LIC esakal
अर्थविश्व

LIC नं करोडो ग्राहकांना पाठवला SMS; पैसे मिळवण्यासाठी 'हे' काम करा लवकर

सकाळ डिजिटल टीम

आज अनेक महत्वाची कागदपत्रे मोठ्या प्रमाणावर पॅन कार्डशी (PAN) जोडली जात आहेत.

देशातील सर्वात मोठी विमा कंपनी असणाऱ्या भारतीय जीवन विमा महामंडळानं (Life Inurance Corporation of India) आपल्या करोडो पॉलिसीधारकांना एक संदेश पाठवलाय. एलआयसीनं (LIC) ग्राहकांना पाठवलेल्या एसएमएसमध्ये (SMS) म्हटलंय, की पीएमएलएनुसार (PMLA) 50,000 रुपयांपेक्षा जास्त रोख पेमेंटसाठी पॅन लिंक आवश्यक आहे. म्हणून, पॉलिसीधारकाने ताबडतोब त्याच्या एलआयसी पॉलिसीमध्ये पॅन कार्ड लिंक करुन घ्यावे, असं नमूद केलंय.

आज अनेक महत्वाची कागदपत्रे मोठ्या प्रमाणावर पॅन कार्डाशी (PAN) जोडली जात आहेत. एलआयसीनंही पॅन लिंक करण्यास सांगितलंय. एलआयसीनं म्हटलंय, की पॅन लिंक पॉलिसीला (LIC Policy) जोडण्याचे अनेक फायदे आहेत. पॅन कार्डला एलआयसी पॉलिसीशी जोडण्याची प्रक्रिया अगदी सोपीय. आपल्याला यात जास्त काही करण्याची गरज नाही.

तुमच्या पॉलिसीशी पॅन लिंक करण्यासाठी www.licindia.in या वेबसाइटवर लॉग इन करावं लागेल. त्यानंतर तुम्हाला मोबाईल नंबर द्यावा लागेल आणि त्याच नंबरवर OTP येईल. त्या OTP च्या सहाय्यानं लिंकिंग पूर्ण होईल. याचा फॉर्म सबमिट केल्यानंतर एक मेसेज येईल, ज्यामध्ये नोंदणी पूर्ण झाल्याची माहिती असते. LIC पोर्टलला भेट देऊन हे काम सहज करता येतं. एलआयसीनं यासाठी 3 टप्पे दिले आहेत. ज्याच्या मदतीनं एलआयसी पॉलिसी पॅनशी जोडणं सोपं होईल.

LIC

एलआयसीच्या साइटवर पॉलिसीच्या सूचीसह पॅनचा तपशील भरा. त्यात तुमचा मोबाईल क्रमांक टाका. तद्नंतर मोबाइल क्रमांकावर LIC कडून एक OTP येईल, तो आता प्रविष्ट करा. फॉर्म सबमिट केल्यानंतर, तुम्हाला यशस्वी नोंदणी विनंतीचा संदेश मिळेल. हे दर्शवेल की, तुमचे पॅन LIC च्या धोरणाशी जोडले गेलेय.

तुम्हाला तुमचं पॅन कार्ड पॉलिसीशी जोडणं आवश्यक आहे. एलआयसी आता थेट ग्राहकांच्या खात्यात पैसे जमा करते. जर तुमची रक्कम 50,000 रुपयांपेक्षा जास्त असेल आणि पॉलिसी पॅन कार्डशी जोडलेली नसेल, तर पैसे ट्रान्सफर करण्यात अडचण येऊ शकतात. म्हणून, हा त्रास टाळण्यासाठी, तुम्हाला पॅन कार्ड पॉलिसीशी जोडावं लागेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

iphoneच्या इतिहासात पहिल्यांदाच! Appleने लॉन्च केला पहिला फोल्डेबल iPhone Duo; मिळणार iPadसारखा अनुभव

iPhone 18 Pro अन् Pro Max मध्ये Apple ने केला मोठा धमाका! 2nm चिप, जबरदस्त कॅमेरा अन् AI फीचर्सने वेधलं लक्ष; किंमत किती?

Joe Root Record: सचिन तेंडुलकर - जेम्स अँडरसननंतर फक्त रुटनेच केला तो पराक्रम! पाँटिंग-स्टीव्ह वॉ यांचा मोडला विक्रम

Vastu Tips: घरात-बाल्कनीत पक्ष्यांचे घरटे असावे की नाही? वास्तुशास्त्रानुसार जाणून घ्या घरटे हटवणे योग्य की अयोग्य?

Pune News : सत्ता असूनही प्रशासनावर अंकुशच नाही! भाजप नगरसेवकांचा घरचा आहेर; पदाधिकाऱ्यांवरही व्यक्त केली नाराजी

SCROLL FOR NEXT