Mutual Fund Sakal
अर्थविश्व

अर्थभान : नियम पाळा आणि नुकसान टाळा!

गेल्या सोमवारच्या लेखात आपण पाहिले, की दीर्घ कालावधीमध्ये म्युच्युअल फंडाच्या योजनांनी किती मोठा परतावा गुंतवणूकदारांना दिला आहे ते!

मकरंद विपट

गेल्या सोमवारच्या लेखात आपण पाहिले, की दीर्घ कालावधीमध्ये म्युच्युअल फंडाच्या योजनांनी किती मोठा परतावा गुंतवणूकदारांना दिला आहे ते!

गेल्या सोमवारच्या लेखात आपण पाहिले, की दीर्घ कालावधीमध्ये म्युच्युअल फंडाच्या योजनांनी किती मोठा परतावा गुंतवणूकदारांना दिला आहे ते! जर आपल्याला पण आपण केलेल्या गुंतवणुकीतून अशाच काहीशा परताव्याची अपेक्षा असेल तर आपल्याला काही नियम पाळणे गरजेचे आहे. उदाहरणार्थ, एखादी छोटी कंपनी जेव्हा खूप मोठी होते किंवा एखादा माणूस; मग तो खेळाडू असो वा एखादा व्यावसायिक अथवा इतर कोणत्याही क्षेत्रात; जेव्हा इतर लोकांपेक्षा तो मोठी कामगिरी करतो, तेव्हा ती कंपनी अथवा तो माणूस काही नियम पाळताना दिसतात आणि हे नियम पाळल्यामुळेच ते यशाच्या शिखरावर पोचलेले असतात. त्यामुळे आपण देखील आपल्या गुंतवणुकीबाबत पुढील नियम पाळले तर आपल्यालाही नक्कीच चांगला फायदा होऊ शकेल.

  • गुंतवणूक करण्यापूर्वी दीर्घ कालावधीनंतर नक्की किती रकमेची आवश्यकता आहे, हे जाणून घ्यावे आणि त्या रकमेचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी आतापासून नक्की किती गुंतवणूक करायला हवी, कोठे करायला हवी, हे माहीत करून घेणे.

  • नियमितपणे, टप्प्याटप्प्याने गुंतवणूक करावी.

  • ‘एसआयपी’च्या माध्यमातून गुंतवणुकीला सुरवात केल्यावर कमीत कमी ५-१० वर्षे विसरून जावे. केलेल्या गुंतवणुकीचे मूल्यांकन दररोज किंवा दरमहा बघत बसू नये.

  • म्युच्युअल फंडाच्या गुंतवणुकीबाबत ‘ट्रेडिंग’चा म्हणजे अल्पकालीन दृष्टिकोन ठेऊ नये.

  • शेअर बाजाराच्या प्रत्येक पडझडीत तुमच्या प्रमाणित सल्लागाराशी बोलून गुंतवणुकीच्या संधी शोधाव्यात.

  • तुमच्या गुंतवणुकीबाबत तुमच्या सल्लागाराशिवाय इतर कोणाशीही चर्चा करू नये. नातेवाईक, मित्र, सहकारी अशा नात्यांपेक्षा या क्षेत्रातील पुरेसे ज्ञान असलेल्यांकडून माहिती मिळवणे महत्त्वाचे असते.

  • जर आपण गुंतवणुकीपूर्वी शेअर बाजार बघत नसू, तर गुंतवणुकीनंतरही शेअर बाजार बघू नये.

  • म्युच्युअल फंडातील गुंतवणूक दीर्घकालीन उद्दिष्टे ठेवूनच करावी आणि ती उद्दिष्टे साध्य झाल्यावरच ती गुंतवणूक काढावी.

  • कोणत्याही प्रकारची गुंतवणूक चालू करताना आपला योग्य रकमेचा मेडिक्लेम वा आरोग्य विमा असणे गरजेचे आहे.

  • इमर्जन्सी फंडाची सुद्धा व्यवस्था करायला हवी. म्हणजे आपण दीर्घ कालावधीसाठी केलेली गुंतवणूक ही वेळेआधी काढण्याची वेळ येणार नाही.

  • सर्वांत महत्त्वाचे म्हणजे शेअर बाजाराच्या चढ-उताराकडे लक्ष न देता, नियमितपणे गुंतवणूक करावी आणि संयम राखावा.

मला पूर्ण खात्री आहे, की वरील सर्व गोष्टींचे पालन केल्यास, तुम्हाला तुमच्या गुंतवणुकीतून दीर्घ कालावधीनंतर मोठा परतावा मिळण्याची शक्यता आहे.

(लेखक प्रमाणित म्युच्युअल फंड सल्लागार आहेत.)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan T20 WC Qualification Scenario : भारताकडून हार अन् पाकिस्तानी बेजार! गुणतालिकेत उलथापालथ, अमेरिका दुसऱ्या क्रमांकावर, पाकडे Super 8s मध्ये कसे पोहोचणार?

IND vs PAK T20 WC: हा विजय भारतीयांसाठी! पाकिस्तानच्या मुसक्या आवळल्यानंतर सूर्यकुमार यादवचं 'मन' जिंकणारं विधान...

Harshvardhan Sapkal : 'मुंबईतील रस्त्याला 'टिपु सुलतान'चं नाव देण्याचा भाजपने दिला होता प्रस्ताव', हर्षवर्धन सपकाळांनी थेट पुरावाच सादर केला..

IND vs PAK T20 WC: ८-१ ! कुठेही खेळा, पाकिस्तानचे वस्त्रहरण निश्चित! टीम इंडिया दणदणीत विजयासह Super 8s मध्ये; शेजाऱ्यांचा पुढचा मार्ग खडतर

IND vs PAK T20 WC: आधी झोडले, मग ट्रोल केले! पाकिस्तानची इभ्रत वेशीला टांगल्यानंतर इशान किशन काय म्हणाला वाचा...

SCROLL FOR NEXT