Indian oil corporation record highest revenue by any Indian co record profit in fy22
Indian oil corporation record highest revenue by any Indian co record profit in fy22  
अर्थविश्व

महागाईने सामान्य बेजार, इंडियन ऑईलने मिळवला रेकॉर्डब्रेक 24 हजार कोटींचा नफा

सकाळ डिजिटल टीम

पेट्रोल डिझेलच्या वाढलेल्या किंमतींमुळे नागरीक बेजार झाले आहेत, यादर्म्यान देशातील सर्वात मोठी तेल कंपनी इंडियन ऑइल (Indian Oil) ने जारी केलेला आर्थिक अहवाल पाहता कंपनीने नफ्याचे सर्व विक्रम मोडीत काढले आहेत. जानेवारी ते मार्च या कालावधीत तेल कंपन्यांना प्रति लिटर 9 रुपयांपर्यंत तोटा होत असल्याचं सांगण्यात येत असताना इंडियनऑईलला या तिमाहीत 6,021.88 कोटी रुपयांचा नफा झाला. या कंपनीचा देशातील पेट्रोलियम बाजारपेठेपैकी निम्मा वाटा आहे.

इंडियन ऑइल ही देशातील सर्वात मोठी तेल कंपनी आहे. दरम्यान या कंपनीच्या आर्थिक अहवालानुसार, 2020-21 मध्ये कंपनीचे एकत्रित उत्पन्न 7.36 लाख कोटी रुपये होते. कोणत्याही कंपनीच्या एकाच आर्थिक वर्षातील कमाईपेक्षा ही रक्कम अधिक आहे, असे कंपनीचे वित्तसंचालक संदीप गुप्ता यांनी सांगितले. या कालावधीत कंपनीने 24,184.10 कोटी रुपयांचा निव्वळ नफा कमावला आहे, जो आजपर्यंतचा विक्रम आहे.

मार्चच्या शेवटच्या 10 दिवसांत पेट्रोल आणि डिझेलच्या किमती वाढल्या आहेत. इंडियन ऑइलने गेल्या आर्थिक वर्षात निर्यातीसह 864.07 लाख टन उत्पादनांची विक्री केली आहे. 1 जानेवारी ते 21 मार्चपर्यंत पेट्रोल आणि डिझेलचे दर स्थिर होते. मार्चच्या शेवटच्या 10 दिवसांत नऊ दिवस भावात वाढ झाली होती.

देशात महागाई 15 वर्षांच्या उच्चांकावर

केंद्र सरकार 2012-13 पासून नवीन सीरीजमध्यून घाऊक महागाई दर (WPI) डेटा जारी करत आहे. त्यानुसार, 15.08% हा दहा वर्षांतील सर्वोच्च आकडा आहे. एप्रिल 2021 पासून 13व्या महिन्यात WPI-आधारित घाऊक महागाई 10% च्या वर राहिली आहे. त्याच वेळी, खाद्यपदार्थ, पेट्रोल-डिझेल आणि इतर वस्तूंच्या किमती वाढल्यामुळे एप्रिलमध्ये घाऊक महागाईचा दर 15.08% च्या विक्रमी पातळीवर पोहोचला. तो गेल्या महिन्यात (मार्चमध्ये) 14.55% आणि एका वर्षापूर्वी म्हणजेच एप्रिल 2021 मध्ये 10.74% होता.

घाऊक महागाईचा परिणाम किरकोळ विक्रीवरही दिसून येत आहे, बँक ऑफ बडोदाचे मुख्य अर्थशास्त्रज्ञ मदन सबनवीस म्हणतात, WPI मध्ये उत्पादित उत्पादनांसाठी 64.23% वेटेज आहे, तर कंज्युमर प्राइस इंडेक्स (CPI) म्हणजेच किरकोळ विक्रीला कमी वेटेज आहे. जर खाद्यपदार्थ मोठ्या प्रमाणात महाग असतील तर CPI वर कमी परिणाम होतो. सेवा WPI मध्ये सर्व्हिसेसचा समावेश नसतो तर सीपीआयमध्ये आरोग्य, शिक्षण आणि वाहतूक यांचाही समावेश आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024: आजपर्यंत आयपीएलच नाही, तर T20 च्या इतिहासात जे कोणालाच जमलं नव्हतं, ते KKR ने लखनौमध्ये करून दाखवलं

CISCE Result : ‘सीआयएससीई’च्या दहावी-बारावीचा निकाल उद्या होणार जाहीर; 'येथे' बघा रिझल्ट

IPL 2024 LSG vs KKR: दमदार फलंदाजीनंतर कोलकाताच्या गोलंदाजांनी उडवला लखनौचा धुव्वा! पाँइंट्स टेबलमध्येही गाठला पहिला नंबर

Lok Sabha Election : 'PM मोदी हे कायमच आरक्षणाच्या विरोधात, आताही त्यांना...'; राहुल गांधीची घणाघाती टीका

Sharad Pawar : तब्येतीच्या कारणामुळे शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द

SCROLL FOR NEXT