Cost Cutting Sakal Digital
अर्थविश्व

Layoffs India : जागतिक मंदीमुळे 'ही' कंपनी देणार कर्मचाऱ्यांना नारळ

कंपनी खर्च कमी करण्यासाठी काही कठोर निर्णय घेत आहे. ज्यामुळे जागतिक बाजारपेठेत कंपनी टिकून राहावी यासाठीही प्रयत्न केले जात आहेत.

सकाळ डिजिटल टीम

जगातील प्रसिद्ध कंपन्यांपैकी एक असलेल्या इंटेलने मोठ्या संख्येने कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करण्याचा निर्णय कंपनीने घेतला आहे. जागतिक मंदीमुळे असा निर्णय घेतल्याचे सांगितले जात आहे.

इंटेल कंपनी संगणक आणि फोनचे प्रोसेसर तयार करण्यासाठी प्रसिद्ध आहे, ज्यामध्ये जगभरातील लोक काम करतात. या नोकर कपातीमुळे कंपनी सुमारे $3 अब्ज वार्षिक बचत करण्याची योजना आखत आहे. या निर्णयामुळे कंपनीला 2025 पर्यंत $8-10 अब्जपर्यंत फायदा होऊ शकतो.

इंटेलचे सीईओ पॅट गेल्सिंगर यांनी सांगितले की, कंपनी खर्च कमी करण्यासाठी काही कठोर निर्णय घेत आहे. ज्यामुळे जागतिक बाजारपेठेत कंपनी टिकून राहावी यासाठीही प्रयत्न केले जात आहेत. येत्या काही दिवसांत खर्च कमी करण्याबरोबरच इतर खर्चात कपात करण्याचीही योजना आहे. नोकर कपातीमुळे कंपनीची वार्षिक बचत 3 अब्ज डॉलर्सची आहे. 2025 पर्यंत $8 ते 10 बिलियन बचत करण्याचे कंपनीचे उद्दिष्ट आहे.

कंपनीने अजून किती कर्मचाऱ्यांना काढले आहे, हे सांगितले नसले तरी काही रिपोर्ट्समध्ये बहुतांश सेल्स आणि मार्केटिंग कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकण्यात येणार असल्याचा दावा केला जात आहे. इंटेल गेल्या काही दिवसांपासून तोट्यात आहे, जागतिक स्तरावर संगणकाच्या विक्रीत घट झाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sugar Rate Hike : विक्रमी दरवाढीमुळे साखर ‘कडू’! दर ७० ते ७२ रुपयांवर; सण-उत्सवावर महागाईचे सावट

ISRO : हिंजवडीतील विद्यार्थ्यांची अंतराळाच्या दिशेने झेप! इस्रो,‘ईएसए’ भेटीसाठी निवड; कृष्‍णिका, श्रीजितची स्वप्नांना गवसणी

Gadchiroli Ashram School Case: शिक्षण विभागाचे दोन अधिकारी निलंबित; साहाय्यक प्रकल्प अधिकारी सादमवार, विस्तार अधिकारी कन्नाके यांचा समावेश

Marathi News Live Updates : काश्मिरी पंडितांना दहशतवाद्यांकडून धमकी

Shambhuraj Desai : जिल्हा बँकेसाठी वेट ॲण्ड वॉच; अंतिम याद्यांनंतरच शिवसेनेची भूमिका

SCROLL FOR NEXT