lockdown 
अर्थविश्व

lockdown: लॉकडाउनमुळे देशाला बसणार ८ लाख कोटींचा फटका 

वृत्तसंस्था

नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी २४ मार्च रोजी देशभर २१ दिवसांच्या लॉकडाउनची घोषणा केली आणि त्यात आता ३ मेपर्यंत वाढ करण्यात आली आहे. या दीर्घकालावधीच्या लॉकडाउनमुळे देशातील उद्योग-व्यवसाय बंद आहेत. विमान वाहतूक, रेल्वे सेवा बंद असून दळणवळण पूर्णपणे थांबविण्यात आले आहे. यामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेला सुमारे सात ते आठ लाख कोटींचा फटका बसण्याची शक्यता आहे. 

कोविड-१९ च्या वाढत्या प्रसारामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी २५ मार्च रोजी लॉकडाउनची प्रभावीपणे अंमलबजावणी केली जाण्याची घोषणा केल्यामुळे देशातील ७० टक्के आर्थिक व्यवहार बंद झाले. परिणामी निर्यात, गुंतवणूक बंद झाली. फक्त अत्यावश्यक सेवा, , कृषी, जीवनावश्यक वस्तू आणि सेवांना परवानगी देण्यात आली. 

देशाने हाती घेतलेल्या वित्तीय आणि आर्थिक सुधारणांमुळे अर्थव्यवस्थेत वाढीचे सकारात्मक संकेत दिसू लागले होते. मात्र जगभर थैमान घातलेल्या कोरोनाचा भारतात प्रवेश झाला. परिणामी उपाययोजनांचा भाग म्हणून करण्यात आलेल्या लॉकडाउनमुळे आर्थिक वर्ष २०२०-२१ मध्ये देशाचा एकूण देशांतर्गत उत्पादनाचा दर (जीडीपी) मंदावण्याची शक्यता आहे, असे मत 'सेंट्रम इन्स्टिट्युशनल रिसर्च'ने व्यक्त केले आहे. 

ऍक्यूट रेटिंग्ज अँड रिसर्चने आधी व्यक्त केलेल्या अंदाजानुसार, लॉकडाउनमुळे भारतीय अर्थव्यवस्थेला दरदिवशी ४.६४ अब्ज डॉलरचे (अंदाजे ३५ हजार कोटी रुपये) नुकसान होते आहे. यानुसार २१ दिवसांच्या लॉकडाऊनच्या कालावधीत 'जीडीपी'ला सुमारे ९८ अब्ज डॉलरचे (७.५ लाख कोटी रुपये) नुकसान होईल. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

AI Retro Look: ८०च्या दशकाची भुरळ पुन्हा! एआयच्या मदतीने ‘रेट्रो लूक’मध्ये फोटो बनवण्याचा ट्रेंड सोशल मीडियावर व्हायरल

US Iran Conflict: इराणची पाच तेलवाहू जहाजे लक्ष्य; युद्धनौकांवरील हल्ल्यांना अमेरिकेचे प्रत्युत्तर, जॉर्डनमध्येही हल्ले

Vidyanand Bapat : गणेशोत्सवावरील वक्तव्य भोवले? विद्यानंद बापटांना ४८ तासांत माफी मागण्याची नोटीस

Maharashtra Sugarcane: शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! ऊस गाळपाचा मुहूर्त ठरला; १५ ऑक्टोबरपासून २०२६-२७ चा ऊस गाळप हंगाम सुरू होणार

Ammy Virk Attacked : कॉन्सर्ट संपवून घरी परतताना प्रसिद्ध गायक एमी विर्कच्या वाहनावर धडाधड गोळ्या झाडल्या; रोल्स रॉयसची केली चाळण

SCROLL FOR NEXT