LIC Policy
LIC Policy sakal
अर्थविश्व

LIC Policy : 'या' विमा पॉलिसीमध्ये 45 रुपये गुंतवा! निवृत्तीनंतर मिळवा 36,000 रुपये पेन्शन

सकाळ डिजिटल टीम

Jeevan Umang Policy : जर तुम्ही तुमच्या वृद्धापकाळासाठी आर्थिक नियोजन करत असाल, तर भारतीय आयुर्विमा महामंडळाच्या अनेक प्रकारच्या पॉलिसी तुम्हाला मदत करू शकतात. एलआयसी आपल्या गुंतवणूकदारांसाठी वेळोवेळी विविध योजना घेऊन येत असते. एलआयसीच्या योजनेत गुंतवणूक करून तुम्हाला वयाच्या 100 वर्षापर्यंत पेन्शन मिळू शकते. या पॉलिसीचे नाव एलआईसी जीवन उमंग पॉलिसी आहे. या पॉलिसीची खास गोष्ट म्हणजे या पॉलिसीमध्ये तुम्हाला दरवर्षी 36,000 रुपये पेन्शन मिळू शकते. तुम्हालाही वृद्धापकाळात नियमित उत्पन्न मिळवायचे असेल, तर जीवन उमंग पॉलिसी (LIC Jeevan Umang Policy Details) च्या तपशीलांबद्दल जाणून घ्या.

हेही वाचा : काय घडलं होतं उदयनराजेंच्या जलमंदिर पॅलेसमध्ये १९५२ साली?

LIC ची जीवन उमंग पॉलिसी ही एक एंडॉवमेंट योजना  (Endowment Plan) आहे. ज्यामध्ये गुंतवणूक करून पॉलिसीधारकाला विमा संरक्षणाचा लाभ मिळतो तसेच मॅच्युरिटी निश्चित उत्पन्न मिळते. या योजनेची खास गोष्ट म्हणजे लहानांपासून मोठ्यांपर्यंत प्रत्येकजण यामध्ये गुंतवणूक करू शकतो. ही पॉलिसी खरेदी करण्याचे वय 90 दिवस ते 55 वर्षे आहे. या पॉलिसीची खास गोष्ट म्हणजे यामध्ये पॉलिसीधारकाच्या कुटुंबाला मृत्यू लाभही मिळतो. पॉलिसी धारकाचा पॉलिसीच्या मुदतपूर्तीपूर्वी मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबाला एकरकमी रक्कम मिळते. यासोबतच आणखी एक खास गोष्ट म्हणजे या योजनेत पॉलिसीधारकाला 100 वर्षांपर्यंतचे कव्हर मिळते.

कोणताही गुंतवणूकदार या योजनेत 15 वर्षे, 29 वर्षे, 25 वर्षे आणि 30 वर्षांपर्यंत गुंतवणूक करू शकतो. जर तुम्ही ती 30 वर्षांसाठी खरेदी करत असाल तर, तुम्हाला 1350 रुपये प्रीमियम भरावा लागेल. ही गुंतवणूक 4.5 लाख रुपयांची विमा रक्कम आहे. या प्रकरणात, 1 वर्षात एकूण 16,200 रुपये प्रीमियम म्हणून दिले जातील. यानंतर, गुंतवणुकीच्या 31व्या वर्षापासून, गुंतवलेल्या रकमेवर 8% म्हणजेच 36 हजार रुपये परतावा मिळण्यास सुरुवात होईल. हे वयाच्या 100 वर्षापर्यंत मिळू शकते.

तुम्ही नोकरी करत असाल आणि कर भरत असाल तर या योजनेत गुंतवणूक करणे तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते. या योजनेत गुंतवणूक केल्यास, तुम्हाला आयकर कलम 80C अंतर्गत 1.5 लाख रुपयांची सूट मिळते. यासोबतच गुंतवणूकदाराला टर्म रायडर बेनिफिट देखील मिळतो. एखाद्या व्यक्तीचा अपघाती मृत्यू झाल्यास किंवा अपंग झाल्यास ती व्यक्ती किंवा नॉमिनी पॉलिसीवर दावा करू शकतात.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uddhav Thackeray: फडणवीसांच्या जवळच्या व्यक्तीनं उद्धव ठाकरेंकडं भेटीसाठी मागितली वेळ?; निकालापूर्वीच मोठी घडामोड

Pune Lok Sabha Election Results : कोरेगाव पार्क परिसरात उद्या वाहतुकीत बदल; कोणते आहेत पर्यायी मार्ग, जाणून घ्या..

Hardik Pandya Natasa Stankovic : ट्रोलिंगवर सहानभुतीचा उतारा.. हार्दिकनं मुद्दाम पसरवली घटस्फोटाची अफवा?

Uddhav Thackeray: ...तर ते CCTV फुटेज बाहेर काढावे लागेल, उद्धव ठाकरेंवरील आरोपाने राजकारण ढवळून निघणार

Latest Marathi News Live Update : छत्रपती संभाजीनगरमध्ये जोरदार पाऊस; महाराष्ट्रातील अनेक भागात अवकाळीनं झोडपलं

SCROLL FOR NEXT