gold  sakal media
अर्थविश्व

सोन्याची जागतिक मागणी घटली

कृष्ण जोशी

मुंबई : नुकत्याच संपलेल्या जुलै ते सप्टेंबर या वर्ष 2021 च्या तिसऱ्या तिमाहीत जागतिक स्तरावर (international market) सोन्याची मागणी (Gold demand decreases) घटल्याचा अहवाल वर्ल्ड गोल्ड काउंसिलने (world gold council) दिला आहे. मागील वर्षीच्या याच तिमाहीतील मागणीच्या तुलनेत ही घट सात टक्के होती तर एप्रिल ते जून या तिमाहीतील मागणीच्या तुलनेत या तिमाहीच्या मागणीतील घट 13 टक्के आहे. या तिमाहीतील मागणी 831 टन होती, असेही अहवालात म्हटले आहे. सोन्याचे व्यवहार (Gold trading) करणाऱ्या एक्सचेंज ट्रेडेड फंडमधील (Gold ETF) विक्री वाढल्याने ही वेळ आली.

मागील वर्षी कोरोनाच्या जागतिक महासंकटामुळे खरेदीत आलेली अचानक तेजी आली होती. त्यामुळे त्या तुलनेत सध्याची घट समर्थनीय ठरते, असेही अहवालात म्हटले आहे. जगभरात सोन्याच्या दागिन्यांची खरेदी 443 टनांवर गेली, ही खरेदी मागीलवर्षीच्या तुलनेत 33 टक्के जास्त होती. तर सोन्याच्या चिपा, बिस्किटे व नाणी या स्वरुपातही छोट्या गुंतवणूकदारांनी मोठ्या प्रमाणात खरेदी केली. या तिमाहीत ही खरेदी 262 टन झाली. सलग पाचव्या तिमाहीत या क्षेत्रात वाढ नोंदवली गेली.

इलेक्ट्रॉनिक्स उद्योगांमध्ये वापरल्या गेलेल्या सोन्यातही मागीलवर्षीच्या तुलनेत नऊ टक्के वाढ झाली तर जगातील विविध मध्यवर्ती बँकांनीही आपल्या सोन्याच्या साठ्यात आणखी 69 टनांची भर घातली. वर्षापूर्वी कोरोनाच्या जागतिक संकटामुळे सुरक्षित गुंतवणुकीचे साधन म्हणून सर्वजण सोन्याकडेच पहात होते. त्यामुळे सन 2020 च्या पहिल्या नऊ महिन्यांत एक हजार टन सोनेखरेदी झाली. त्यातुलनेत यावर्षीचे चित्र सकारात्मक असल्याचे मत कौन्सिलचे ज्येष्ठ बाजार विश्लेषक लुईस स्ट्रीट यांनी व्यक्त केले. पुढील वर्षभरातही असेच चित्र राहील, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

2021 च्या तिसऱ्या तिमाहीच्या गोल्ड डिमांड ट्रेंड्स अहवालातील ठळक निष्कर्ष :

1) बार आणि कॉइनची मागणी मागील वर्षीच्या तुलनेत 18 टक्के आणि तिमाहीच्या तुलनेत 8 टक्के वाढली.

2) उद्योग क्षेत्रातील मागणी पूर्वपदावर येऊन ती 84 टन झाली, मागील तिमाहीच्या तुलनेत ती चार टक्के अधिक होती.

3) मागील वर्षीच्या तुलनेत एकूण पुरवठा तीन टक्के कमी म्हणजे 1,239 टन होता. खाणीतील उत्पादन वाढत असूनही ही घट झाली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT