‘व्होडाफोन-आयडिया’चे व्यवस्थापन आणि संचालन करण्यासाठी तयार असल्याचेही ठक्कर यांनी या वेळी स्पष्ट केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Point Table: दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाचा Mumbai Indians ला फटका; सर्व सघांची झाली एक लढत, मोठी उलथापालथ

Supreme Court : अनावश्यक खटले टाळा! अधिकाऱ्याच्या बडतर्फीला आव्हान देणाऱ्या केंद्र सरकारला सुप्रीम कोर्टानं फटकारलं, ठोठावला दंड

Pune BJP News: पुणे महापालिका स्वीकृत नगरसेवकांना थेट पाच वर्षांची मुदत; अडीच वर्षांच्या आशेवर पाणी, अनेक कार्यकर्त्यांचा पत्ता कट

Countries with most uranium: अणुऊर्जेसाठी लागणारं युरेनियम कोणत्या देशाकडे सर्वाधिक आहे? भारत, पाकिस्तान कितव्या क्रमांकावर?

Kidney Transplant : मूत्रपिंड प्रत्यारोपणासाठी १९७० रुग्ण प्रतीक्षेत; पुणे विभागातील १४०० पुरुषांसह ५७० महिलांचाही समावेश

SCROLL FOR NEXT