International-Exchange
International-Exchange 
अर्थविश्व

आंतरराष्ट्रीय एक्सचेंजमध्ये आयएनआर - यूएसडी एफअँडओ कॉन्ट्रॅक्ट्स सुरू 

वृत्तसंस्था

नवी दिल्ली - केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी शुक्रवारी व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून गांधीनगर येथील जीआयएफटी आंतरराष्ट्रीय वित्तीय सेवा केंद्रात बीएसईच्या इंडिया आयएनएक्स आणि एनएसईच्या एनएसई-आयएफएससी या दोन आंतरराष्ट्रीय एक्सचेंजवर आयएनआर-यूएसडीफ्युचर्स आणि ऑप्शन्स कॉन्ट्रॅक्ट्स सुरू केले.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

गेल्या दशकात किंवा त्याहून अधिक काळापूर्वी भारताशी संबंधित वित्तीय सेवांमधील महत्त्वपूर्ण बाजार हिस्सा अन्य आंतरराष्ट्रीय वित्तीय केंद्रांमध्ये गेला आहे. हा व्यवसाय भारतात आणणे भारतातील आर्थिक घडामोडी आणि  रोजगार निर्मितीच्या दृष्टीने फायदेशीर आहे. जीआयएफटी-आयएफएससीमधील एक्सचेंजमध्ये आयएनआर-यूएसडी काँट्रॅक्ट्सची सुरुवात हे या दिशेने उचललेले एक पाऊल आहे. जीआयएफटी -आयएफएससीमधील जगभरातून सहभागी झालेल्यांसाठी आयएनआर-यूएसडी काँट्रॅक्ट्स दिवसाचे 22 तास उपलब्ध असेल.

जीआयएफटी-आयएफएससी येथील जागतिक दर्जाचे व्यवसाय वातावरण आणि स्पर्धात्मक कर पद्धतीच्या पार्श्वभूमीवर भारतात आयएनआर-यूएसडी काँट्रॅक्ट्सच्या व्यापारात मोठी वाढ होण्याची शक्यता आहे. यामुळे आयएफएससीच्या माध्यमातून भारतात मोठ्या प्रमाणात जागतिक सहभाग वाढेल तसेच भारताचे आयएफएससी जागतिक स्तरावर जोडले जाईल.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024, RCB vs CSK: चेन्नईचा 17 व्या हंगामातील प्रवास थांबला! धोनीचीही कारकिर्द संपली? सामन्यानंतरचा पाहा Video

Loksabha Election 2024 : हुश्श..! प्रचार संपला, राज्यात तोफा शांत, तलवारी म्यान

IPL 2024: RCB चा आनंद गगनात मावेना! प्लेऑफमध्ये पोहचताच केला जोरदार जल्लोष, पाहा Video

‘चार सौ पार’ पासून बहुमताच्या आकड्यापर्यंत

सत्ता ठरवणारा उ त्त र रं ग

SCROLL FOR NEXT