Meesho esakal
अर्थविश्व

लवकरच Meesho IPO आणण्याच्या तयारीत!कधीपर्यंत होईल एन्ट्री

स्टार्टअप कंपनी मीशो इश्यूमधून निधी उभारण्याच्या तयारीत आहे.

शिल्पा गुजर

स्टार्टअप कंपनी मीशो इश्यूमधून निधी उभारण्याच्या तयारीत आहे.

स्टार्टअप कंपनी मीशो (Meesho) इश्यूमधून निधी उभारण्याच्या तयारीत आहे. कंपनीला फेसबुकची मूळ कंपनी मेटा प्लॅटफॉर्म्स (Meta Platforms) आणि सॉफ्टबँक ग्रुपच्या (Softback Group) विजन फंडद्वारे निधी दिला जातो. मीशोचा आयपीओ 2023 च्या सुरुवातीला येऊ शकतो, असे रॉयटर्सच्या रिपोर्टमधून समजते आहे. मीशो बंगळुरू-आधारित सोशल कॉमर्स प्लॅटफॉर्म 2022 च्या शेवटी किंवा 2023 च्या सुरुवातीला लिस्ट केले जाऊ शकते. कंपनी भारतीय आणि यूएस या दोन्ही बाजारपेठांमध्ये लिस्ट होण्याची शक्यता तपासत आहे.

या वर्षी सप्टेंबरमध्ये, मीशोने सीरिज एफ फंडिंग फेरीत 57 कोटी डॉलर जमा केले. कंपनीने हे पैसे 4.9 अब्ज डॉलरच्या व्हॅल्युएशनवर उभे केले. फिडेलिटी मॅनेजमेंट अँड रिसर्च कंपनी आणि बी कॅपिटल ग्रुप यांच्या नेतृत्वाखाली मीशोने हा निधी उभारला होता.

कंपनी काय करते?

युझर्स सप्लायर मार्केट प्लेसमधून खरेदी करुन आपला प्रॉफीट मार्जिन ठेवत व्हॉट्सअॅप, फेसबुक आणि इंस्टाग्रामद्वारे प्रॉडक्ट्स विकते. मीशो पुढच्या वर्षी जानेवारीपर्यंत इश्यूसाठी अर्ज सादर करण्याची शक्यता आहे. कंपनीचा इश्यू 2023 च्या मध्यापर्यंत येण्याची शक्यता आहे, असे सूत्रांकडून समजतंय. मात्र, या संदर्भात कंपनीने अधिकृतरित्या काहीही सांगितले नाही. मीशोने (Meesho) नोव्हेंबर 2021 मध्ये JPMorgan Chase चे माजी गुंतवणूक बँकर धीरेश बन्सल यांना मुख्य आर्थिक अधिकारी म्हणून नियुक्त केले आहे. बन्सल यांच्याकडे आयपीओपूर्वीची तजवीज करण्याची जबाबदारी देण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.

नोंद : क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MI vs RR Live: वैभव सूर्यवंशी vs जसप्रीत बुमराह... लढत पाहण्यासाठी उत्सुक आहात, पण सामना होणार की नाही? हे आधी घ्या जाणून

कोकणातला असूनही मला 'दशावतार'मध्ये घेतलं नाही कारण.... दिगंबर नाईक स्पष्टच बोलले, 'जे बघून लहानाचे मोठे...

Stock Market Today: घसरणीनंतर बाजार तेजीत बंद! कोणते शेअर्स वाढले? बँकिंग शेअर्स घसरले; खरेदीची हीच वेळ?

लव्ह जिहादचे आरोप करणाऱ्या 'मिस इंडिया अर्थ' सायलीचं अपहरण, पुण्यात हिंदू धर्मात केलेलं शुद्धीकरण, आता अचानक झाली गायब

IPL 2026: अर्जुन तेंडुलकरचे परफेक्ट यॉर्कर्स; रिषभ पंतलाही फलंदाजी करताना दिला त्रास; पाहा Video

SCROLL FOR NEXT