अर्थविश्व

नोकरदारांसाठी आनंदाची बातमी! एक एप्रिलपासून लागू होणार नवे नियम?

सकाळन्यूजनेटवर्क

नोकरदार असाल तर तुमच्यासाठी ही अत्यंत महत्वाची बातमी आहे. कारण, एक एप्रिलपासून मोठे बदल होण्याची शक्यता आहे. नवीन श्रम कायदा (New Labour Laws) लागू झाल्यास नोकरदाराच्या पगार, पीएफ कामकाजाची वेळ आणि ओव्हर टाइम  यासारख्या नियमांमध्ये मोठे बदल होण्याची शक्यता आहे. त्याशिवाय ग्रॅच्युटी आणि पीएफमध्येही मोठी वाढ होऊ शकते. हे नवीन विधेयक कसं लागू करावं, याबाबत सध्या केंद्र सरकार आणि कंपन्यामध्ये चर्चा सुरु आहे. गतवर्षी केंद्र सरकारनं संसदेत पास केलेल्या तीन श्रम कायद्यामुळे हा बदल होत आहे.  या विधेयकाला राष्ट्रपतींकडूनही मान्यता मिळाली आहे. हे नवीन विधेयक एक एप्रिलपासून लागू होण्याची शक्यता असल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे....
 
नवीन श्रम कायदा लागू झाल्यानंतर नोकरदारांच्या आयुष्यात नेमके काय काय बदल होतील, ते जाणून घेऊयात....  

  • पगारात होऊ शकतो बदल - 

नवीन कायद्यानुसार पगारांमध्ये बदल झाल्यास तुमच्या बेसीक पगाराची रक्कम ही सीटीसीपेक्षा ५० टक्के किंवा त्यापेक्षा जास्त असावी. जर तुमचा बेसीक पगार कमी असेल तर लवकरच त्यामध्ये बदल होऊ शकतो.  नवीन कायद्यानुसार, तुमच्या सीटीसीमध्ये वाढ होऊ शकते. बेसिक पगारानंतर उर्वरीत ५० टक्केंमध्ये उर्तवरीत भत्ते दिले जातील. ज्यामध्ये  प्रवास, ओव्हरटाइम, गाडी, मोबाइल बील याचा समावेश असेल.

  • पीएफमध्ये वाढ -

बेसीक पगारांमध्ये वाढ झाल्यास तुमचा पीएफमधील वाटाही वाढणार आहे. कारण, तुमच्या बेसिक पगाराच्या १२ टक्के रक्कम पीएफमध्ये जमा केली जाते.  (हेही वाचा : सोन्याच्या किंमतीमध्ये घसरण, जाणून घ्या दर)

  • १२ तास काम करण्याचा प्रस्ताव -

नव्या नियमांनुसार, जास्तीत जास्त १२ तास काम करण्याचा नियम आहे. त्याशिवाय १५ मिनिट ते ३० मिनिट अतिरिक्त काम केल्यास ओव्हरटाइम म्हणून नोंद केली जाईल. सध्या तीस मिनिटांपेक्षा जास्त वेळ काम केल्यास ओव्हरटाइम म्हटलं जातं.  

  • पाच तासानंतर ब्रेक  -

लागोपाठ पाच तासांपेक्षा जास्तवेळ काम करण्यावर प्रतिबंद्ध लावण्यात आले आहेत. नवीन कायद्यानुसार, पाच तास काम केल्यानंतर अर्ध्या तासाचा ब्रेक देण्यात यावा.  (हेही वाचा :अर्थ विश्वातील ताज्या घडामोडी वाचण्यासाठी इथं क्लिक करा...)

  • निवृत्ती रकमेत वाढ - 

पीएफच्या रकमेत वाढ झाल्यानंतर निवृत्तीनंतर मिळणाऱ्या पैशांमध्येही मोठी वाढ होईल. निवृत्तीनंतर लोकांना या पैशांची मदत मिळेल. पीएफ आणि ग्रॅच्युटी वाढल्यामुळे कंपन्यांच्या खर्चामध्येही वाढ होईल. शिवाय कंपनीचा वाटाही वाढेल.  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

TMC Symbol Row : निवडणूक आयोगाने 'तृणमूल'चे चिन्ह गोठवले ! ममता आणि रितब्रता गटांकडून मागवले नवे चिन्ह अन् नाव

Team India Schedule : अफगाणिस्तानला लोळवलं, आता भारत पुढे कोणाकोणाचा कार्यक्रम करणार? Asian Games ते ऑस्ट्रेलियाचा भारत दौरा, जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक

Maharashtra eco-friendly Ganesh idols: राजभवन ते वर्षा निवासापर्यंत उरुळी कांचनच्या पर्यावरणपूरक ‘वृक्ष गजानना’चा डंका; मंदार आर्टसच्या गणेशमूर्तींना राज्यभर मानाचे स्थान

Junnar water dispute case: सामाईक विहिरीच्या पाण्याच्या वादातून मारहाण; जुन्नर न्यायालयाकडून दोघांना एक वर्षांची शिक्षा व दंड

Ranjangaon Ganpati Tradition: रांजणगाव परिसरात शेकडो वर्षांची ‘एक गाव, एक गणपती’ परंपरा कायम; महागणपतीच सर्वांची आराध्य देवता

SCROLL FOR NEXT