SBI Mutual Fund Multi-cap Scheme sakal
अर्थविश्व

SBI MF कडून मल्टी-कॅप योजना लाँच... गुंतवणूक करावी का ?

एसबीआय म्युच्युअल फंडाने नवीन मल्टी-कॅप योजना सुरू केली आहे.

शिल्पा गुजर

एसबीआय म्युच्युअल फंडाने (SBI Mutual Fund) नवीन मल्टी-कॅप योजना (Multi-cap Scheme) सुरू केली आहे. हा NFO सोमवारी गुंतवणूकदारांसाठी खुला झाला आहे. मल्टी-कॅप स्कीम स्मॉल-कॅप, मिड-कॅप आणि लार्ज-कॅप शेअर्समध्ये गुंतवणूक करतात. हा NFO 28 फेब्रुवारीला बंद होईल.

मल्टी-कॅप फंडाने स्मॉल-कॅप, मिड-कॅप आणि लार्ज-कॅप शेअर्समध्ये किमान 25-25 टक्के गुंतवणूक करणे आवश्यक असल्याचे सेबीचे नियम.सांगतात. पण, SBI मल्टी-कॅप फंडाला तिन्ही प्रकारच्या शेअर्समध्ये 27-27 टक्के गुंतवणूक करण्याची परवानगी असेल. बाकी पैसे गुंतवण्याचा निर्णय फंड मॅनेजर स्वतः घेऊ शकतात.

अतिरिक्त 2 टक्के (25 टक्क्यांऐवजी 27 टक्के) हे बाजारातील अस्थिरतेविरुद्ध बफर तयार करण्याचे उद्दिष्ट असल्याचे SBI MF चे संशोधन प्रमुख रुचित मेहता म्हणाले. आर श्रीनिवासन हे या फंडाचे फंड मॅनेजर आहेत. ते SBI MF मध्ये इक्विटीचे प्रमुखही आहेत. (SBI Mutual Fund Multi-cap Scheme)

या फंडाचा बेंचमार्क निफ्टी 500 मल्टीकॅप 50:25:25 आहे. पण, SBI मल्टीकॅप फंड बेंचमार्कच्या वेटच्या आधारावर त्याचा पोर्टफोलिओ तयार करणार नाही. एनालिस्ट्सच्या सल्ल्यानुसार हाय-कनव्हीक्शन आयडियाजना रँकिंग दिले जाईल. प्रत्येक स्टॉक आयडियासाठी, एनालिस्ट एक कॉन्फिडंस स्कोअर देईल, जो 1 ते 5 पर्यंत असेल.

हा फंड आपल्या पोर्टफोलिओमधील स्टॉकची संख्या 30 ते 35 दरम्यान ठेवेल. अशा प्रकारे हा फंड एका फोकस्ड फंडप्रमाणे चालवला जाईल. फ्लेक्सी-कॅप योजनांपेक्षा मल्टी-कॅप फंडांची कामगिरी अधिक रिस्की असते. याचे कारण मिड आणि स्मॉल कॅप शेअर्समध्ये जास्त एलोकेशन आहे.

मल्टी-कॅप फंड शेअर बाजारात चांगली कामगिरी करतात जेव्हा सर्व प्रकारचे स्टॉक, लहान किंवा मोठे, तेजीत असतात. पण जेव्हा बाजार केवळ लार्ज कॅप स्टॉक्स पाहतो तेव्हा फंडाच्या कामगिरीवर परिणाम होतो. फ्लेक्सी-कॅप फंड अशा परिस्थितीत चांगली कामगिरी करतात.

सध्या फ्लेक्सिकॅप फंड गुंतवणूकदारांसाठी अधिक योग्य असल्याचे प्लॅन अहेड वेल्थ एसबीआय म्युच्युअल फंडाने (SBI Mutual Fund) नवीन मल्टी-कॅप योजना (Multi-cap Scheme) सुरू केली आहे. हा NFO सोमवारी गुंतवणूकदारांसाठी खुला झाला आहे. मल्टी-कॅप स्कीम स्मॉल-कॅप, मिड-कॅप आणि लार्ज-कॅप शेअर्समध्ये गुंतवणूक करतात. हा NFO 28 फेब्रुवारीला बंद होईल.

मल्टी-कॅप फंडाने स्मॉल-कॅप, मिड-कॅप आणि लार्ज-कॅप शेअर्समध्ये किमान 25-25 टक्के गुंतवणूक करणे आवश्यक असल्याचे सेबीचे नियम.सांगतात. पण, SBI मल्टी-कॅप फंडाला तिन्ही प्रकारच्या शेअर्समध्ये 27-27 टक्के गुंतवणूक करण्याची परवानगी असेल. बाकी पैसे गुंतवण्याचा निर्णय फंड मॅनेजर स्वतः घेऊ शकतात.

अतिरिक्त 2 टक्के (25 टक्क्यांऐवजी 27 टक्के) हे बाजारातील अस्थिरतेविरुद्ध बफर तयार करण्याचे उद्दिष्ट असल्याचे SBI MF चे संशोधन प्रमुख रुचित मेहता म्हणाले. आर श्रीनिवासन हे या फंडाचे फंड मॅनेजर आहेत. ते SBI MF मध्ये इक्विटीचे प्रमुखही आहेत.डव्हायझर्सचे संस्थापक आणि मुख्य आर्थिक नियोजक विशाल धवन म्हणाले. गुंतवणूकदारांनी चांगल्या ट्रॅक रेकॉर्डसह फ्लेक्सिकॅप फंडामध्ये गुंतवणूक करणे चांगले असेल असेही ते म्हणाले.

नोंद : क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde: पुण्यात एकनाथ शिंदेंकडून 'जय गुजरात'ची घोषणा; अमित शाहांच्या उपस्थितीत नारेबाजी, व्हिडिओ व्हायरल

Katraj Issues : सोपानकाकानगरमध्ये नागरी सुविधांचा अभाव, नागरिकांमध्ये तीव्र नाराजी; तीन वर्षांपासून करत भरुनही महापालिकेचे दुर्लक्ष

Agriculture News : ऊस पिकावर हुमणीच्या प्रादुर्भावाचा धोका; कृषी विभागातर्फे प्रभावी उपाययोजना करण्याचे आवाहन

Women Empowerment: घरच नव्हे, गावही चालविणार! छप्पन्न गावांत लवकरच महिलाराज, १११ ग्रामपंचायतींचे आरक्षण जाहीर

IND vs ENG 2nd Test: हॅरी ब्रूकने 'खांद्या'ने वाचवली स्वतःची विकेट! लढवली अक्कल, पण झाला असता त्याचाच गेम; रिषभ पंत भडकला

SCROLL FOR NEXT