Mukesh Ambani have lost tag of Most reach person in Asia
Mukesh Ambani have lost tag of Most reach person in Asia  
अर्थविश्व

मुकेश अंबानींनी आशियातील सर्वाधिक श्रीमंत व्यक्तीचा 'टॅग' गमावला 

वृत्तसंस्था

मुंबई : जागतिक पातळीवर पसरत चाललेल्या कोरोनाचा फटका रिलायन्स इंडस्ट्रीजचे सर्वेसर्वा मुकेश अंबानी यांना देखील बसला आहे. जागतिक पातळीवरील मंदीमुळे अंबानींच्या संपत्तीत सुमारे 44 हजार कोटी रूपयांची घसरण झाली आहे. फोर्ब्स रिअल टाईमने दिलेल्या माहितीनुसार, मुकेश अंबानी यांच्या संपत्तीत 11.68 टक्क्यांची घट झाली असून ती आता  42.2 अब्ज डॉलवर पोचली आहे. परिणामी आशियातील सर्वाधिक श्रीमंत व्यक्ती असण्याचा मान गमवावा लागला आहे.

अंबानी यांच्या संपत्तीत एका दिवसात 5.6 अब्ज डॉलरची घसरण झाली आहे. आता चीनच्या अलीबाबा कंपनीचे  सर्वेसर्वा जॅक मा आशियातील सर्वाधिक श्रीमंत व्यक्ती ठरले आहे. 

कच्च्या तेलाच्या किंमतीत मोठ्या प्रमाणावर घसरण झाल्यानंतर सोमवारी रिलायन्स इंडस्ट्रीजच्या शेअरमध्ये 12 टक्क्यांची घसरण झाली. तो 156 रुपयांच्या घसरणीसह 1113 रुपयांवर व्यवहार करत स्थिरावला. घसरलेल्या कच्च्या तेलाच्या किंमतीमुळे रिलायन्स इंडस्ट्रीजच्या नफ्यावर परिणाम होण्याची शक्यता आहे. कच्च्या तेलाच्या किंमतीचा परिणाम जीआरएमवर होण्याची शक्यता आहे.  डिसेंबर तिमाहीत रिलायन्स इंडस्ट्रीजचा जीआरएम 9.2 डॉलर प्रतिबॅरल होता. सध्याच्या शेअरच्या बाजारभावानुसार कंपनीचे बाजारभांडवल 7 लाख 05 हजार 655 कोटींवर पोचले आहे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Health Insurance: विमा घेऊनही चिंता कायम! 43 टक्के पॉलिसी धारकांना मिळत नाही क्लेम; धक्कादायक अहवाल समोर

Water Crisis: देशासमोर पाण्याचे संकट, 150 प्रमुख जलाशयांमधील पाण्याची पातळी घसरली

लग्न झालेलं असो किंवा नसो, स्वेच्छेने ठेवलेल्या लैंगिक संबंधांना चुकीचं म्हणता येणार नाही- हायकोर्ट

Panchayat 3 Release Date Out: प्रतीक्षा संपली! 'पंचायत-3' ची रिलीज डेट जाहीर, 'या' दिवशी प्रेक्षकांच्या भेटीला येणार सीरिज

Latest Marathi News Live Update : दिल्लीच्या रस्त्यावर थरार, पोलीस गुंडांमध्ये चकमक

SCROLL FOR NEXT