Infosys 
अर्थविश्व

Infosys कडून गोड बातमी; शेअरमधून बक्कळ पैसे कमावण्याची संधी

सुमित बागुल

भारतीय शेअर बाजारात अशा काही दिग्गज कंपन्या आहेत ज्यांनी या आधीही गुंतवणूकदारांना चांगला परतावा दिला आहे.

भारतीय शेअर बाजारात अशा काही दिग्गज कंपन्या आहेत ज्यांनी या आधीही गुंतवणूकदारांना चांगला परतावा दिला आहे. या कंपन्या येत्या काळातही आपल्या गुंतवणूकदारांना चांगला परतावा देतील असं शेअर मार्केटमधील तज्ज्ञ सांगतात. अशाच दिग्गज कंपन्यांपैकी एक कंपनी म्हणजे आयटी क्षेत्रातील दुसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी कंपनी इन्फोसिस. या इन्फोसिस कंपनीच्या शेअर्सच्या माध्यमातून तुम्हाला चालून आली आहे बक्कळ पैसे कमावण्याची संधी.

9 हजार 200 कोटींचा बाय बॅक

इन्फोसिस आजपासून आपल्याच कंपनीचे शेअर्स बाजारातून परत विकत घेणार आहे. तब्बल 9 हजार 200 कोटी रुपयांचे शेअर्स इन्फोसिस कंपनी पुन्हा विकत घेणार आहे. आजपासून ही 'बाय बॅक'ची प्रक्रिया सुरु होणार आहे. अशातच, या बाय बॅक आधीच कंपनीच्या शेअरच्या किमती कालच्या ट्रेडिंग सत्रात तब्बल 3.75 टक्के वधारलेल्या पाहायला मिळाल्या. कालच्या सत्रात इन्फोसिस कंपनीच्या शेअर्सच्या किंमती 1हजार 559.15 रुपयांवर बंद झाल्यात. महत्त्वाची बाब म्हणजे कालच्या ट्रेडिंग सत्रात कंपनीच्या शेअर्सच्या किमतीने आतापर्यंतचा उच्चांक म्हणजेच 1 हजार 568.35 रुपये देखील गाठला आहे.

आजपासून करणार बाय बॅक

Infosys कंपनीने आपले गुंतवणूकदारांना मागील एक वर्षात बक्कळ 123 टक्के परतावा दिला आहे. या वर्षी इन्फोसिस कंपनीने आतापर्यंत 24 टक्के परतावा दिला आहे. वाढत्या शेअर्सच्या किमतीमुळे कंपनीची मार्केट कॅप 6 लाख 62 हजार कोटींवर गेली आहे. इन्फोसिस कंपनीने आपल्या बाय बॅक प्लॅनमध्ये 1 हजार 750 रुपये या अधिकतम किमतीपर्यंत तब्बल 9 हजार 200 कोटी रुपयांचे शेअर्स खरेदी करण्याचं ठरवलं आहे. या बाय बॅक साठी कंपनीच्या शेअर होल्डर्स आणि बोर्डाकडून मान्यता देखील मिळाली आहे. आज म्हणजेच शुक्रवारपासून कंपनी बाय बॅक करणार आहे.

राखीव रकमेतून बाय बॅक
या संपूर्ण प्रक्रियेसाठी इन्फोसिस कंपनीने कोटक कॅपिटल या कंपनीला मॅनेजर म्हणून नियुक्त नियुत केलं आहे. बायबॅक हा कंपनीकडे असलेल्या राखीव रकमेतून केला जाणार आहे. कंपनीच्या बोर्डानी एप्रिल महिन्यात 15 हजार 600 कोटींच्या भांडवल परताव्याची योजना केली होती. यामध्ये 6 कोटी 400 रुपयांचा फायनल डिव्हीडंट आणि 9 हजार 200 रुपयांच्या बायबॅकचा देखील समावेश होता.

बायबॅक म्हणजे नक्की काय ?
जेंव्हा कंपनी शेअर बाजारातील स्वतःचेच शेअर मार्केटमधील किमतीवर विकत घेते, त्याला बाय बॅक असं म्हंटल जातं. जेंव्हा कंपनी सुस्थितीत असते तेंव्हा कंपनी बाय बँक करते. यामुळे शेअर्सच्या किमती वाढतात आणि गुंतवणूकदारांना आणि ट्रेडिंग करणाऱ्यांना देखील फायदा होतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CJP Delhi Protest : दिल्लीत आज तणावपूर्ण दिवस ! सीजेपीच्या निदर्शनाला पोलीसांचा विरोध, राहुल गांधींचा इंडिया गेट ते सर्वोच्च न्यायालय मोर्चा

Fodder Shortage: सध्याचा चारा पुरणार फेब्रुवारी अखेरपर्यंत;जिल्ह्यात २७ टक्के पावसाची तूट; खरिपाचे उत्पन्न घटणार

Maharashtra Navratri 2026: साडेतीन शक्तिपीठांवर भक्तीचा जागर! तुळजाभवानी, रेणुकामाता, अंबाबाईसह सप्तशृंगीच्या दर्शनासाठी गर्दी

Pune News: पुण्यात बांधकाम परवानगीचे नियम बदलले; लेआउटमधील रस्त्यांबाबत पीएमआरडीएचा मोठा निर्णय, काय आहेत नवे नियम?

Water Rights: मराठवाड्याच्या हक्काचे पाणी कागदावरच; १६८ टीएमसी, २५ टीएमसीसह अन्य निर्णय प्रलंबित असल्याचा समितीचा आरोप

SCROLL FOR NEXT