Larsen and toubro sakal media
अर्थविश्व

‘एलअँडटी’ चे अध्यक्ष ए. एम नाईक यांना हुरून इंडियाचे मानांकन

- कृष्ण जोशी

मुंबई : ‘लार्सन अँड टुब्रो’चे (Larsen and toubro) अध्यक्ष ए. एम. नाईक (A.M naik) यांना ‘हुरुन इंडिया’ (hurun india) आणि ‘एडेलगिव्ह’ यांच्या ‘2021 मधील भारतातील आघाडीच्या परोपकारी व्यक्तीं’च्या यादीत ‘भारतातील सर्वात दानशूर कॉर्पोरेट लीडर’ (Donator corporator leader) म्हणून स्थान देण्यात आले आहे.

‘हुरुन रिपोर्ट’ मध्ये जगातील सर्वात जास्त ‘श्रीमंतांची यादी असते. वर्षात 100 कोटी रुपयांपेक्षा अधिक देणग्या देणाऱ्या अकरा व्यक्तींचा, तसेच 50 कोटी रुपयांपेक्षा जास्त देणग्या देणाऱ्या 20 जणांचा आणि 20 कोटी रुपयांहून अधिक रकमेच्या देणग्या देणाऱ्या 42 जणांचा या यादीमध्ये उल्लेख आहे. गेल्या वर्षीही सर्वात उल्लेखनीय नवीन प्रवेशिका या गटात नाईक यांचा ‘हुरुन यादी’त समावेश होता.

नाईक हे आरोग्यसेवा, शिक्षण आणि कौशल्य-निर्माण या तीन क्षेत्रांमध्ये वैयक्तिकरित्या सामाजिक कामे करतात. त्यांच्या ‘निराली मेमोरियल मेडिकल ट्रस्ट’ आणि ‘ए. एम. नाईक चॅरिटेबल ट्रस्ट’ या दोन संस्थांच्या माध्यमातून अनेक उपक्रम चालवले जातात. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2019 मध्ये गुजरातमधील नवसारी येथे निराली कर्करोग रुग्णालयाची पायाभरणी केली. आता हे रुग्णालय सुरु झाले आहे. उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू यांनी मार्चमध्ये निराली मल्टी-स्पेशालिटी हॉस्पिटलची पायाभरणी केली आहे.

गुजरात राज्यातील खारेल येथे ते एक मोठे शालेय शिक्षण संकुल उभारीत आहेत. कौशल्य-निर्मितीच्या क्षेत्रात काम करताना नाईक यांनी खारेल (गुजरात) येथे अनिल नाईक तांत्रिक प्रशिक्षण केंद्र उभारले आहे. कोणतीही औपचारिक पदवी आदी नसलेल्या गावांमधील स्त्री व पुरुषांना येथे शिक्षण दिले जाते. ही कामे मानवी जीवनाशी संबंधित असतात, या कामांमुळे माणसाचा जीव वाचतो आणि मानवी जीवनाचे परिवर्तन होते. असेच काम करणाऱ्या इतरांनाही या मानांकनामुळे प्रोत्साहन मिळेल, अशी प्रतिक्रिया नाईक यांनी यासंदर्भात व्यक्त केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CJP Delhi Protest : दिल्लीत आज तणावपूर्ण दिवस ! सीजेपीच्या निदर्शनाला पोलीसांचा विरोध, राहुल गांधींचा इंडिया गेट ते सर्वोच्च न्यायालय मोर्चा

Fodder Shortage: सध्याचा चारा पुरणार फेब्रुवारी अखेरपर्यंत;जिल्ह्यात २७ टक्के पावसाची तूट; खरिपाचे उत्पन्न घटणार

Maharashtra Navratri 2026: साडेतीन शक्तिपीठांवर भक्तीचा जागर! तुळजाभवानी, रेणुकामाता, अंबाबाईसह सप्तशृंगीच्या दर्शनासाठी गर्दी

Pune News: पुण्यात बांधकाम परवानगीचे नियम बदलले; लेआउटमधील रस्त्यांबाबत पीएमआरडीएचा मोठा निर्णय, काय आहेत नवे नियम?

Water Rights: मराठवाड्याच्या हक्काचे पाणी कागदावरच; १६८ टीएमसी, २५ टीएमसीसह अन्य निर्णय प्रलंबित असल्याचा समितीचा आरोप

SCROLL FOR NEXT