अर्थविश्व

टॉय पार्कमध्ये 400 कोटींची गुंतवणूक, हजारो भारतीयांना मिळणार नोकरी

नामदेव कुंभार

Rs 400 crore investment approved for Toy Park : भारतात सुरु होणाऱ्या टॉय पार्कमुळे चीनची झोप उडणार आहे. नोएडा येथे टॉय पार्क उभारण्यात येत आहे. यामध्ये 400 कोटींपेक्षा जास्त रुपयांची गुंतवणूक असून 6000 पेक्षा जास्त जणांना कायमस्वरुपी रोजगार मिळणार आहे. यासाठी तब्बल134 उद्योगपतींनी येथे जमीन विकत घेतली आहे. योगी आदित्यनाथ सरकारने नोएडा येथे सेक्टर 33 मध्ये टॉय पार्कची निर्मिती केली आहे. भारतात तयार होणाऱ्या या टॉय पार्कमुळे चीनची झोप उडणार आहे.

देशात सध्या खेळणी तयार करणारे जवळपास चार हजार युनिट्स आहेत. यामध्ये आणखी भर पडणार असून आता यापुढे खेळण्याच्या उद्योगातही भारत चीनला टक्कर देणार आहे. टॉय पार्कसाठी 134 उद्योगपतींनी जमीन विकत घेतली आहे. जवळपास 410 कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहेत. यामध्ये 6157 जणांना कायमस्वरुपी नोकरी मिळणार आहे.

गेल्या वर्षी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मन की बात या कार्यक्रमात खेळणी व्यवसायात भारतीयांचा वाटा वाढण्यावर वक्तव्य केलं होतं. खेळणी व्यवसायात भारतीयांचा वाटा वाढायला हवा, त्यासाठी सरकार प्रयत्नशील असल्याचं मोदींनी सांगितलं होतं. त्याचाच एक भाग म्हणून उत्तर प्रदेशमध्ये टॉय पार्क उभारण्यात येत आहे. त्यानुसार सेक्टर 33 मध्ये 100 एकर पेक्षा जास्त जमीन 134 उद्योगपतींना देण्यात आली आहे. लवकरच येथे खेळणी तयार करण्याच्या कामाचा शुभारंभ होणार आहे.

येथे जमीन विकत घेणाऱ्या कंपनीमध्ये प्रामुख्याने, फन राइड टॉयस एलएलपी, सुपर शूज, फन जू टॉयज इंडिया, आयुष टॉय मार्केटिंग, सनलार्ड अप्पारेल्स, भारत प्लास्टिक, जय श्री कृष्णा, गणपती क्रिएशन आणि आरआरएस ट्रेडर्स यासारख्या कंपन्या आहेत. टॉय पार्कमध्ये प्लास्टिक आणि लाकडाबासून खेळणी तयार होणार आहेत. सध्या चीनमध्ये तयार होणाऱ्या खेळण्यानं भारतासह विदेशातही वर्चस्व स्थापित केलं आहे. टॉय पार्कमध्ये उभारण्यात येणाऱ्या खळणी उद्योगामुळे चीनची झोप उडणार आहे. 2024 च्या अखेरपर्यंत भारतीय खेळणी व्यवसाय जवळपास 147 ते 221 कोटी रुपयांचा होईल असा अंदाज काही तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Pub Policy: अपघातप्रकरणी उलटसुलट आरोप झाल्यानं पोलीस आयुक्तांची मोठी घोषणा! 'पब्ज'बाबत दोन दिवसांत आणणार नवीन धोरण

IPL 2024: सनरायझर्स हैदराबाद दुसऱ्यांदा उंचावणार ट्रॉफी? आठ वर्षापूर्वीचे योगायोग पुन्हा आले जुळून

Maharashtra Board 12th Result 2024: प्रतीक्षा संपली ! HSC बारावीचा निकाल जाहीर, मार्क्स किती मिळाले ? एका क्लिकवर पाहा रिझल्ट

Latest Marathi News Live Update: भारतीय नागरिकच माझे उत्तराधिकारी- पंतप्रधान मोदी

Mumbai Election: मतदानादिवशी ढिसाळ कारभार, सरकारकडून गंभीर दखल; मुख्यमंत्री शिंदेंकडून चौकशीचे आदेश

SCROLL FOR NEXT