Bids open for LIC IPO till Saturday Bids open for LIC IPO till Saturday
अर्थविश्व

शेअर बाजारात LIC चा फ्लॉप शो, पहिल्याच दिवशी घसरणीने सुरुवात

शेअर बाजारात एलआयसीची फ्लॉप सुरवात झाली असून गुंतवणूकदारांची निराशा झाली आहे.

सकाळ डिजिटल टीम

LIC Share Listing: अनेक महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर सरकारी विमा कंपनी एलआयसीचे शेअर्स आज शेअर बाजारात सूचिबद्ध झाले. मात्र शेअर बाजारात एलआयसीची सुरुवात चांगली झाली नाही. एलआयसीचा शेअर्स मोठ्या घसरणीसह 862 वर सुरु झाला. परंतु त्यांनंतर हळूहळू खरेदीदारांची संख्या वाढल्याने सकाळी 10.25 मिनिटांपर्यंत एलआयसीचा शेअर 45.40 अंकांच्या म्हणजेच 4.78 टक्क्यांच्या घसरणीसह 903.60वर ट्रेड करत होता.

तत्पूर्वी आज सकाळी ग्रे मार्केटमध्ये शून्यापेक्षा खालच्या प्रीमियमवर ट्रेडिंग केल्यानंतर, LIC चे शेअर्स BSE वर प्री-ओपन सत्रात 12 टक्क्यांहून अधिक घसरणीसह व्यवहार करत होता. प्री-ओपनमध्ये, एलआयसीच्या स्टॉकने पहिल्या दिवसाची सुरुवात 12.60 टक्के किंवा 119.60 रुपयांच्या तोट्यासह 829 रुपयांवर केली.

LIC चा हा पहिला इश्यू भारताच्या इतिहासातील आतापर्यंतचा सर्वात मोठा IPO असल्याचे सिद्ध झाले आहे. या IPO साठी किंमत 902-949 रुपये निश्चित करण्यात आली होती. प्रथमच, वीकेंडच्या दोन्ही दिवशी आयपीओ खुला राहिला. विक्रमी 6 दिवस खुल्या असलेल्या LIC च्या IPO ला जवळपास प्रत्येक श्रेणीत चांगला प्रतिसाद मिळाला. तथापि, ग्रे मार्केट (LIC IPO GMP) मध्ये LIC IPO चा प्रीमियम लिस्ट होण्यापूर्वी शून्याच्या खाली गेला आहे, त्यामुळे पहिल्याच दिवशी गुंतवणूकदारांना तोटा होण्याची चिन्हे दिसत आहेत.

शासकीय विमा कंपनीचा लिस्टिंग सोहळा सकाळी 08:45 वाजता सुरू झाला. बीएसईचे सीईओ आणि एमडी आशिष कुमार चौहान, डीआयपीएएमचे सचिव तुहिन कांत पांडे यांच्यासह एलआयसीचे सर्व अधिकारी सूचीकरण समारंभात उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tamhini Ghat Accident: ताम्हिणी घाटातल्या गूढ अपघाताचा उलगडा… कोकणातून हॉटेल चालकाचा फोन ठरला टर्निंग पाईंट! नाहीतर...

Kolkata Earthquake : भूकंपाच्या धक्क्याने कोलकाता हादरले; लोक घाबरून घरं सोडून पळाले; बांगलादेशातही बसले हादरे

Mithun Career Rashifal 2026: शनि घेणार तुमची परीक्षा, पण गुरु असेल तुमच्या बाजूने, जाणून घ्या मिथुन राशीचे वार्षिक आर्थिक राशिफल

Latest Marathi News Live Update : नगरपरिषद व नगरपंचायत निवडणुकीसाठी आज उमेदवारांना माघारीची अखेरची मुदत

Ashes 2025 England vs Australia : खरोखरची राख असलेली 'अ‍ॅशेस ट्रॉफी' आता कुठं आहे? त्यात नेमकी कशाची राख आहे? जाणून घ्या...

SCROLL FOR NEXT