Mukesh Ambani Jio Mart Express Service Paused  Sakal
अर्थविश्व

Mukesh Ambani : रिलायन्स कंपनीचा ग्राहकांना मोठा धक्का! लोकांना माहिती न देताच बंद केली 'ही' सेवा

रिलायन्स रिटेलच्या निर्णयामुळे ग्राहकांना धक्का बसला आहे.

सकाळ डिजिटल टीम

Jio Mart Express Service Paused : रिलायन्स रिटेलच्या निर्णयामुळे जिओ मार्टच्या ग्राहकांना धक्का बसला आहे. जिओ मार्टने आपली वितरण सेवा 'एक्सप्रेस' बंद करण्याची घोषणा केली आहे.

ज्या ग्राहकांना Jio Mart द्वारे वस्तूंची डिलिव्हरी त्वरित घेण्याची सवय झाली होती त्यांच्यासाठी मोठा धक्का आहे. रिलायन्स रिटेलने कोणतीही घोषणा न करता आपली जलद वितरण सेवा बंद केली आहे.

इकॉनॉमिक टाईम्सच्या रिपोर्टनुसार, या प्रकरणाची माहिती असलेल्या लोकांनी ही बातमी दिली आहे. जिओ मार्टची ही सेवा गेल्या वर्षी मार्चमध्ये सुरू करण्यात आली होती. जिओमार्टच्या सर्व्हिस एक्सप्रेसच्या माध्यमातून लोकांना अवघ्या 90 मिनिटांत वस्तूंची डिलिव्हरी मिळायची.

जिओ मार्टच्या क्विक डिलिव्हरी सेवेचे ग्राहक यापुढे Google Play Store वरून Jio Mart Express अॅप डाउनलोड करू शकणार नाहीत आणि त्याची वेबसाइट देखील सक्रिय नाही.

त्याऐवजी त्यांनी ग्राहकांना जिओमार्ट व्हॉट्सअॅप सेवा सुरु केली आहे. जिओ मार्ट व्हॉट्सअॅप सेवेद्वारे ग्राहकांना काही तासांत वस्तूंची डिलिव्हरी मिळू शकते. जिओ मार्ट एक्सप्रेसच्या सेवेपेक्षा ही सेवा पूर्णपणे वेगळी आहे.

हेही वाचा : नेट बँकिंग सुविधा वापरताय? मग हे नक्कीच वाचा...

व्हॉट्सअॅपद्वारे जिओ मार्टची डिलिव्हरी सेवा ही मेटा इंक आणि रिलायन्स जिओ प्लॅटफॉर्म यांच्यातील भागीदारी आहे. जिओ मार्ट एक्स्प्रेस पहिल्यांदा नवी मुंबई आणि आसपासच्या भागात सुरू करण्यात आली होती आणि कंपनीने तिचा 200 शहरांमध्ये विस्तार करण्याची योजना आखली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Success Story: जिद्द, कष्ट आणि ध्येयवेड! ओमकार पेटेकर बनला डॉक्टर, वैद्यकीय क्षेत्रात उल्लेखनीय यश, विद्यार्थ्यांसाठी सुयश प्रेरणादायी..

​Pune News: पाषाणमधील रस्त्याची झाली कचराकुंडी; कचरा जाळल्याने रहिवाशांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम

IPL 2026: मुंबईकडून घरच्या मैदानात विजयाचा श्रीगणेशा? आज KKR विरुद्ध सामना; जाणून घ्या संभावित Playing XI

Pune News: बाणेर रस्त्यावर अडथळ्यांची शर्यत!; खोदलेले रस्ते, पदपथ दुरुस्तीकडे दुर्लक्ष; ठिकठिकाणी माती अन् राडारोडा

Pune Crime:पुण्यात डिलिव्हरी बॉयकडून वसतिगृहात अश्लील वर्तन; धक्कादायक प्रकार, परदेशी विद्यार्थिनींची सुरक्षा चव्हाट्यावर

SCROLL FOR NEXT