Share Market sakal media
अर्थविश्व

सेन्सेक्स 166 अंशांनी घसरला; निर्देशांकांची तिसरी घसरण

कृष्ण जोशी

मुंबई : ओमायक्रॉन विषाणू (Omicron virus) तसेच जागतिक आर्थिक धोरणांची (international financial policy) धास्ती यामुळे आज भारतीय शेअर बाजारांमध्ये (Indian share market) सलग तिसऱ्या दिवशी घसरण झाली. आज सेन्सेक्स (Sensex) 166.33 अंश तर निफ्टी (Nifty) 43.35 अंश घसरला.

आज वाहनउद्योग तसेच दूरसंचार कंपन्या मंदीत होत्या तर औषधनिर्मिती व आयटी कंपन्या तेजी दाखवीत बंद झाल्या. आज दिवसअखेरीस सेन्सेक्स 58,117.09 अंश तर निफ्टी 17,324.90 अंशांवर बंद झाला. आज बजाज फायनान्स 151 रुपयांनी घसरून 7,068 रुपयांवर तर कोटक बँक 32 रुपयांनी घसरून 1840 रुपयांवर स्थिरावला. बजाज फिनसर्व्ह 169 रुपयांनी घसरून 17,150 रुपयांवर आला, तर रिलायन्स इंडस्ट्रीज देखील 2,380 रुपयांपर्यंत घसरला.

एअरटेल देखील आज सातशे रुपयांखाली (बंद भाव 691 रु.) आला. महिंद्र आणि महिंद्र, मारुती, बजाज ऑटो या वाहन कंपन्या तसेच सनफार्मा, अल्ट्राटेक, एचडीएफसी बँक या शेअरचे भावदेखील घसरले. तर दुसरीकडे डॉ. रेड्डीज लॅब 48 रुपयांनी वाढून 4,646 रुपयांवर, नेस्ले 196 रुपयांनी वाढून 19,197 रुपयांवर पोहोचला. अॅक्सीस, इंडसइंड, आयसीआयसीआय या बँका, इन्फोसिस, टीसीएस, टेक महिंद्र, एचसीएल टेक या आयटी कंपन्या, हिंदुस्थान युनीलिव्हर, एशियन पेंट, लार्सन टुब्रो या मोठ्या कंपन्यांच्या शेअरचे भाव घसरले.

आजचे सोन्याचांदीचे भाव

सोने - 48,150 रु.

चांदी - 61,500 रु.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nepal Protest Updates: नेपाळमध्ये हिंसाचाराचा भडका ! भारताने विमान, रेल्वे सेवा केली स्थगित, नागरिकांना महत्त्वाचे आवाहन

Archery World Championship 2025 : भारतीय महिला तिरंदाजांचा ब्राँझपदकासाठी लढा; दक्षिण कोरियाशी लढत

भरदिवसा घरफोडी! 'वहागावात साडेचार तोळे दागिन्‍यांसह ३५ हजारांची रोकड लंपास'; वाई तालुक्यात भीतीचे वातावरण

Latest Marathi News Updates : आज मराठवाड्यातील काही भागांत विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता

Asia Cup 2025 : सामना अमिरातीबरोबर, पण तयारी पाकविरुद्धची; आशिया चषक स्पर्धेत आजपासून भारताची मोहिम

SCROLL FOR NEXT