Inflation  Sakal
अर्थविश्व

Inflation : मार्चमध्ये वाढली महागाई; सरकारने जाहीर केली आकडेवारी

सरकारने या महिन्याची महागाईच्या दराच्या सरासरीची आकडेवारी जाहीर केली आहे.

सकाळ डिजिटल टीम

देशभरातील महागाई सध्या दिवसेंदिवस वाढतंच चालली असून यामुळे सर्वसामान्यांना फटका बसताना दिसत आहे. पेट्रोल डीझेलसहीत बाकींच्या वस्तूंनाही महागाईच्या झळा बसताना आपल्याला पहायला मिळत आहेत. दरम्यान सरकारने या महिन्याची महागाईच्या दराच्या सरासरीची आकडेवारी जाहीर केली आहे.

फेब्रुवारी महिन्याच्या तुलनेत मार्च महिन्यात महागाई वाढल्याचं या आकडेवारीवरुन समजटतंय. सरकारने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार मार्चमध्ये महागाईचा दर हा ६.९५ टक्के इतका झाला आहे. दरम्यान याअधीच्या महिन्यात म्हणजे फेब्रुवारीमध्ये महागाईचा दर हा ६.०७ टक्के इतका होता. फेब्रुवारीच्या तुलनेत मार्चमध्ये ०.८८ टक्क्यांनी महागाई वाढल्याचं यावरुन सिद्ध झालं आहे.

दरम्यान देशभरातील जनतेला याचा फटका बसणार आहे. खाद्यतेल, इंधन, जीवनावश्यक वस्तूंच्या वाढत्या किंमतीमुळे सामान्यांच्या खिशाला कात्री बसणार आहे. मागील एका महिन्यापासून पेट्रोलच्या आणि डीझेलच्या दरात दिवसेंदिवस वाढ होत आहे. आणि सरकारच्या या आकडेवारीनुसार जनतेला दिलासा मिळणार नाही हे स्पष्ट झालंय. विविध रिपोर्टनुसार महागाईचा टक्का वाढणार असल्याचं बोललं जात होतं. त्यानुसार सरकारने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार देशातील महागाई ६.९५ टक्क्यापर्यंत वाढली असल्याचं समजतंय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Big Controvarsy: शुभमन गिलला कॅप्टन व्हायचं नव्हतं, रोहित शर्माकडून BCCI ने ते हिसकावून घेतले; अजित आगरकर व निवड समितीने प्रचंड दबाव आणला...

मी दमलीये! लग्नानंतर आशुतोष यांच्या पाहुण्यांना कंटाळलेल्या रेणुका शहाणे; शेवटी एके दिवशी रागात...

AAP Bihar Candidate List : बिहार निवडणुकीसाठी 'AAP'ने वाजवला बिगुल!, पहिली उमेदवार यादी केली जाहीर

Mumbai Police: मुंबईत २९ दिवस ड्रोन आणि कंदील उडवण्यावर बंदी; दिवाळीपूर्वी पोलीस अ‍ॅक्शन मोडवर!

RBI ECL Rule: आरबीआयच्या नवीन नियमांमुळे खासगी बँकांचे कर्ज महागणार? कोणत्या बँकांवर होणार परिणाम?

SCROLL FOR NEXT