Layoffs 2023 Sakal
अर्थविश्व

Layoffs 2023 : नव्या वर्षात लाखो कर्मचारी गमावतील नोकऱ्या! धक्कादायक अहवाल जाहीर

गेल्या वर्षभरात Amazon, Netflix आणि Facebook सारख्या मोठ्या कंपन्यांनी नोकऱ्यांमध्ये मोठी कपात केली होती.

सकाळ डिजिटल टीम

2022 मध्ये कोरोनामुळे लाखो कर्मचाऱ्यांनी नोकऱ्या गमावल्या. गेल्या वर्षभरात Amazon, Netflix आणि Facebook सारख्या मोठ्या कंपन्यांनी नोकऱ्यांमध्ये मोठी कपात केली होती.

काही कंपन्यांनी नोकऱ्यांच्या कपातीसाठी कोरोनाचे कारण दिले. तज्ज्ञांच्या मते, 2023 मध्ये मागील वर्षांच्या तुलनेत नोकऱ्यांना अधिक धोका आहे.

विविध कंपन्यांमधील कर्मचारी कपातीवर लक्ष ठेवणाऱ्या एका वेबसाइटने (https://layoffs.fyi/) गेल्या काही वर्षांची आकडेवारी सादर केली आहे जी अतिशय धक्कादायक आहे.

layoffs.fyi वेबसाइटनुसार, गेल्या वर्षी 2022 मध्ये, 1,53,000 हून अधिक नोकऱ्यांवर गदा आली. हा आकडा फक्त टेक कंपन्यांचा आहे. तर 2021 मध्ये 15,000 नोकरी कपात दिसली आणि 2020 मध्ये हा आकडा 80,000 च्या आसपास होता.

हेही वाचा : ..तर तुम्हालाही मिळू शकेल इन्कमटॅक्सचा जुना रिफंड

तज्ज्ञांच्या मते, गेल्या वर्षीच्या तुलनेत जानेवारी 2023 मध्ये अधिक नोकरी कपात दिसून येईल. गुगल या महिन्यात हजारो लोकांच्या नोकऱ्याही काढून टाकू शकते. अॅमेझॉनबाबत तज्ज्ञांचेही असेच मत आहे की, या वर्षीच्या जानेवारीत अॅमेझॉन अनेक कर्मचाऱ्यांना बाहेरचा रस्ता दाखवू शकते.

ब्लूमबर्गच्या अहवालानुसार, गोल्डमन सॅक्सचे सीईओ डेव्हिड सोलोमन यांनीही कर्मचारी कापतीकडे लक्ष वेधले आहे. ते म्हणाले की, जानेवारी महिन्यात कर्मचाऱ्यांच्या संख्येत घट दिसून येऊ शकते.

2023 मध्ये अमेरिकेसह संपूर्ण जग मंदीच्या गर्तेत आहे. अशा परिस्थितीत 2022 सालापासूनच अनेक कंपन्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना कामावरून काढण्यास सुरुवात केली होती.

यामध्ये ट्विटर, मायक्रोसॉफ्ट, फेसबुकची मूळ कंपनी मेटा अशा अनेक बड्या कंपन्यांच्या नावांचा समावेश आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs NZ, 1st Test: शुभमन गिलने टॉस जिंकला! सिराजला मात्र पहिल्या कसोटीतही बाहेर बसवलं, कोणाला मिळाली Playing XI मध्ये संधी?

अमेरिकेने इराणविरुद्धच्या युद्धात एक्स्पायर झालेली क्षेपणास्त्रे वापरली; सिनेट आर्म्ड सर्व्हिसेस कमिटीसमोर सुनावणी

Truck Bike Accident : तेरवीहून परतताना पती-पत्नी ठार; शिंदोला मार्गावर ट्रक-दुचाकीचा भीषण अपघात

Chadrapur Crime : चंद्रपूर हादरले! चौकात कवटी, रेल्वे पटरीलगत मृतदेह; दोन्ही अवयव एकाच व्यक्तीचे असल्याचा संशय

Dengue-Like Infection : मुंढेत ४० जणांना डेंगीसदृश्य लागण; गावात खळबळ

SCROLL FOR NEXT