Investing Planning
Investing Planning 
अर्थविश्व

'इन्व्हेस्टमेंट क्लोनिंग' म्हणजे काय?; ते योग्य की अयोग्य?

सुमित बागुल

मुंबई : आपल्या सर्वांनाच खूप पैसे कामवायचे आहेत. अनेक जण लवकर पैसे कमावण्यासाठी विविध पर्यायांचा वापर करतात. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करून मोठ्या प्रमाणात पैसे कमवता येऊ शकतात हे आपण पाहिलंय. तशी उदाहरणं देखील आपल्या डोळ्यासमोर आहेत. मग ते राकेश झुनझुनवाला (Rakesh Zunzunwala) असोत किंवा राधाकृष्ण दमानी (Radhakrishn Damani). जेंव्हा जेंव्हा असे मोठे गुंतवणूकदार एखादा शेअर विकत घेतात, तेंव्हा तेंव्हा मोठ्या प्रमाणावर तुमच्या-आमच्या सारखे लहान गुंतवणूकदार आपले पैसे त्या शेअर्समध्ये टाकतात. यालाच सोप्या भाषेत 'इन्व्हेस्टमेंट क्लोनिंग' म्हणतात. या लेखाच्या माध्यमातून आपण इन्व्हेस्टमेंट क्लोनिंगबाबत अत्यंत महत्त्वाची माहिती जाणून घेणार आहोत. (know what is investment cloning and is it good or bad research article)

प्रसिद्ध गुंतवणूकदारांचे पोर्टफोलिओ कॉपी केल्यानं काय होऊ शकतं?

बड्या गुंतवणूकदारांच्या संपूर्ण पोर्टफोलिओची माहिती सर्वसामान्यांना कधीही मिळू शकत नाही. भारतीय शेअर बाजारात एक नियम आहे, ज्या अन्वये कंपन्यांना केवळ त्याच गुंतवणूकदारांची नावं प्रसिद्ध करावी लागतात ज्यांच्याकडे त्या कंपनीचे १ टक्के किंवा अधिकचे शेअर्स आहेत. उदाहरणार्थ एखाद्या कंपनीची मार्केट कॅप १० लाख कोटी रुपयांची आहे. अशा कंपनीत कुणा मोठ्या गुंतवणूकदारांनी १० हजार कोटी रुपयांची गुंतवणूक केली तरच त्यांचं नाव तुम्हाला माहिती होऊ शकेल किंवा बातम्यांमध्ये येईल.

पण एखाद्या बड्या गुंतवणूकदाराने एखाद्या मोठ्या कंपनीत ०.९९ टक्के हिस्सेदारी खरेदी केली तरी तुम्हाला त्याबाबत माहिती मिळू शकणार नाही. म्हणूनच प्रकाशझोतात न येण्यासाठी मोठे गुंतवणूकदार १ टक्क्यांपेक्षा कमी हिस्सेदारी शेअर्सच्या रूपात विकत घेतात. हे झालं मोठ्या कंपन्यांचं. मात्र, कमी भांडवल असणाऱ्या ५००, ६०० कोटीच्या कंपन्यांमध्ये कुणी ५ कोटी किंवा ६ कोटी रुपये जरी गुंतवले तरीही १ टक्के हिस्सेदारी खरेदी होऊ शकते आणि त्याबाबत इतर गुंतवणूकदारांना माहितीही होऊ शकते. म्हणूनच आपल्याला मोठ्या गुंतवणूकदारांची स्मॉल कॅप मधील गुंतवणूक तर समजते. मात्र, बड्या म्हणजेच लार्ज कॅप मधील गुंतवणूक समजू शकत नाही.

असं देखील होऊ शकतं

अशात असं देखील होऊ शकतं की, एखादा मोठा गुंतवणूकदार आपल्या एकूण रकमेच्या ७० टक्के हिस्सा हा मोठ्या कंपन्यांमध्ये गुंतवत असेल आणि केवळ ३० टक्के हिस्सा लहान कंपन्यांमध्ये गुंतवत असेल. पण आपल्याला मात्र असं वाटू शकतं की तो बडा गुंतवणूकदार केवळ लहान कंपन्यांमध्येच गुंतवणूक करतो आहे. ते पाहून आपण पण आपला पोर्टफोलिओ केवळ लहान कंपन्यांचा बनवतो. म्हणून कधीही आपला संपूर्ण पोर्टफोलिओ कोणत्याही मोठ्या गुंतवणूकदाराबाबत मिळालेल्या अर्धवट माहितीनुसार बनवू नका.

मोठ्या गुंतवणूकदारांना फॉलो करायचंच नाही का?

मोठे गुंतवणूकदार जेंव्हा एखाद्या कंपनीत पैसे गुंतवतात तेंव्हा ते त्या कंपनीबाबत पूर्ण रिसर्च करतात. अशात बड्या गुंतवणूकदारांनी कोणते शेअर विकले किंवा विकत घेतले या बातम्यांचा ट्रॅक ठेवणं चांगली गोष्ट आहे. यामुळे तुम्हाला नवनवीन कंपन्यांबाबत माहिती मिळेल, तुम्हाला नवनवीन आयडिया मिळतील. यावरून तुम्हाला तुमचा स्वतःचा रिसर्च करण्यासाठी नवनवीन कंपन्या मिळतील. म्हणूनच तुम्ही आंधळेपणाने कोणत्याही मोठ्या गुंतवणूकदाराला फॉलो करू नका. स्वतःचा अभ्यास करा आणि मगच गुंतवणूक करा.

(नोंद : क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्यप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024: आजपर्यंत आयपीएलच नाही, तर T20 च्या इतिहासात जे कोणालाच जमलं नव्हतं, ते KKR ने लखनौमध्ये करून दाखवलं

CISCE Result : ‘सीआयएससीई’च्या दहावी-बारावीचा निकाल उद्या होणार जाहीर; 'येथे' बघा रिझल्ट

IPL 2024 LSG vs KKR: दमदार फलंदाजीनंतर कोलकाताच्या गोलंदाजांनी उडवला लखनौचा धुव्वा! पाँइंट्स टेबलमध्येही गाठला पहिला नंबर

Lok Sabha Election : 'PM मोदी हे कायमच आरक्षणाच्या विरोधात, आताही त्यांना...'; राहुल गांधीची घणाघाती टीका

Sharad Pawar : तब्येतीच्या कारणामुळे शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द

SCROLL FOR NEXT