pnb 
अर्थविश्व

"पीएनबी'ने बिघडवली शेअर बाजाराची चाल 

राजेंद्र सूर्यवंशी

भारतीय शेअर बाजाराला लागलेले ग्रहण अजून एक महिनाभर चालू राहण्याची शक्‍यता आहे. या दरम्यान "निफ्टी' 9750 अंशांपर्यंत घसरण्याची शक्‍यता राहील. केंद्रीय अर्थसंकल्पातील तरतुदीपाठोपाठ अमेरिकी बाजारातील घसरण आणि आता "पीएनबी'मधील आर्थिक अफरातफरीने आपल्या शेअर बाजाराची चाल बिघडली. ज्या अमेरिकी बाजारामुळे जगातील बाजार पडले, तोच अमेरिकेतील शेअर बाजार आपल्या नीचांकी पातळीवरून 10 टक्के वर आला आहे. युरोपीय बाजारही 4 ते 6 टक्‍क्‍यांनी वाढले आहेत. चीनचा बाजार 6.87 टक्के वाढला. परंतु, आपला "निफ्टी' केवळ 1.45 टक्केच वाढला आहे. याला केवळ "पीएनबी'मधील आर्थिक अफरातफर कारणीभूत असल्याचे दिसत आहे. तसे शेअरविक्रीचे आकडे फार मोठे दिसत नाहीत. परकीय वित्तीय संस्थांनी फेब्रुवारी महिन्यात एकूण 9,060 कोटींची विक्री केली असून, भारतीय वित्तीय संस्थांनी 7,787 कोटींची खरेदी केली आहे. यात 1,273 कोटी रकमेची निव्वळ विक्री झाल्याचे दिसत आहे. 

चालू आठवडा बाजारासाठी महत्त्वाचा असून, जर अमेरिकी बाजार स्थिर किंवा वाढते राहिले, तर आपला बाजार फार पडणार नाही. अमेरिकेतील 10 वर्षांच्या सरकारी बॉंडच्या वाढणाऱ्या परताव्यात घट येत असून, ती पुढे अशीच चालू राहिली, तर जागतिक बाजारात स्थिरता येत राहील. परंतु, आपल्या बाजारात परकीय वित्तीय संस्थांची शेअरविक्री अजून काही दिवस चालू राहण्याची शक्‍यता आहे. कच्च्या तेलाच्या भावातील आणि रुपयाच्या विनिमय दरातील घटीने आपल्या बाजाराला आधार मिळेल. 

तांत्रिक कल कसा राहील? 
मागील शुक्रवारी "निफ्टी' 10,453 अंशांवर बंद झाला असून, या पातळीपासून वरच्या बाजूस 10,625 व खालच्या बाजूस 10,300 अंश या पातळ्या अत्यंत महत्त्वाच्या आहेत. 10,625 अंशांवर "निफ्टी' एक दिवस टिकला, तर पुढे 10,950 अंशांपर्यंत वाढेल. जर 10,300 अंशांची पातळी तोडून "निफ्टी' एक तास खाली टिकला, तर पुढे 10,150 अंशांपर्यंत जाण्याची शक्‍यता राहील. चालू आठवड्यात "निफ्टी'तील चढ-उतार अधिक असण्याची शक्‍यता आहे. "निफ्टी'तील "करेक्‍शन' हे टप्प्याटप्प्याने होईल. त्यात पहिला 10,300 अंशांचा टप्पा पूर्ण झाला असून, पुढील टप्पा 10,000 ते 10,150 अंश या पातळीवर आहे. अंतिम टप्पा 9750 अंशांवर असेल. हे अपेक्षित "करेक्‍शन' झाल्यास बाजारात पुन्हा एक मोठी तेजी येईल. "करेक्‍शन' कधीही सलग होत नसल्याने प्रत्येक टप्प्यांवर गुंतवणूक वाढवत राहणे योग्य ठरेल. 
खरेदी करण्यासारखे..... 

वेदांता लि. (सध्याचा भाव : रु. 319, उद्दिष्ट - रु. 500) 
खनिज उत्खनन व धातू निर्माण क्षेत्रात कार्यरत असलेली ही देशातील सर्वांत मोठी व नामांकित कंपनी आहे. तिचे आजचे बाजारमूल्य 1,18,857 कोटी रुपये आहे. खाणीतून मातीमिश्रित धातूकण काढून व त्यापासून शुद्ध धातू वेगळा करून त्याची विक्री करण्याचा व्यवसाय या कंपनीचा आहे. यातील अधिकांश उत्पादन निर्यात केले जाते. या सोबत वायू शोध व उत्पादन (केर्न इंडिया सोबत) आणि ऊर्जानिर्मिती अशा क्षेत्रात ही कंपनी कार्यरत आहे. कंपनीला या व्यवसायातून मिळणारा निव्वळ नफा 12.75 टक्के असून, हा यापुढे वाढता राहण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे आजचा पी/ई (9.23) व पी/बीव्ही (1.49) ही गुणोत्तरे उत्तम पातळीवर आहेत. कंपनीला उत्पादने विकून मिळणारा महसूल निरंतर वाढता असल्याने नफाही वाढतच आहे. आज या कंपनीच्या शेअरमध्ये गुंतवणूक केल्यास पुढील एका वर्षात रु. 500 भाव मिळण्याची शक्‍यता आहे. 

(डिस्क्‍लेमर - लेखक शेअर बाजाराचे संशोधन-विश्‍लेषक आहेत. त्यांनी त्यांच्या अभ्यासातून वरील मत व अंदाज व्यक्त केले आहेत. त्याच्याशी "सकाळ' सहमत असेलच असे नाही. शेअर बाजारातील जोखीम लक्षात घेऊन वाचकांनी गुंतवणुकीचे निर्णय स्वतःच्या जबाबदारीवर घेणे अपेक्षित आहे.) 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'५५५ बीडी'च्या मालकाची मुलानेच केली हत्या, गोळी झाडून घेत स्वत:लाही संपवलं; काय घडलं?

Bengaluru Doctor Case : मी तुझ्यासाठी तिला मारलं, पत्नीच्या हत्येनंतर लग्नाचे प्रस्ताव नाकारलेल्या महिलांना केले मेसेज

Latest Marathi News Live Update : करोडोंची फसवणूक करणाऱ्या आरजू टेकसोलच्या मालमत्तेवर कारवाई

Dry Eye Risk in Youth: डिजिटल युगात डोळ्यांवर येणाऱ्या ताणामुळे तरुणाईंला 'Dry Eye'चा धोका! शरीरात हे बदल दिसताच करा पुढील उपाय

Zubair Hungregkar Case: जुबेर हंगरेगकरचे ‘अल कायदा’शी संबंध प्रकरण! ‘वाहदते मुस्लिम ए हिंद’च्या पदाधिकाऱ्यास एटीएसची नोटीस, चौकशी होणार..

SCROLL FOR NEXT